नमस्कार मित्रांनो,
महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा उपवर झाली होती. मात्र, तिचा विवाह जमत नव्हता. श्रीमंताघरच्या मुलीला कशी मागणी घालायची, या विचाराने अनेक जण त्यांना स्थळे सूचवत नाहीत. श्रीमंत स्थळे यायची; पण, अफाट हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते.
शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्र य त्न करतात. काही दिवसांनी सर्वप्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह नि श्चि त होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प ते करतात.स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात.
तेव्हा, सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका, अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र, आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाला फारसे म ह त्त्व देत नाहीत. स ह स्त्र भोजनानंतर बाकीची झोपतात. अरे झोपला काय आहेस? चोर येऊन सर्व लुटून गेले आहे, असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर, राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात.
महारुद्रराव स्वामींना म्हणतात की, स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर, स्वामी म्हणतात की, अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते. सावध राहा म्हणून. पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातो. स्वामी सांगतात की, पाच चोर होते. शोध घ्या त्यांचा.
महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हा चोळप्पांना स्वामी ज्यांना विवेकाची प्रतीमूर्ती म्हणतात, ते फसलगावचे भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात. परंतु, माझा एक मित्र आहे. तो गावाचा पाटील आहे. त्यांना मदतीला घेऊ शकतो, असे देशपांडे सुचवतात.
सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे दोन चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात.
ते स्वामींकडे येऊन म्हणतात की, सर्वजण आम्हाला विचारतात की, आम्ही स्वामी भक्ती का करतो? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की, स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की, स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून प रा वृ त्त होऊ लागते, तेव्हा सद्गुरुंचे नाव त्याला धीर देते. सद्गुरु माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरीत करते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.