श्री स्वामी समर्थांची प्रचंड सामर्थ्य देणारी कथा

नमस्कार मित्रांनो,

स्वामी भक्तहो नमस्कार एके दिवशी काही बाईका स्वामींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यातील एक बाई दुसर्‍या बाईला सहज म्हणाली वस्तू पंचपात्रात ठेवली आहे ती घ्या. तिचे हे शब्द स्वामींचे कानांवर पडतात तेव्हा स्वामी महाराज बोधार्थ बोलतात पंचपात्रात जी वस्तू आहे, ती तुला तरी प्राप्त झाली आहे का? प्राप्ती झाली असल्यास वस्तूचे यथार्थ रूप सांग, म्हणजे घ्या म्हणतेस तर घेऊ.

तेव्हा सर्व बायका हसू लागल्या तेव्हा स्वामी सुद्धा हसून बोलले वटवृक्षास भेट, म्हणजे समजेल! स्वामींची अशी आज्ञा होताच बाई वडाच्या झाडाला भेटून आली. आणि स्वामींना विनंती करत सांगू लागली की, पंचपत्र म्हणजे पंचमहाभूतात्मक देह..वस्तू म्हणजे आत्मा, अंतर्यामी सतसमागमरूपी वडाच्या झाडाला भेटताच अनुभव आला आहे.

श्री चरणी नमन करताच महाराज, आपल्या कृपेने मागील दुःखांचा परिहार झाला. मला स्वयंपाक देखील नीट करता येत नाही. मग भक्ती ज्ञान कसे कळणार? जन्मोजन्मी हटयोग, राजयोग करतात. त्यांना आणि उत्तम वेदांतशास्त्र ज्ञानी ह्यांना देखील वस्तूसाक्षात्कार होणे दुर्लभ. मग आमच्यासारख्या चुलीपाशी बसून स्वयंपाक करणाऱ्या अज्ञानी बायांना अनंत जन्मात ब्रह्मचैतन्य अनुभूती अतिकठीण नव्हे काय?

तथापि माझ्या अल्प बुद्धीने असे वाटते की, असार संसारातील सार, वेदशास्त्राचे परमरहस्य..सत्पुरुषांच्या संगतीने तात्काळ प्राप्त होते..हे मी स्वनुभूतीने सांगते. स्वामी भक्तहो त्या बाईचे असे उत्तर ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. स्वामींच्या मात्र सहवासाने तिच्या मुखातून जणू वेदच बोलत आहे हे सर्वांनी अनुभवले आणि सर्वांनी एक गोशात स्वामी नावाचा जयजयकार केला बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

आजच्या लिलेतून आलेला बोध तर अगदी स्पष्टच आहे. आजच्या लिलेत पंचपत्रातील वस्तू म्हणजेच आपले खरे स्वरूप याबद्दल स्वामींनी प्रश्न केला होता. आणि इतकेच नव्हे तर वटवृक्षास भेट म्हणजे तुला समजेल असे उत्तर सुद्धा दिले होते. आणि बघ जेव्हा ती बाई वडाच्या झाडास भेटण्यास गेली तेव्हा तिला समजले कि, स्वामी कुठल्या वडाच्या झाडाबद्दल बोलत आहे. आणि सद्पुरुषांची संघत व श्रीगुरूंची संघत आणि तिची महती सांगत तिने उत्तर दिले.

आणि हे उत्तर तारखीक व पुस्तकातील वाचीव नव्हते स्वानुभवातून आलेले होते. थोडक्यात स्वामींचे श्री गुरुतत्वाचे बोट पकडल्यास मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजे आत्मसाक्षात्कार अगदी सहज शक्य आहे. असे तिने स्वानुभवाने सांगितली आणि स्वतःचे म्हणजेच एका चुलीजवळ स्वयंपाक करणाऱ्या बाईला शक्य आहे तर इतरांना का नाही असे सुद्धा तिने ठामपणे सांगितले.

चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था तुम्ही परीस आहात असा परीस की, ज्याच्या सान्निध्यात आल्यानंतर आलेला सुद्धा परीसच होऊन जातो. आमच्यासारख्या मुढाना तुमची भक्ती दिली, सेवा दिली हेच आमच्यासाठी भरपूर आहे. हे माऊली तुम्हाला इतकीच विनंती आहे की, आता आमच्या मुखात तुमचे नाम असू द्या.

हृदयात तुमचे स्मरण असू द्या आणि आमच्यावर तुमच्या बद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या सेवेची कृपा करा. तुमची सेवा आमच्याकडून निरंतरतेने करून घ्या. हे परब्रह्मा तुम्ही माझे गुरू आहात मला प्रेरणा द्या, मला मार्गदर्शन करा. बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *