श्री स्वामी समर्थ उपदेश… देव आणि विज्ञान

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ स्वामींचा आजचा उपदेश. गोविंद नावाचा एक अभियंता म्हणजेच इंजिनीयर होता. तो क र्त व्य नि ष्ठ आणि तैलबुद्धीचा होता पण तो देव दैव काहीही मानत नव्हता. या जगात विज्ञानापेक्षा श्रे ष्ठ काहीच नाही देव ही संकल्पनाच अस्तित्वात नाही असे त्याचे मत होते.

त्याच्या मते क र्त व्य जगात सर्व काही होतं. पण त्याची पत्नी आणि आई धार्मिक होती. आणि त्या दोघीही स्वामी भक्त होत्या त्या दोघी आणि त्याचे नातलग गोविंदांनी नेहमी समजवण्याचा प्रयत्न करत देवापेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीच नाही. पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता.

एकदा त्याच्या गावात विहीर खणण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम असतो. अभियंता म्हणून गोविंदाच पूजनाचा मान मानकरी ठरवलं जातं पण गोविंद पाटपूजेला पाखल्या म्हणून कुदळ घेऊन पहिला वार जमिनीवर घालायला जातो.

पण कुदळ उचल्यावर गोविंदाच्या छातीत अत्यंत वेदना सुरू होतात. कुदळ त्याच्या हातातून सुटते तिथे उपस्थित गावकरी घाबरून जातात. त्याला अचानक काय झाले असावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो? गावकरी वैद्यबुवाला बोलवतात आणि वैद्य गोविंदाची नाडी पाहतात आणि सांगतात गोविंदाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता.

त्याला हृदयविकाराचा दुसरा सारखा कधी पण येऊ शकतो आणि त्याचे प्राण जाऊ शकते. गोविंद त्याची पत्नी आणि त्याची आई सर्वजण फार दुःखी होतात. सगळ्यांना धक्का पोहोचतो आणि दुसऱ्या दिवशी गोविंद आपल्या घरी अंथरूण घेऊन झोपलेला असतो.

तेवढ्यात स्वामींचा शिष्य भुजंग त्याच्या घरी येतो आणि सांगतो तो या गावी किर्तन करायला आला होता. पण स्वामींनी मला नित्य वेळीस दृष्टांत देऊन सांगितल होत की, गोविंदला घरी जाऊन निरोप दे कि, त्याचा रोग ललिता स्तोत्र वाचल्याने बरा होईल. भुजंग स्वामींचा हा निरोप गोविंदा देऊन निघून जातो.

पण गोविंद विश्वास न करून स्वामी वचन फेटाळून लावतो. त्याच्या घरचे त्याला खूप समजावून सांगतात पण तो ललिता स्तोत्र वाचायला तयार होत नाही. शेवटी त्याची आई त्याला तिची शपथ देते आणि ललिता स्तोत्र वाचायला गोविंदा राजी करते. गोविंद मन नसतानाही ललिता स्तोत्र वाचतो.

तिकडे तिची आई आणि त्याची पत्नी गोविंदाच्या आयुष्यासाठी स्वामींकडे मागणी करतात. दोघेही स्वामींचे अखंड नामस्मरण करतात. गोविंद आणि त्याच्या कुटुंबाचा प्रत्येक दिवस फार कठिणतेने जातो. तीन दिवसाच्या वर होतात पण गोविंदची तब्येत बर्यापैकी असते. नंतर वैद्यबुवा गोविंदची तपासणी करायला पुन्हा येतात.

तेव्हा वैद्यबुवा निदान करून सांगतात की, हे तर चमत्कारच झाला गोविंद पूर्णपणे रोग मुक्त झाला आहे. गोविंद तर थक्कच होतो स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ललिता स्तोत्र वाचल्याने आपण रोग मुक्त झालो आहे हे त्याला कळते. गोविंद त्याची पत्नी आणि त्याची आई तिघेही स्वामी दर्शनाला जातात.

गोविंद स्वामींना म्हणतो की, स्वामी तुमच्यावर माझा विश्वास नव्हता तरीसुद्धा तुम्ही मला रोगमुक्त कसे केले? स्वामी म्हणतात, अरे तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या परिवाराचा तर होताना, अरे आम्हाला आमच्या भक्तासाठी तुला बरं करावा लागले. अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होतं नाही ते खोट आहे असं मानणं चुकीचं आहे.

जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवाचे प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा ईश्वरानेच बनवला आहे. जसे तुम्हा शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते तसेच अ ध्या त्मि क उंची गाठून ईश्वरीय सा क्षा त्का र झालेल्या लोकांना तुमच्यासारख्या ईश्वराला न म्हणणारे पडप मूर्खाची कीव येते.

तर मित्रांनो आपण पाहिलं की, स्वामी आपल्याला उपदेश देतात की, मानवाने विज्ञानावर विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे. पण विज्ञानाला सर्वस्व म्हणून देवाला फेटाळून लावणेही चुकीच आहे. कारण या जगात आजही अशा बऱ्याच गोष्टी आहेत विज्ञानाच्या परेआड आहेत. मनुष्य कर्तव्यनिष्ठ असणं अत्यंत चांगला आहे.

विज्ञानासोबत जगणेही योग्य आहे पण त्याच बरोबर देवाला हे मानणे आणि योग्य वेळ देणे आवश्यक आहे. आपल्या दिवसभरातील फक्त पंधरा मिनिटे देवासाठी खूप होतात जिथे सगळं काही संपतं तिथूनच देवाचा प्रांत सुरू होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *