नमस्कार मित्रांनो,
स्वामी महाराज मंगळवेढ्यात असताना अनेक ठिकाणी जात असे. एकेदिवशी स्वामींची सॉरी चळ आंबे नावाच्या गावात होती. तिथे एक रामदासी बुवांचा मठ होता. स्वामी महाराज त्या रामदासी बुवांच्या मठात गेले आणि बुवांनी स्वामींची स्वागत केले. त्यानंतर स्वामींनी तेथेच भोजन केले. भोजन केल्यानंतर स्वामींना झोप येऊ लागली.
आणि त्यानंतर स्वामींची सॉरी तेथेच गाढ झोपी गेली. आता स्वामी महाराज गाढ झोपलेले होते. परंतु रामदासी बुवांना काहीतरी महत्वाचे कामानिमित्त बाहेर निघायचे होते. आता कसे करावे असा प्रश्न बुवांना पडला. स्वामी महाराज एकटेच आहेत आणि झोपलेले आहे तसेच स्वामींचे झोप मोडायची कशी आणि आपले जाणे सुद्धा गरजेचे आहे. असे अनेक प्रश्न एकदम रामदासी बुवांच्या मनात आले.
त्यावर उपाय म्हणून रामदासी बुवांनी ठरविले की, जाताना आपण मठाच्या दरवाजाचे कुलूप लावून जाऊया आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. जाताना हळूच बाहेरून मठाच्या दरवाज्याला कुलूप लावले आणि आपल्या कामासाठी बाहेर निघून गेली. थोड्यावेळाने स्वामींना जाग येते आणि बगतोय तर काय मठाला बाहेरून कुलूप. स्वामी भक्तहो स्वामी महाराज तर बंधनमुक्त नित्य आनंदमय अवस्था आहे.
ते थोडेच कडी कुलपाच्या बंधनात अडकणार. स्वामी महाराज योगसामर्थ्याने येथून गुप्त झाले आणि भीमेच्या वाळवंटात येऊन बसले. इकडे रामदासी बुवांना काही लोक भेटतात आणि त्यांना सांगतात की, स्वामी महाराज तर बाहेर वाळवंटात बसलेले आहेत. रामदासी बुवांना याचे आश्चर्य वाटले ते बोलतात हे कसे शक्य आहे?
स्वामी मठात झोपलेले आहेत आणि येताना मी बाहेरून कुलूप लावून आलेलो आहे. ही बघा ! किल्ली माझ्याकडे आहे. हे ऐकून लोकांना सुद्धा नवलच वाटले आणि त्यानंतर सर्वजण घाईघाईत मठात आले. कुलूप उघडून बघितले तर खरोखर स्वामी आत नव्हते. हा काय अजब प्रकार आता बुवांना काय करावे सुचत नव्हते.
स्वामींची आगद लीला बघून बुवांच्या हृदयात आनंद भक्तीचा भाव दाटून आला. आणि तर धावतच वाळवंटात आले. स्वामींचे चरण घट्ट पकडले त्यानंतर स्वामींनी त्यांच्याकडे प्रेमभावाने बगत संकेत्मक बोध देत सांगितले अरे, आम्ही सर्वत्र आहोत. त्यानंतर बुवांच्या मनात असलेली स्वामी म्हणजे शरीर आहे. हा देह बुद्धित्मक सूक्ष्म अज्ञान विलीन झाला. आणि सर्वांनी एक घोषात स्वामींचा जयजयकार केला.
बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची लीला तर खूपच प्रेरक आहे. आजच्या लिलेतून स्वामींनी योग सामर्थ्याच्या बळावर केलेला च म त्का र हजारो-लाखो पिढ्यांसाठी असंख्य बोध देत आहे. बघा आजच्या लिलेत रामदासी बुवा स्वामींना एक सामान्य साधू व संन्यासी व मानवी शरीर समजत होते. आणि हे स्वामींबद्दलचे अज्ञान दूर करुन व बुवांना अध्यात्माच्या वरच्या वर्गात स्वामींना पाठवायचे होते.
आणि म्हणूनच स्वामींनी ही लीला केली. आणि बुवांना स्पष्ट बोध दिला अरे, मी निर्गुण निराकार अवस्था आहे. मी बंधन मुक्त आहे मी चराचरात व्यापलेलो आहे. मी प्रत्येक ठिकाणी क्षणोक्षणी उपस्थित आहे. स्वामी भक्तहो म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी आजच्या लिलेतून बोध घेता आज जर आपल्या मनात स्वामींबद्दल अज्ञान असेल तर ते दूर करायचे आहे. स्वामी महाराज निर्गुण निराकार परमय आनंदमय व्यवस्था आहे.
ही समज दृढ करायची आहे. स्वामींनी आपल्यासाठी शरीररूपी वस्त्र धारण केलेले आहे. या स्वामींच्या आजानूबाहू तेजस्वी शरीराची चिंतन मनन करून, ध्यान करून हृदयात नित्य उपस्थित असणाऱ्या स्वामींच्या मूळ निर्गुण निराकार आनंद स्वरूपाचा अनुभव घेऊन दर्शन करायचे आहे. आणि याची सुरुवात स्वामी नामानेच करायची आहे. स्वामींना नित्य मुखात जपत हृदयातील हरिहरावर आपले चित्त स्थिर करून दैनंदिन जीवनातील आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे आहे.
आणि संसार करता करता स्वामींना अपेक्षित समृद्ध आनंद जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे.चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्थ तुम्हाला कोणतीच सीमा नाही बंधन नाही म्हणून तुम्हाला ‘असीम’ म्हणतात. तुमच्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही म्हणून तुम्हाला ‘अनंत’ म्हणतात. तुमचे अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे की, वेदसुद्धा ‘नेती नेती’ बोलतात.
हे श्री स्वामी समर्थ तरीही तुम्ही आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रगट होतात. आम्हाला आधार देतात तुम्हाला आनंद कोटी धन्यवाद. हे परब्रम्हा तुमचे नाम सतत या मुखात ठेवा. हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद द्या आणि तुम्हाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घ्या.हे दत्तात्रेया तुम्ही माझे गुरु आहात, मला मार्गदर्शन करा, मला प्रेरणा द्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.