नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजची डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट सांगण्यास सुरुवात करते. फादर्स डे म्हणजे वडिलांचा दिवस. फादर्स डे ला म्हणे वडिलांचा फोटो स्टेटसवर ठेवायचा असतो. पण मित्रांनो वडिलांचा दिवस नसतो तर वडिलांमुळे आपला प्रत्येक दिवस असतो. आम्ही ठरलो जुन्या नव्या विचारांच्या वळणावरचे. तर आज मी तुम्हाला अशी 1 गोष्ट सांगणार आहे की गोष्ट ऐकताना तुमचे वडील नकळतच तुमच्या डोळ्यासमोर येतील.
छोटा रोहन वर्षभराचा झाला नसेल तेव्हा दिनेशची बायको त्याला सोडून गेली. तिला म्हणे छोट्या गावात ऍडजेस्ट झालं नाही. दम कोंडायचा, तिने दुसरीकडे घरोबा देखील केला होता. पण मागे 2 मुले सोडून गेली. मोठी रश्मी आणि लहानगा रोहन. दिनेशचे त्याच्या बायकोवर इतके प्रेम होते की, त्याने आपल्या मुलांचे इनिशियल बायकोच्या नावावरून ठेवले होते. आई अनेक लेकरांना सांभाळू शकते. पण बापाला मुलांना सांभाळणे म्हणजे दिव्याकर्मच.
आईची माया आणि बापाचा आधार आता सगळं काही त्यालाच करायचे होते. सकाळी लवकर उठून पाणी आणणे त्यानंतर मुलांसाठी जेवण बनवणे आणि मग एक घास काऊचा आणि एक घास चिऊचा असं करत भरविणे. आणि त्याच्या दिवसाची सुरुवात होती. मुलांची आबाळ होऊ नये म्हणून त्याला त्याचा जॉब सोडावा लागला. आणि मग वडिलांनी मागे ठेवलेली सहा एकर जमीन कसायचा त्यांने निर्णय घेतला. त्यावेळी रश्मी पहिलीत गेलेली होती.
रोहनला सोबत घेऊन तो रानात जायचा आणि दिवसभर काबाडकष्ट करायचा. रोहनला झाडाच्या झोळीत झोपवून काम करताना देखील त्याचे सगळे लक्ष तिकडेच असायचे. हळूहळू दोन्ही लेकरे मोठी होत होती. तशी आई म्हणून दिनेशची जबाबदारी वाढत होती. नेहमीच पुढे हवे मागे कितीही संकटे येऊ देत तरी पुढे पाहून कसे जगायचे हे त्याने आपल्या मुलांना शिकवले होते. रश्मी हळूहळू बापाला घरच्या कामात मदत करायला लागली होती.
चौथीमध्ये असताना ती घरातली सगळी कामे करायला लागली. वर्षामागून वर्षे जात होती. स्वतः फाटके कपडे घालून राहील पण आपल्या लेकरांना दिनेश कधीच काही कमी पडू देत नव्हता. रोहनला तर कोणतीही गोष्ट त्याने कमी पडू दिली नव्हती. पोरगादेखील हुशार होता. रश्मी आता कॉलेजमध्ये जायला लागली होती. एक चांगले स्थळ चालून आले आणि एके दिवशी चांगला मुहूर्त पाहून थाटामाटात त्याने पोरीला आपल्या सासरी पाठवले.
रोहनला देखील बापाच्या कष्टाचे चांगलीच जाणीव होती. आई नसताना बापाने त्याला आईची माया कधीच कमी पडू दिली नव्हती. रात्रंदिवस कष्ट करून त्याने पोराला शिकवले होते. पोरानेदेखील चांगला अभ्यास केला आणि एकेदिवशी एका खूप मोठ्या कंपनीमध्ये पुण्यात कामाला देखील लागला. पण उन्हाळ्यानंतर पावसाळा हा येतोच तसं काहीच झालं. एक वर्ष खूप चांगले गेलं. पण हळूहळू मुलाने बापाकडे पाठ फिरवली. वडिलांना येणारे पैसे देखील अनेक दिवस त्याने पाठवले नव्हते.
एकुलता एक मुलगा साधी चौकशी देखील करेना म्हणून दिनेशला घशाखाली घास देखील उतरत नव्हता. ज्यावेळी पहिल्यांदा मुलाला पुण्याला कॉलेजमध्ये सोडायला तो गेला होता तेव्हा आपल्या मुलांना शंभर रुपये जादा देता यावे म्हणून तो जेवला देखील नव्हता. पण त्यावेळी मारलेली ती भूक त्याला कधीही जाणवली देखील नव्हती. ती भूक समाधानाची होते पण आत्ताची..! कष्ट तर त्याच्या पासवीला पुजलेले होते पण त्यात समाधान लागत नव्हते. कित्येक रात्री त्याच्या विचारात जात होत्या.
एकेदिवशी लेक माहेरला आली. दिनेश काही बोलला नाही पण लेकीला बापाचे दुःख दिसले होते. तिला खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा रोहनने एका टॉवरमध्ये फ्लॅट घेतला आहे ही गोष्ट बापाला सांगितली नाही. जेव्हा तिच्याकडून ही गोष्ट बापाला कळाली तेव्हा त्याच्या डोळ्यातून न पडलेला थेंब कितीतरी जास्त वेदनादायक होता. ज्या जन्मदात्याने आई नसताना देखील आईची माया कधीच कमी पडू दिली नव्हती. मुलांसाठी काहीही विचार न करता चांगला जॉब सोडला होता. कधीच कशालाही नाही म्हटले नव्हते अशा या बापाला आपली मुले विसरतात.
या गोष्टीच सगळ्या गावाला वाईट वाटलं होतं. रश्मीच ठीक आहे तिला सासर सांभाळायचं होतं. तरी बिचारी वेळ भेटेल तेव्हा आपल्या बापाला भेटायला येत होती. पण रोहनच काय? काही दिवस गेले आणि अशाच एका सकाळी बापाने जगाचा निरोप घेतला. त्याच्या खिशात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते की, येवढे प्रेम करून एवढा जीव लावून मला काय भेटले? एक बाप म्हणून माझे काय चुकले, मी कुठे कमी पडलो.
देवा मी खरंच आभारी आहे की मला तू एक मुलगी दिलीस. अशी मुलगी सर्वांना दे. एका झाडाची सगळी फळे तितकीच गोड असतात ना, मग माझा मुलगा मला का विसरला? हे पाहून सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. एक शापित बाप, एक शापित मनुष्य त्याचा शाप संपवून स्वर्गाला निघाला होता. मित्रांनो आपले आई वडील हे साक्षात समर्थांचे रूप आहेत. आज ते आहेत म्हणून आपण आहोत. तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा. आई-वडिलांची सेवा करणं म्हणजे साक्षात समर्थांची सेवा करण्यासारखा आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.