नमस्कार मित्रांनो,
बॉलीवूडचा लोक प्रिय हिरो शक्ती कपूरचं खर नाव सुनील शिकंदर लाल कपूर आहे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. परंतु चित्रपटात आल्यानंतर व्हीलनच्या भूमिकेला
साजेल अस नाव दिसण्यासाठी आपलं नाव शक्ती कपूर ठेवलं.
3 सप्टेंबर 1958 ला दिल्लीच्या एका पंजाबी कुटूंबात शक्ती कपूर यांचा जन्म झाला. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप संघर्ष देखील केलेला आहे. त्यांच्या वडिलांचे नवी दिल्लीत कपड्याचे दुकान होते. तेथे शक्ती
कपूर कपडे शिवण्याचे काम करत होते.
जेव्हा सुनील दत्त आपला मुलगा संजय दत्त याला चित्रपट
सृष्टीत लॉन्च करण्यासाठी रॉकी चित्रपट बनवत होते तेव्हा त्यांनी शक्ती कपूरला पाहिल्यावर खलनायकासाठी त्यांची निवड केली. शक्ती कपूरला हिंदी चित्रपटात अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.
परंतु त्यांच्या विलनवाल्या भूमिका प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या फॅनच्या जास्त लक्षात राहिले. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका सुद्धा केलेल्या आहेत. गोविंदासोबत त्याची जोडी खूप गाजलेली आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, शक्ती कपूर जवळ जवळ सातशे पेक्षा चित्रपटात काम केलेलं आहे.
शक्ती कपूरचं लग्न बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्रीच्या बहिणीशी झालेलं आहे. दोघांचे लग्नसुद्धा एका चित्रपटाला शोभेल पद्धतीने झालं आहे. ते कसे झाले आणि ती कोण आहे अभिनेत्री आपण बघुयात.
शक्ती कपूरच्या चित्रपट करिअरबद्दल सर्वांना जवळ जवळ माहिती आहे. तुम्हाला श्रद्धा कपूर यांच्याबद्दल देखील माहिती असेल, परंतु आज आपण शक्ती कपुरांची
पत्नी आणि दोघांचे कशापद्धतीने लग्न जमले याविषयी जाणून घेणार आहोत.
शक्ती कपूर यांच्या पत्नीचे नाव शिवांगी कोल्हापुरेआहे.
या नावावरून तुम्ही ओळखलं असेल.होय शिवांगी कोल्हापुरे या बॉलिवुडच्या ८० व्या शतकातील अतिशय लोकप्रिय अशा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या बहिण आहेत. शक्ती कपूर आणि शुभांगी कोल्हापुरे यांचे लग्न 1982 मध्ये झाले होते.
असं बोललं जातं की या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. शिवांगी कोल्हापुरीचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. शिवांगी कोल्हापुरे यांच्या वडिलांचे नाव पंढरीनाथ कोल्हापुरे आणि आईचे नाव अनुपमा कोल्हापुरी. पंढरीनाथ कोल्हापुरे हे क्लासिक गायक होते.
शुभांगी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून सुरुवात केली. त्यानंतर तिने बॉलिवुडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. काहीश्या मोजक्याच चित्रपटात तिने काम केले आहे. शिवांगी कोल्हापुरे यांचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झाले.
काही फिल्मी पद्धतीचा किस्सा म्हणून शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांचा प्रेमविवाह ओळखला जातो. शिवांगी आणि शक्ती कपूरची भेट “किस्मत” चित्रपटाच्या दरम्यान झाली. ही भेट सुद्धा एक मनोरंजकंपने झाली होती.
एका प्रोड्युसरला “किस्मत” चित्रपटाच्या वेळी पद्मिनी कोल्हापुरी यांना चित्रपटांसाठी साइन करायचे होते. परंतु त्यावेळी पद्मिनी कोल्हापुरे व्यस्त असल्यामुळं प्रोड्युसरने
पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे हिला साइन केलं. आणि या चित्रपटाच्या सेटवर शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरमध्ये प्रेम झाले.
शिवांगी कोल्हापुरे यांच्या आई वडिलांना हे मात्र मंजूर नव्हतं आणि त्यावेळी या दोघांच्या लग्नाविरुध्द होते. यानंतर शिवांगी कोल्हापुरे यांनी 18 वर्षाच्या वयातच शक्ती कपूरसोबत कोर्टात लग्न केलं. लग्नानंतर शिवांगी कोल्हापुरे यांनी चित्रपटात काम करणं बंद केलं.
शिवांगी कोल्हापुरे आणि शक्ती कपूर यांना 2 मुलं आहेत तर, एक म्हणजे श्रद्धा कपूर आणि दुसरा सिद्धांत कपूर. हे कुटुंब आता सुखी जीवन जगता आहेत. किस्सा होता हिंदी चित्रपट सृष्टीतील खलनायक शक्ती कपूर आणि मराठीमोळ्या अभिनेत्री शिवांगी कोल्हापुरे यांचा प्रेम विवाह.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या नक्की शेअर करा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.