शाकंभरी नवरात्रोत्सवाची पूजा कशी करावी?

नमस्कार मित्रांनो,

पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होते. शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत असतं. आश्विन महिन्यातील नवरात्र इतकच शाकंभरी नवरात्रचही खूप महत्त्व आहे.

देवी शाकंभरीला आदिशक्तीचेच एक रूप मानलं आहे. देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपांचे वर्णन केले गेले आहे त्यातीलच एक महत्त्वाचं रूप हे आहे. शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णाची साधना केली जाते. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की, शाकंभरी देवी म्हणजे अन्न देवता. संपूर्ण ब्रह्मांड देवीच मुल आहे.

चला जाणून घेऊयात देवीच्या या अनोख्या रूपाची कथा आणि शाकंभरी नवरात्रातील पूजा विधीबद्दल. एकदा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस न झाल्याने दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीच स्तवन केलं.

त्यांच्यावरील संकट बघून देवीनं अयोनीज्याचं रूप घेतलं. या उतारा देवीला 100 डोळे होते. आपल्या 100 डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख बघितले. त्यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकट झाली. देवीचं हे विराट रूप होतं.

या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाड आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीने आपल्या शरीरावरील भाज्या आणि झाडांनी सर्वांचे प्राण वाचवले. शाकंभरी नवरात्रीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आवरून आंघोळ करावी.

स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावे. मातीच्या भांड्यात बाजरीचे बी पेरावे आणि त्यावर पाणी शिंपडावे. शाकंभरी नवरात्राच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर कलशाला लाल रंगाचे कापड गुंडाळून पूजास्थानी त्याची स्थापना करावी. कलशामध्ये गंगाजल भरून त्याला आंब्याची 5 पानं आणि जटा असलेल नारळ त्यावर ठेवावा.

नारळाला लाल ओढणी बांधा. आता फुल, हार, कापूर, अक्षतांनी देवीची पूजा करा. पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्या आणि 60 कोशिंबीरिंचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा सुध्दा आहे. म्हणूनच या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात. नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर घट विसर्जन करा आणि नंतर कलश उचला.

शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी अस सुद्धा म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते. आपल्या लेकरांच संरक्षण करण्यासाठी आदिमाया आदिशक्ती वेगवेगळी रूपे धारण करत असते,

आणि त्यातीलच एक आई जगदंबेच शाकंभरी हे एक रुप आहे. यामध्ये देवीने अन्नपूर्णा बनवून संपूर्ण जगाचा पालन पोषण केलं. मित्रांनो तुम्ही सुद्धा आई जगदंबेच्या भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *