नमस्कार मित्रांनो,
101बेलपत्राचा हा उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुमचे आयुष्य या उपायाने सुखी होईल. श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण हा शंकरांचा महिना मानला जातो. अगदी पवित्र पावन असा हा महिना असतो. या महिन्यात सोमवारचे अधिक जास्त महत्व असते.
परंतु 101 बेलपत्राचा उपाय श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता. पण सोमवारी केला तर अतिउत्तम समजला जातो. मित्रांनो 101 बेलपत्र तुम्हाला या उपायांसाठी लागणार आहेत. तर 101 बेलपत्रांपेक्षा 1 बेलपत्र जास्त नाही किंवा 1 सुद्धा कमी नाही.
तुम्हाला 101 बेलपत्र घ्यायचे आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकता. घरात फक्त शिवलिंग हवे आणि ज्यांच्याकडे शिवलिंग नाही आहे ते सुद्धा हा उपाय करू शकतात. फक्त 1 पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर चौरंगावर ॐ नमः शिवाय खडूने किंवा रांगोळीने लिहायचे आहे.
ते लिहल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचं आहे. ज्यांच्या घरात शिवलिंग आहे त्यांनी फक्त पाटावर शिवलिंग ठेवायचं आहे. अशा रीतीने तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळी करायचं आहे म्हणजे 10 – 11 वाजण्याच्या आत हा उपाय तुम्हाला करायचे आहे. हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळीस करायचं आहे.
कोणत्याही श्रावण महिन्याच्या दिवशी करू शकता. 101 बेलपत्र घेऊन तुम्हाला त्या पाटासमोर बसायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात आधी अगरबत्ती, दिवा लावून हात जोडून महादेवाला प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती बोलू शकता. जे संकट तुमच्यावर आलेले आहे ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला 1 बेलपत्र उचलून त्या शिवलिंगावर ठेवायचे आहे किंवा ॐ नमः शिवाय लिहल आहे त्यावरती ठेवायचं आहे. पण 1 बेलपत्र उचलून ठेवताना तुम्हाला हळूवार सावकाश पणे
ॐ नमः शिवाय बोलून ते बेलपत्र त्या नावावर किंवा शिवलिंगावर ठेवायचे आहे. पुन्हा दुसरे उचलून त्याच पद्धतीने ॐ नमः शिवाय बोलून ठेवायचं आहे.
कोणत्याही प्रकारची घाई न करता ही प्रार्थना करायची आहे. तुम्ही एक एक बेलपत्र उचलून ॐ नमः शिवाय असे बोलून बेलपत्र ठेवत जायचे आहे. असे 101 ॐ नमः शिवाय वेळा बोलायचं आहे आणि 101 बेलपत्र त्या शिवलिंगावर ठेवायचं आहे. ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी दिवसभर, रात्रभर तो पाट तसाच ठेवायचं आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर पुन्हा अगरबत्ती, दिवा लावून प्रार्थना करायची आहे. आणि 1 बेलपत्र तिथून घेऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. 1 बेलपत्र घ्यायचं आणि आपल्या पाकिटात ठेवायचं. बाकी सर्व बेलपत्र तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे.
अशा पद्धतीने श्रावण महिन्यात 101 बेलपत्राचा हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.