नमस्कार मित्रांनो,
उद्या श्रा व ण अमावास्या. म हा रा ष्ट्रा त हा दिवस पोळा किंवा मातृ दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या दोन महत्त्वाचे ग्रह राशी बदल करणार आहेत. 6 तारखेला रात्री 4 वाजून 22 मिनिटांनी मंगळ कन्या या त्याच्या शत्रू राशीत प्रवेश करेल. तिथे तो 22 ऑक्टोबरपर्यंत असेल. तसंच शुक्र तुला या त्याच्या उ च्च राशीत रात्री 1 वाजून 05 मिनिटांनी प्रवेश करेल. तिथे तो 2 ऑक्टोबरपर्यंत असेल.
जेव्हा दोन महाबलाढ्य ग्रह राशी प रि व र्त न करतात तेव्हा मोठे बदल किंवा घडामोडी आं त र रा ष्ट्री य स्तरावरदेखील संभवतात. अमावस्येच्या अशुभ प्रभावातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
गुरू शनि हळूहळू मार्गी अवस्थेत येत आहेत. सूर्य सिंह या स्वराशीत आहे. बुध कन्येचा उच्च फळ देणार आहे. राहू वृ ष भ राशीत तर केतू वृ श्चि के त असणार आहेत. हे ग्रहमान सर्व राशींना काय फळ देईल ते बघुया.
मेष
राशी स्वामी मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार असून तो ष ष्ठ स्थानात बुध ग्रहांसोबत येईल. प्रकृती चिंता वाढेल. त्वचा रोग व अॅलर्जीसंबंधी विकार डोकं वर काढतील. रक्तदाब असणार्या व्यक्तीनी जपून राहावं. शत्रू नि र्मा ण होतील. मात्र सप्तम शुक्र वै वा हि क जीवनात सौ ख्य व आनंदाचे वातावरण निर्माण करेल. नवीन विवाह ठरतील. कुंभ गुरू अतिशय शुभ फळ देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात प्रगती, नवीन संधी मिळतील. व्यवसाय धंद्यात अनेक लाभ होतील. एकूण आठवडा शुभ फळ देईल.
वृषभ
राशीतील राहू मंगळ नव पं च म योग करीत आहे. राशि स्वामी शुक्र हा ष ष्ठ स्थानात प्रवेश करेल. गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात.
संतती चिंता, पोटासंबंधी विकार त्रास देतील. प्रकृतीची काळजी घ्या. आ र्थि क नियोजन करण्याची गरज आहे. पैसा टिकणार नाही. कार्यक्षेत्रात नेहमीपेक्षा अधिक काम पडेल. स्वभाव जरा रागीट होण्याची शक्यता आहे. पू र्वा र्ध अनुकूल. मंगळ जप व दान करावे.
मिथुन
राशी स्वामी बुध कन्या या उच्च राशीत असून तिथे येणार्या मंगळ ग्रहाला शुभत्व प्र दा न करेल. चतुर्थ स्थानात होणारी ही ग्रह स्थिती घरांमध्ये नवीन घडामोडी करेल. मातृ चिंता सतावू शकते. नवीन वास्तुसंबंधी निर्णय होईल. ऑफिसमध्ये जास्तीचे काम पडेल. वाहन दुरुस्ती किंवा खरेदी होईल. पंचमात येणारा शुक्र संततीसंबंधी शुभ समाचार देईल. उच्च शिक्षणासाठी अतिशय शुभ फळ देईल. भाग्य स्थानात गुरू, अ ध्या त्मि क साधना फ ल द्रु प होईल. आठवडा मि श्र फळ देणारा ठरेल.
कर्क
चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा शुक्र गृ ह सौ ख्य उ त्त म देईल. घरात नवीन वस्तू खरेदी कराल. नोकरीसाठी फार चांगला काळ आहे. आईवडील तुमच्यावर फार खूश राहतील. मंगळाचा प्रवेश राशीच्या तृ ती य स्थानात होणार आहे. संभाषण चातुर्य कमालीचं वाढेल. वकील, कलाकार यांना उत्तम राहील. पण कटू शब्द, वाद टाळा. त्याने गैरसमज होतील. प्रवास योग आहेत. जरा जपून, गुरू अ ष्ट मा त आहे. उपासना करीत रहा.
सिंह
धन स्थानात प्रवेश करणारा मंगळ खर्चात अतोनात वाढ करेल. वाणी कठोर होईल. कुटुंबात कलह होण्याची शक्यता. कटू वचन टाळा. डोळ्याचे त्रा स संभवतात. गुरु बळ आहे. त्यामुळे निभावून न्याल. तृ ती य स्थानात येणारा शुक्र कलाकारांना शुभ फळ देणारा ठरेल. तुमच्या बुद्धीचा वापर करून एखाद्या नवीन कामाला गती द्याल. प रा क्र म व चिकाटी वाढवेल. नवीन कलेमध्ये रुची नि र्मा ण होईल. एकूण मि श्र फळ देणारा सप्ताह आहे.
कन्या
राशीत प्रवेश करणारा मंगळ व बुध स्वभाव आ क्र म क करतील. प्रकृतीकडे लक्ष असू द्या. स्त्रियांनी काही विशेष तक्रार असेल तर लवकर तपासणी करा. गुरु कृपेचा लाभ होईल. धन स्थानात येणारा शुक्र अतिशय सुंदर फळ देईल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कपडे दागिने खरेदी कराल. गुरु नोकरीसाठी प्र य त्न केला तर यश मिळवून देईल. एकूण आठवडा शुभ फळ देईल.
तुळ
राशी स्वामी शुक्राचा स्वगृही प्रवेश अ त्यं त आनंद देणारा ठरेल. सौंदर्यात वाढ, सौ म्य आ क र्ष क व्यक्तिमत्त्व बहाल करेल आ र्थि क स्थिती चांगली राहील. मात्र मंगळ बुध व्यय स्थानात खर्चात वाढ करणार आहेत. आरोग्याच्या समस्या व त्यासाठी खर्च करावा लागेल. संतती सुख उ त्त म मिळेल. अष्टम राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. कलाकारांना शुभ फळ देणारा काळ आहे. आई वडीलांचे आ रो ग्य सांभाळा.
वृश्चिक
राशी स्वामी मंगळ बुध लाभ स्थानात एकत्र होणार असून संततीसाठी काही महत्त्वाचे नि र्ण य घ्यावे लागतील. व्ययस्थानातील शुक्र परदेश प्रवास, मौजमजेसाठी खर्च असे फळ दर्शवतो आहे. रागावर नियंत्रण राहू द्या. गृ ह सौ ख्य उत्तम राहील. उ त्त रा र्ध जरा जपून राहण्याचा संकेत देतो आहे.
धनु
दशमात प्रवेश करणारा मंगळ अनेक सुसंधी उपलब्ध करून देईल. वडीलांच्या प्रकृतीची कुरकुर राहील. आर्थिक बाजू ठिक राहील. घरातील मोठ्या व्यक्तींना जपा. भावंडाची उ त्त म साथ मिळेल. लाभ स्थानात येणारा शुक्र मित्र मैत्रिणींपासून लाभ दर्शवतो. संतती सुख उत्तम. गुरु कृपा राहील. स प्ता ह शुभ आहे.
मकर
आ र्थि क लाभ करून देणारा हा स प्ता ह आहे. गुरु शुक्र नव पंचम योग करीत आहेत. प्रतिष्ठा वाढेल. शुभ कार्य घडतील भाग्यात मंगळ बुध शुभ फळ देणारा ठरेल. धा र्मि क गोष्टीमध्ये मन रमेल. प्रवास छोटे किंवा मोठे फल देणारे ठरतील. अधिकारी व्यक्तीशी परिचय होतील. आरोग्य ठिक राहील. घरातील शांतता भंग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. उ त्त म सप्ताह.
कुंभ
अष्टमात प्रवेश करणारा मंगळ प्रवासात जपून रहा असं सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. शत्रू टपले आहेत. स्थान बदल संभवतो. उ च्च शुक्र अनेक प्रकारे भाग्याचे मा र्ग मोकळे करेल. करार सफल होतील. आ र्थि क बाजू चांगली राहिल. आरोग्य थोडे जपा. काहींना भावंडाची चिंता सतावू शकते. मात्र गुरु सर्व चिंता हरण करेल. मिश्र फळ देणारा स प्ता ह.
मीन
जोडीदाराला जपा, सोबत प्रवास, खरेदी, खर्च असा आठवडा आहे. अ ष्ट मा त येणारा शुक्र उच्च शिक्षण, गूढ शास्त्राची आवड निर्माण करणार आहे. आ र्थि क स्थिती उ त्त म राहिल. मधुमेही व्यक्तीनी जपून राहावं. शत्रू वर मात करणार आहात. उत्तरार्ध अनुकूल. गुरु उपासना करावी. शुभम भवतु!!
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.