सामुदायिक प्रार्थनेच्या बळाने स्वामींनी मृत्यूच्या दारातून बाहेर आणले.

नमस्कार मित्रांनो,

मी दिलीप शिवाजी शिंदे रा. विंचुरी दळवी ता. सिन्नर जि. नाशिक दिनांक 25-12-2013 रोजी नेहमीच दैनंदिन नियमानुसार सकाळी 9 वाजता माझ्या घरापासून दोन किमी असणाऱ्या माझ्या शेतात जाण्यासाठी पत्नी समवेत रिक्षा घेऊन निघालो. मळ्यात पोहोचल्यावर काम करण्यास सुरुवात केली. सकाळी 10 वाजेच्या सुमारास मला मण्यार जातीच्या सापाने दंश केला.

विजेचा झटका जसा बसावा तसे मला जाणवल्यावर मी बघितले की दंश झालेला होता. माझ्या शेजारी काही अंतरावर काम करत असलेली माझ्या पत्नीला आवाज दिल्यावर मी बाजूला असलेल्या रस्त्यावर चालत आलो आणि माझी रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो. परंतु त्यानंतर अचानक बेशुद्ध झालो. तोपर्यंत पत्नी माझ्यापर्यंत पोहोचलेली होती. तिने आरडाओरडा करायला सुरवात केली. तोपर्यंत माझ्या तोंडातून फेस आलेला होता.

त्याच वेळेस रस्त्यावरून जाणाऱ्या पैकी ज्येष्ठ समाजसेवक शांताराम ढोकणे यांनी गाडी थांबून सर्व परिस्थिती बघितली. त्यांनी लगेच त्यांच्या गाडीत टाकून मला ते कॅम्प येथील कँटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. माझी परिस्थिती नाजूक होती. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर व्हेंटिलेटरची सोय नसल्या कारणाने मला पुढील संत कृपा या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मला फक्त 10 मिनिटांची मुदत दिली होती.

संत कृपा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सर्प मित्र बिस्मिल्ला यांनी डॉक्टरांनी सांगितले की, मण्यार जातीच्या सापाने दंश केले आहे. परंतु त्यासाठीची लसचा पुरेसा साठा शिल्लक नसल्याने खूप मोठं संकट ओढवल होतं. त्यानंतर मग घरी स्वामी शक्ती सेवेकरी परिवाराच्या रुपात उभी राहिली. सर्व सेवेकरी हॉस्पिटलमध्ये जमा झालेली होती. घटनेचे गांभीर्य बघता सर्व सेवेकरी परिवाराने स्वामींना विनंती केली.

आणि सामुदायिक स्वामी नाम घेत अतिशय उत्कृष्ट नियोजन करून 3 ते 4 गाड्यांचे नियोजन केले आणि पहाटे 3 वाजेपर्यंत 70 ते 80 किमी प्रवास करून सभोवताली असलेल्या 15 ते 20 गावांमधून सरकारी हॉस्पिटलमधून 40 लस उपलब्ध केल्या. सामुदायिक प्रार्थना नाम जप आणि सेवेकरी परिवाराने दाखवलेली तत्परता आणि त्यामुळेच मला योग्य वेळी मिळालेल्या उपचार या सर्वांच्यामुळे मी आज आपल्यासमोर जिवंत आहे.

खरंतर मी जिवंत राहिल ह्याची आशा सर्वांनी सोडली होती. मला आपल्याला सांगावेसे वाटते की, सामुदायिक नामात सेवेत प्रार्थनेत खूप ताकद आहे. स्वामींनीच सर्वांना बुद्धी दिली आणि सर्वांकडून सामुदायिक प्रार्थना सेवा करून घेतली आणि योग्य वेळी योग्य उपचार मिळवून डॉक्टरांना निमित्त करून मला जीवनदान दिले.

आजचा अनुभव बोध : सामुदायिक सेवेत खूप शक्ती आहे. आपण सर्व जेव्हा आपण एका स्वरात स्वामींना आळवतो त्या वेळेला जे तरंग निर्माण होतात त्यात विलक्षण शक्ती असते. आणि त्या शक्तीच्या जोराने स्वामींची प्रकृती सर्व सहज आणि सोपे करत असते. जसे वरील श्री दिलीप सरांच्या बाबतीत घडले. त्यांना उपचारासाठी सर्व गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपलब्ध झाल्या आणि त्यांच्यावरील अनर्थ टळला. म्हणून आपण सर्वांनी सामुदायिक स्वामी नाम जपत सहभागी व्हा ही विनंती आहे. किंबहुना हा अट्टहास आहे. कारण आपल्यासाठी असंख्य स्वामी भक्त नाम घेत आहेत हा विश्वास निर्माण होतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *