रात्री उशिरा झोपणाऱ्यांनो सकाळी लवकर उठायचे आहे तर हे नक्की वाचा

नमस्कार मित्रांनो,

सकाळी लवकर उठणं ही जगातील सर्वात चांगल्या सवयी पैकी एक सवय आहे. जगातील सर्वच सक्सेसफुल माणसं सकाळी लवकर म्हणतात. तुम्ही सकाळची सुरुवात कशी होते, यावर तुमच्या दिवसाचे गणित अवलंबून असते. त्यामुळे सुदृढ आरोग्य हवे असेल तर तुम्हाला पहाटे लवकर उठावे लागेल आणि जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर तुम्ही फार लवकर यशस्वी होणार आहात.

हा जो प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. त्यातल्या त्यात झोप जर पहाटेची असेल ना तर प्रत्येकाला ती हवीहवीशी असते. सध्या कड्याक्याची थंडी पडत आहे. या दिवसात रात्र कशी संपते हे कळतही नाही. पहाटेची झोप कधी संपुच नये असं वाटतं. सकाळी मेंदूची म्हणजे ब्रेनची काम करण्याची क्षमता ही जास्त असते. मग ते चांगल्या कामांसाठी सकाळची वेळ ही सगळ्यात बेस्ट असते.

इतक्या वर्षांमध्ये कधीच झालं नाही की, मी उगवणाऱ्या सूर्याला पाहिलं नाही कारण मी रोज पहाटे चार वाजता उठतो आणि हेच माझ्या यशस्वी होण्याचे रहस्य आहे. हे वाक्य आहे फेमस बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचं. या जगात जितके सक्सेसफुल माणसं आहेत ना त्यातले बरेचसे सकाळी लवकर उठतात. सकाळी लवकर उठल्याने तुमच्या शरीराची प्रोडक्टविटी इनक्रिज होते.

आणि प्रोडक्टविटी तुमच्या मेंदूला तलगं बनवते. त्यामुळे तुमची मेंटल पावर ऑफ कॅपिसिटी वाढायला लागते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला दिवसातले काही तास हे जास्तीचे म्हणजे एक्सट्रा मिळून जातात. तुम्ही सकाळी लवकर उठण्यासाठी कितीही मोटिवेशनल व्हिडीओ पाहिलेत ना तरीही तुम्ही लवकर उठणारच नाहीत.

जेव्हा तुम्ही सकाळी झोपेत असता तेव्हा तुम्हाला कोणी आवाज देत असतं. तुमच्या मनात हेच येत असतं का? इकडचे तिकडे जरी झालं तरी मी लवकर उठणार नाही. सकाळी लवकर न उठणाऱ्यांचा हाच प्रॉब्लेम असतो की, त्यांना सकाळी लवकर उठल्यावर खूप आळस येतो आणि पूर्ण दिवस बोरिंग जातो.

तुम्हाला 100% हे वाटत असेल की, लवकर उठून माझा काय फायदा आहे. माझी झोप पण पूर्ण होत नाही. तुम्हाला लवकर उठण्यासाठी सर्वात आधी तुमची झोप पूर्ण करणं जास्त महत्वाचं आहे. सकाळी सकाळी लवकर उठल्यावर फ्रेश फील जास्त गरज आहे हे जाणून घेण्याची की, तुम्हाला किती वेळेची रेस्टची आरामाची गरज आहे.

असे आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी म्हटलं गेलं आहे की, सात ते आठ तास झोपले पाहिजे याचं ठाम उत्तर कोणाकडेच अवेलेबल नाहीये. कारण कधी कधी अर्धा तास आराम जरी केला तरी आपण फ्रेश होतो आणि एक वेगळीच रिफ्रेशमेंट येत असते. कमीत कमी वेळेत एक चांगली झोप घेण्यासाठी मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करणार आहे.

रात्री झोपल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही डोळे बंद करता ना तेव्हा पाच मिनिटे दहा मिनिटं होऊन जातात पण झोप काही लागत नाही. कारण मनात सारखे कोणते ना कोणते विचार सारखे टेन्शन सतावत असतात. दिवसभराच्या काही इन्सिडेंट तुमच्यासोबत घडले असतील किंवा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी मनात सारख्या सारख्या येत असल्यामुळे तुमचं मन बेचैन होत असत.

डोळे बंद केल्यानंतरही जेव्हा येणारे विचारही थांबत नाहीत ना तर झोप येईल आणि ती लागूनही जाते पण तुमचं मन अशांत असतं. फिजिकली तुम्ही झोपलेले असता पण मेंटली प्लस इमोशनली तुमची बॉडी वेगळ्या वेगळ्या गोष्टी मेंदूमध्ये आणून तुम्हाला झोप येत म्हणजेच स्वप्नात दाखवत असते. मित्रांनो मनात येणारे विचार किंवा पडणारे स्वप्न वाईट असतात किंवा नसतात हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.

पण त्याच्यामुळे शरीर शांतपणे पूर्ण झोप घेऊ शकत नाही. यामुळे जेव्हा तुम्ही आठ ते दहा तास झोपता पण सकाळी उठल्यानंतरही ताजतवान फ्रेश वाटत नाही, सकाळी उठल्यानंतर जे काही तास तुमचे असेच आळशी मूडमध्ये जात असतील तर मित्रा तुला तुझे दिवसातले काही अमूल्य तास तू मिस करतो आहेस.

आता ना तुज वय जास्त झोपायचं नसून कमीत कमी वेळेत जास्त चांगली झोप घेऊन सकाळच्या हातात येणाऱ्या अमूल्य वेळेच सोन करण्याचा आहे. त्यामुळे उठ मित्रा आणि कामाला लाग. एक एक मिनिटं हा हातातून जातोय. कारण जर तू झोपेत राहून वेळ अशी जाऊ दिली तर तुझी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक स्वप्न असच निघून जाईल. लोकांच तर जाऊ दे पण तूज स्वतःच शरीर आहे ना ते पण एक एक सेकंदाला पुढे जात आहे.

तुज वय सुद्धा तू थांबल्याने थांबून राहणार नाही. तर तू असाच झोपून राहिलास ना तर तुजच स्वप्न तू एक दिवस पूर्ण करशील पण वेळ निघून गेलेली असेल आणि ती कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे मित्रांनो मनावर आणि मनात येणाऱ्या विचारांवर ताबा मिळवायला शिका. त्यासाठी मेडिटेशन, योगा करू शकता. तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला सूट होणार्‍या सर्व गोष्टी तुम्ही करायला हव्यात.

ज्या ज्या गोष्टीन तुमचं मन फ्रेश होईल. काही काही माणसं बेडजवळ असणाऱ्या अलार्म क्लॉकला बेडपासून काही अंतरावर ठेवतात आणि जगात असे देखील महान माणसे असतात की, झोपेचे इतके शौकीन असतात की, किती महा माणस अलार्म क्लॉक बंद करून परत झोपी जातात आणि मग त्या दिवशी ते अजून जास्त उशीर उठतात.

त्यादिवशी त्यांना उठल्यानंतर अजून जास्त आळस चढलेला असतो. काही लोक असेपण असतात की, सकाळी सकाळी काहींना झोपेपेक्षा जास्त काही महत्वाचं दिसत नाही. अशा टाईपमध्ये जर तुम्ही येत असाल तर अलार्म क्लॉक किंवा कोणत्याही स्ट्रोगेस मोटीवेशनने तुम्ही सकाळी लवकर उठू शकत नाही.

या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून तुम्हाला शांत झोप लागण गरजेचं आहे. आणि जर तुमची झोप पूर्ण व्यवस्थित पूर्ण झाली तर तुम्हाला कोणत्याही अलार्म क्लॉक शिवाय लगेच जाग येईल. सकाळी उठल्यानंतर फ्रेशफील येण्यासाठी दोन ग्लास पाणी प्यायचा आहे आणि हेच पाणी जर तुम्ही कोमट करून पिला तर अजून बेटर असेल तुमच्या आरोग्यासाठी.

यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात हेल्दी आणि फ्रेशनेस फुल होईल. गेलेली वेळ तुमच्या जीवनात कधीच परत येत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण विचारपूर्वक सत्कारणी हवा. दररोज झोपण्याची वेळ निश्चित असावी. आपला उद्याचा दिवस चांगला करण्यासाठी तुम्हाला आजची रात्र चांगली करावी लागेल. अर्थात तुमच्या झोपायच्या वेळा ठरलेल्या असाव्या.

आजच्या सोशल मीडियाच्या काळात बऱ्याच जणांना रात्री नेट सफरिंग केल्याशिवाय झोप येत नाही. त्यामुळे अनेक जण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर असतात. परिणामी त्यांचा दुसरा दिवस खराब होतो. पहाटे लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे. काही झाले ना तरी प्रत्येकाने सहा ते आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

ज्या दिवशी रात्री तुम्हाला खूप खूप थकल्यासारखे वाटत असेल ना त्यादिवशी नियमित वेळेपेक्षा एक तास आधी झोपा. यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी अधिक ताजेतवाने वाटेल. आयुष्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हाला लवकर उठलेच पाहिजे. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते.

सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा जास्तीत जास्त वेळ मिळतो. अभ्यासाच्या दृष्टीने बघितलं तर पहाटेची वेळ अधिक बेस्ट असते, अधिक चांगली असते. पहाटेला शांतता असल्यामुळे अभ्यासात मन आणि उज्वल भविष्य करण्यासाठी पहाटे लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे ही जीवनशैली प्रत्येक व्यक्तीने रोजच्या जीवनात आत्मसात केलीच पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *