एक सत्य घटना प्रत्येक संकटात स्वामी आपली परीक्षा बघत असतात…

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक संकटात आपले स्वामी परीक्षा बघत असतात. कसे काय ते आजच्या या लिलेतून आपल्याला समजणार आहे. स्वामी नागणसूर येते काही दिवस मुक्कामाला थांबले होते. तेथे राहून दुसऱ्या दिवशी वाडी गावात आले. त्या ठिकाणी धान्य वगैरे काहीच मिळेना. सेवेकर्‍यांनी ही दुसऱ्या पातळीवर बाजरी भरडून खाल्ली.

भाजी सुद्धा मिळाली नाही शेवटी वैतागून सर्वांनी स्वामींना प्रार्थना केली की, स्वामी येथे बाजरी ही भेटत नाही. आपण अक्कलकोटास चलावे अशा अनेक प्रार्थना केल्यानंतर अनेक प्रकारे स्वामींना विनवणी केली. परंतु स्वामींनी कोणाचेही ऐकले नाही.

शेवटी सर्वजण निराश झाले आणि त्याच वेळी दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची आता पंचाईत होऊ शकते असे सर्वांना जाणवले. या नैराश्याच्या भावनेतून तेथे श्री महादेव गोड बोलले स्वामी उद्या आम्हाला उपवास आहे. त्याच वेळेला सद्गुरु स्वामी हसतच बोलले उपवास कशाला करता तो गुळ पुष्कळ खा.

असे स्वामी बोलले स्वामी भक्तांना ही जाणीव झाली की स्वामी महाराज तर कल्पवृक्ष आहेत. स्वामींच्या दरबारात कोणीही उपाशी राहू शकत नाही. कदाचीत स्वामी आपली परीक्षा बघत असावी आणि दुसर्‍या दिवशी त्याचप्रमाणे सर्वांना अनुभव देखील आला. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या मुक्कामाच्या ठिकाणी तेच गावचे महारुद्र देशपांडे कुटुंबासह यात्रेला आले होते.

त्यांनी भरपूर स्वयंपाकाचे सामान सोबत आणले होते आणि दुसरे दिवशी जवळ जवळ 200 लोकांचा स्वयंपाक यांनी केला. कालपर्यंत जिथे बाजरीच्या दाण्याचीही सोय होणे मुश्कील होती. त्या ठिकाणी महाप्रसादाचा उत्सव साजरा झाला आणि स्वामी वाणीचा जगात सर्वांना अनुभव आला. आणि आनंदाच्या भावनेने सर्वांनी एक जोशात स्वामी नामाचा जय जयकार केला.

स्वामी प्रिय बघतो या आजच्या लिलेतून आपल्याला पुन्हा एकदा असंख्य बोध मिळत आहेत. आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अन्नधान्याची सोय होत नव्हती आणि त्यामुळे तेथील सेवेकरी मित्रांनो व्याकुळ झाले होते. इतकेच नव्हे तर क्षणभर विसरून गेले की आपण आपल्या सोबत प्रत्यक्ष ब्रम्हांडनायक आहेत.

आणि जेव्हा महादेव भटांनी स्वामींना आता उद्या आम्हाला उपवास करणार का म्हणजे तुम्ही उद्या उपाशी राहणार का असे विचारले? तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितले किती तूप गूळ पुष्कळ खा असे बोलून स्वामिनी सामर्थ्याची जाणीव करून देत सांगितले की, बाळांनो मी कल्पवृक्ष आहे भरपूरतः माझं कोण आहे.

आणि तुमच्या जीवनात भरपूर येत आहे ते योग्य वेळी, योग्य माध्यमाच्याद्वारे नक्कीच येणार. तुम्ही मात्र श्रद्धा ठेवा स्वामीभक्त हो बघा दुसर्या दिवशी श्री महारुद्रराव देशपांडे हे आले आणि त्यांना निमित्त करून स्वामिनी सर्वांच्या भोजनाची सोय केली. कधी आपल्याही बाबतीत असेच होत असते जेव्हा आपल्याला संकटे येतील व आपल्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा आपले चंचल मन हे व्याकुळ होते.

आपल्या मनात नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. परंतु आजच्या या माहितीतून बोध घेता आपल्याला श्रद्धा आणि सबुरी हे गुण धारण करायचे आहेत परिस्थिती कशीही असू दे स्वामींच्या सामर्थ्यावर श्रद्धा ठेवायची आहे आणि सबुरीच्या शक्तीने न खचत वर्तमानातील कर्म करत राहायचे आहे.

बघा जसे आजच्या लिलेत महारुद्र राव निमित्त झाले तसे योग्य व्यक्तीला निमित्त करून योग्य घटनांनाच निमित्त करू आपली गरज पूर्ण होईल आपली इच्छा पूर्ण होईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *