नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो का? यावर स्वामींनी दिलेले उत्तर थोडक्यात सांगणार आहे. स्वामी प्रिय भक्तहो आधी प्र पं च करावा नेटका मग घ्यावे प र मा र्थ विवेका. येथे आळस करू नका असे समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात म्हणतात. जीवनाच्या एका टप्प्यानंतर अनेकजण परमार्थाच्या मार्गावर मार्गक्रमण करतात.
आपल्याकडे 4 आश्रम सांगितलेले असून त्या सर्वांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या निर्माणाच्या पद्धतीने यावर स वि स्त र विवेचन केलेले आढळते. अनेकांना प्रपंचाचा त्याग करून केवळ ईश्वर भक्ती करण्याची इच्छा होते. मात्र समर्थ रामदास स्वामींपासून अनेक संतांनी प्र पं च करून प र मा र्थ साधता येतो अशी शिकवण दिली आहे. प्रपंचातील जबाबदाऱ्या कर्तव्य सोडून परमार्थ साधावा असे सांगितले नाही.
एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराज यांनीही अशीच शिकवण स्वामी भक्तांसाठी दिली आहे. स्वामी भक्तांनो गोपाळरावांना परमार्थाचे वेड लागले होते. परमार्थ साधून मोक्ष मिळवायचा आणि संसारिक बंधनापासून मुक्त व्हायचे हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे ते प्रपंचाकडे दुर्लक्ष करायचे. सावकाराचे कर्ज डोक्यावर आले आणि शेतात गुरे शिरली. पण गोपाळरावांना जणू त्याचे काही कर्तव्य नव्हते. मुलगी उपवर झाली असतानाही त्याकडे ते लक्ष देत नव्हते.
इकडे स्वामी चोळप्पाना त्यांच्या गावात असलेल्या एका आजारी भक्तांसाठी औषधे घ्यायला पाठवतात. तेथे चोळाप्पा गोपाळरावांना आपले दागिने निमूटपणे सावकाराच्या माणसाला देताना पाहतात. चोळप्पाने विचारपूस केल्यावर गोपाळराव सांगतात की, संसारात मला काहीही रस नाही. मी सद्गुरूंच्या शोधात आहे. यावर चोळाप्पा त्यांना स्वामींना भेटा असा सल्ला देतात. चोळप्पांचा सल्ला गोपाळरावांना पटतं आणि ते अक्कलकोटला येतात.
पण स्वामींना आपले नाव माधव गोडबोले आहे शिवाय जगात आपले कोणी नाही अशी खोटी बतावणी करतात. मात्र अन्तर्यामी स्वामी काहीही प्रतिक्रिया देत नाहीत. स्वामी त्यांना आपल्या सेवेत ठेवतात. दुसरीकडे कर्ज न चुकल्याबद्दल सावकार गोपाळरावांच्या कुटुंबाला घराबाहेर काढतो. स्वामी संन्यासाचे रूप धारण करून गोपाळरावांच्या घरी पोहोचतात आणि कुटुंबियांना अक्कलकोटला स्वामींना शरण जावे असा सल्ला देतात. संन्यासी महाराजांनी केलेल्या सूचनेनुसार सर्व जण अक्कलकोटला स्वामीचरणी येतात.
त्या सर्वांना स्वामींच्या निदर्शनानुसार गोपाळरावांच्या शेजारची खोली देण्यात येते. आता मात्र गोपाळरावांचे पंचायत होते. गोपाळराव आपले तोंड लपवून वावरतात. मात्र तिथे गेल्याबरोबर गोपाळरावांच्या आईला हृ द य विकाराची बाधा होते. स्वामी म्हणतात की, तिचा शेवट आला आहे. आता आपली आई बरी होणार नाही हे समजताच त्यांच्या भावना उचंबळून येतात. ते सर्व सोंग विसरून स्वामींची करुणा भागतात. स्वामी काहीही करा पण माझ्या आईला ठणठणीत बर करा. मी आपल्याशी खोटे बोललो मी माधव नाही आणि आपली मंडळी माझे कुटुंबे आहेत.
त्यावर स्वामी म्हणतात अरे, प र मा र्थ लपून छपून खोटे बोलून होत नाही. प्र पं च वाईट नसतो मोहमायात अडकणे हे वाईट असतं. प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो. परमार्थ निरपेक्ष भावनेने करायचा असतो. एकदा प्रपंचात पडून दूर पळणे हा मोठा गुन्हा आहे. प्रपंचापासून दूर पळू नका. ना म स्म र ण करून आपली आ ध्या त्मि क प्रगती करा. नामस्मरणात प्रचंड ताकद असते एकदा नामस्मरण करायला सुरुवात केली की दुसरी कर्मकांड करायची गरजच नसते.
कोणत्याही अपेक्षा विना दुसऱ्यासाठी केलेलं कार्य सुद्धा परमार्थच असते. त्यासाठी संसार सोडायची गरज नाही. वै रा ग्य मनात असायला हवे नाहीतर घर किंवा संसार सोडून वनात गेला तर तिथेही दुसरे घर तयार होईल. तुझ्या आईला काहीही झालेले नाही. तुझ्या मनात प र मा र्थ आणि वैरागाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ही भीती आम्ही नि र्मा ण केली. समाधानाने घरी जा आणि ना म स्म र ण करायला विसरू नको अशी शिकवण स्वामी देतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.