प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो का? ऐका स्वामींचे उत्तर नामस्मरण करून अध्यात्मिक प्रगती करा

नमस्कार मित्रांनो,

स्वामी प्रिय भक्तहो आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी असे समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात म्हणतात. जीवनाच्या एका टप्प्यानंतर अनेक जण परमार्थाच्या मार्गावर मार्गक्रमण करतात. आपल्याकडे चार आश्रम सांगितले असून त्या सर्वांची कर्तव्ये जबाबदाऱ्या निर्वाणाच्या पद्धतीने यांवर सविस्तर विवेचन केलेले आढळते.

अनेकांना प्रपंचाचा त्याग करून केवळ ईश्वर भक्ती करण्याची इच्छा होते. मात्र समर्थ रामदास स्वामींपासून अनेक संतांनी प्रपंच करून परमार्थ साधता येतो अशी शिकवण दिली आहे. प्रपंचातील जबाबदाऱ्या, कर्तव्य सोडून परमार्थ साधावा असे सांगितलेले नाही. एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराज यांनीही अशीच शिकवण स्वामी भक्तांसाठी दिले आहे. नेमके काय घडले ते आजच्या या महितीमधून आपण जाणून घेऊया.

स्वामी भक्तहो गोपाळरावांना परमार्थाचे वेध लागले होते. परमार्थ साधून मोक्ष मिळवायचा आणि सांसारिक बंधनांपासून मुक्त व्हायचे हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे ते प्रपंचाकडे दुर्लक्ष करायचे. सावकाराचे कर्ज डोक्यावर आले आणि शेतात गुरे शिरली. पण गोपाळरावांना जणू त्याचे काही कर्तव्यच नव्हते. मुलगी उपवर झाली असतानाही त्याकडेही ते लक्ष देत नव्हते. इकडे स्वामी चोळप्पाना त्याच गावात असलेल्या एका आजारी भक्तासाठी औषधे घ्यायला पाठवतात.

तेथे चोळप्पा गोपाळरावांना आपले दागिने निमूटपणे सावकाराच्या माणसाला देताना पाहतात. चोळप्पाने विचारपूस केल्यावर गोपाळराव सांगतात की, संसारात मला काहीही रस नाही. मी सद्गुरूंच्या शोधात आहे यावर चोळप्पा त्यांना स्वामींना भेटा असा सल्ला देतात. चोळप्पांचा सल्ला गोपाळरावांना पटतो आणि ते अक्कलकोटला येतात. पण स्वामींना आपले नाव माधव गोडबोले आहे शिवाय जगात आपले कोणी नाही अशी खोटी बतावणी करतात.

मात्र अंतर्यामी स्वामी काहीही प्रतिक्रिया देत नाही. स्वामी त्यांना आपल्या सेवेत ठेवतात. दुसरीकडे कर्ज न चुकवल्याबद्दल सावकार गोपाळरावांच्या कुटुंबाला घराबाहेर काढतो. स्वामी संन्यासाचे रूप धारण करून गोपाळरावांच्या घरी पोहोचतात आणि कुटुंबियांना अक्कलकोटला स्वामींना शरण जावे असा सल्ला देतात. संन्यासी महाराजांनी केलेल्या सूचनेनुसार सर्वजण अक्कलकोटला स्वामी चरणी येतात.

त्या सर्वांना स्वामींच्या निदर्शनानुसार गोपाळरावांच्या शेजारची खोली देण्यात येते. आता मात्र गोपाळरावांची पंचाईत होते. गोपाळराव आपले तोंड लपवून वावरतात मात्र तिथे गेल्याबरोबर गोपाळरावांच्या आईला हृदय विकाराची बाधा होते. स्वामी म्हणतात की, तिचा शेवट आला आहे. आता आपली आई बरी होणार नाही हे समजतात गोपाळरावांच्या भावना उचंबळतात.

ते सर्व सोंग विसरून स्वामींची करुणा भगतात. स्वामी काही करा पण माझ्या आईला ठणठणीत करा मी आपल्याशी खोटे बोलो. मी माधव नाही आणि आपली मंडळी माझे कुटुंबीय आहेत. स्वामी म्हणतात अरे परमार्थ लपून-छपून खोटे बोलून होत नाही. प्रपंच वाईट नसतो मोह मायेत अडकणे हे वाईट असतं. प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो परमार्थ निरपेक्ष भावनेने करायचा असतो.
एकदा प्रपंचात पडून दूर पळणे हा मोठा गुन्हा आहे.

प्रपंचापासून पळू नका नामस्मरण करून आपली आ ध्या त्मि क प्रगती करा. नामस्मरणात प्रचंड ताकद असते एकदा नामस्मरण करायला सुरुवात केली की दुसरे कर्मकांड करायची गरज नसते. कोणत्याही अपेक्षित विना दुसऱ्यासाठी केलेले कार्यसुद्धा परमार्थच असते. त्यासाठी संसार सोडायची गरज नाही.

वैराग्य मनात असायला हवे नाहीतर घर-संसार सोडून वनात गेला तर तिथे ही दुसरे घर तयार होईल. तुझ्या आईला काहीही झाले नाही तुझ्या मनात परमार्थ आणि वैरागविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ही भीती नि र्मा ण केली. समाधानाने घरी जा नामस्मरण करायला मात्र विसरू नको असे शिकवण स्वामी देतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *