नमस्कार मित्रांनो,
हिंदू पंचांगानुसार 3 जानेवारीपासून पौष महिन्यास प्रा रं भ झालेला आहे. हा महिना सूर्यनारायणाची पूजा करण्यास उ त्त म महिना मानला जातो. तो सूर्य देवांच्या उपासनेस स म र्पि त महिना आहे. या महिन्यात सूर्याची उपासना केल्यास पूजा केल्यास मनुष्य तेजस्वी, धै र्य वा न आणि निरोगी बनतो. त्याच्या आयुष्यात पैसा आणि अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही.
विशेष करून पौष महिन्यातील रविवारी सूर्यदेवाची आपण मनोभावे उपासना करावी, व्रत उपवास करावा. हिंदू ग्रंथांमध्ये सूर्याची एकूण बारा रुपे वर्णिलेली आहेत. प्र त्ये क रूपाची उपासना वेगवेगळी फलप्राप्ती करून देते. ऐश्वर्य, धर्म, किर्ती, श्रीज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्य देवाच रूप हे परब्रह्म स्वरूप मानण्यात आलेला आहे.
या महिन्यात आपण सूर्यदेवाची पूजा कशा प्रकारे करावी? यासाठी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात तांबे या धातूपासून बनलेल्या या तांब्यामध्ये किंवा लोट्यांमध्ये तांब्याभर पाणी घ्याव. त्यामध्ये लाल रंगाची फुले टाकावी, लाल चंदन टाकाव किंवा कुंकू टाकावा.
थोडेसे अक्षत म्हणजे तांदूळ टाकावेत आणि अस हे जल सूर्याकडे पाहत दोन्ही हात उंचावून ओम आदित्याय नमः ओम भास्कराय नमः ओम दिनकराय नमः ओम सूर्याय नमः अशा कोणत्याही एखाद्या मंत्राचा जप करत सूर्याकडे पाहत ते जल आपण सूर्याला अर्पण कराव. याला अर्ग्या अर्पण करणे असं म्हणतात. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण करून आपण सुर्यदेवांची पूजा करू शकता.
या दिवशी आपण व्रत उपवास करत आहात. या दिवशी केलेल्या व्रत आणि उपवास आणि सोबत जर आपण तीळ आणि तांदळाची खिचडी खाल्ली तर मनुष्याची बुद्धी तल्लख बनते अशीही मान्यता आहे. या पौष महिन्यात पूर्वजांचा पिंडदान आपण नक्की करा. त्यामुळे आपल्या पूर्वजांना वैकुंठ लोकांची प्राप्ती होते. खर तर या पौष महिन्यामध्ये सूर्य धनु राशीत प्रवेश करतो आणि म्हणूनच या महिन्यात पिंडदानाच फार मोठ महात्म्य आहे.
या महिन्याला छोटा पितृपक्ष असही अनेक ठिकाणी संबोधलेला आहे. म्हणजे हा पितरांच्या मुक्तीचा महिना आहे. या महिन्यात आपण सुर्यदेवांची भग नावाने पूजा करतो. भग हे भगवंताचे एक रूप आहे. या महिन्यांमध्ये शक्यतो मांसाहार, मदिरा यांचे सेवन करु नये. साखरेऐवजी गूळाचा सेवन करावं.
या महिन्यात थंड पाण्याचा वापर किंवा अति जेवण करणं या गोष्टी हानिकारक मांडण्यात आलेले आहेत. मित्रांनो शक्यतो सकाळी लवकरात लवकर सूर्य उगवल्यानंतर सूर्योदयानंतर लवकरात लवकर हे अर्ग्या म्हणजे जल अर्पण केलं तर ते जास्त प्रभावी ठरत. सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत आपण जल करु शकता.
पौष महिन्यातील रविवारी गायत्री मंत्राचा जप सुद्धा खूप लाभदायक मानण्यात आलेला आहे. पौष महिन्यातील रविवार आणि गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत बनते. याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्राचा जपही करू शकता. गायत्री मंत्र कोणता ऊँ भास्कराय पुत्रं देहि महातेजसे धीमहि तन्नःसूर्य प्रचोदयात्
या दिवशी जे लोक व्रत किंवा उपवास करत आहे त्यांनी जेवणामध्ये मिठाचा वापर टाळावा. शक्य असेल तर फक्त फळे खावी आणि दुसर्या दिवशी सकाळी स्नान करून आपण उपवास सोडू शकता. उपवासामध्ये सूर्याला आपण तीळ तांदळाची खिचडी अर्पण केल्यास सूर्य देव प्र स न्न होतात.
या महिन्यांमध्ये रविवारच्या दिवशी स्नान करताना स्नान करण्याच्या पाण्यात थोडस गंगाजल म्हणजे गंगा नदीचे पाणी आपण टाकावं आणि श्री नारायणाच नामस्मरण करत स्नान करावं. सोबतच पौष महिन्यामध्ये गोरगरिबांना गरजूंना आपण दानधर्म सुद्धा करू शकता.
या महिन्यात विशेष करून गुळाचं, लाल मसूर, तांबे, तिळाच दान आपण नक्की करावं. तसेच लाल रंगाचे कपडे सुद्धा आपण दान केल्यास कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत बनते. सूर्य देवांच्या कृपेने जे जे फायदे, जे लाभ आपण पाहिले की, मनुष्य तेजस्वी बनतो. मनुष्याच्या जीवनामध्ये धनधान्याची पैशांची कमतरता कधीच भासत नाही.
मनुष्य धैर्यवान बनतो, निरोगी बनतो, रोगमुक्त बनतो. समाजामध्ये मान प्रतिष्ठा सन्मान मिळू लागतो. असे अनेक लाभ त्यामुळे प्राप्त होतात. मित्रांनो ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, श्रीज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्य देवांच रूप हे या पौष महिन्यामध्ये आपण नक्की त्यांची पूजा करावी.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.