पितृपक्षात नक्की करा हळदीचा हा उपाय घरात पैसा येईल.

नमस्कार मित्रांनो,

सध्या पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षाची सुरुवात 20 सप्टेंबरपासून झाले आहे आणि 6 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष असणार आहे. भाद्रपद पोर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत असा 15 दिवस पितृपक्ष असतो. संपूर्ण पितृ पंधरवडा हा पूर्वजांना स म र्पि त असतो. आपल्या पूर्वजांचे आ शी र्वा द मिळविण्यासाठी व त्यांचे आ शी र्वा द प्राप्त करण्यासाठी पितृपंधरवडा हा खूपच महत्त्वाचा मानला जातो.

पितृपक्षात फक्त पितरांशी संबंधित कार्य केले जातात. या दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. पितृपक्षात आपल्या पूर्वजांसाठी तर्पण व पिंडदान केले जाते. अशी मान्यता आहे की, पितृपक्षात आपले पित्र कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येतात आणि आपला भाग ग्रहण करतात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवी देवतांना प्र स न्न करण्यापूर्वी आपल्या पित्रांना प्रसन्न करणे खूप आ व श्य क आहे. कारण ज्यांचे पित्र त्यांच्यावर नाराज असतील त्यांच्यावर कोणत्याही देवी-देवतांची कृपा होत नाही.

पित्र आपल्यावर नाराज असणे म्हणजेच पितृदोष होय. पितृपक्ष हा आपल्या पितरांना प्र स न्न करण्याचा खूप चांगला काळ आहे. पितृपक्षात आपण लहानात लहान उपाय याद्वारेही आपल्या पितरांचा आ शी र्वा द मिळवू शकतो आणि पितृदोषापासून मुक्तता मिळू शकतो. आजच्या या माहितीमध्ये आपण पितरांना प्र स न्न करून घेण्याचा एक खूपच सोपा व प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने आपले पित्र आपल्यावर प्र स न्न होतात आणि पितरांना शांती मिळते.

पितृदेवांच्या आशीर्वादाबरोबरच देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंचेही कृपा आपल्यावर होऊन आपल्याला सुख समृद्धी मिळते. चला तर जाणून घेऊया तो हा उपाय. हा आपण पितृपक्षात कोणत्याही दिवशी करू शकतो. परंतु शक्‍यतो गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यास त्याचे खूप शुभ फळे आपल्याला मिळतील. कारण गुरुवार आणि एकादशीचा दिवस हा श्रीहरी विष्णूचा दिवस आहे. आणि शास्त्रांमध्ये दिलेले आहे ते श्रीहरी विष्णू पितृदेवो आहेत. म्हणून जर आपल्याला आपल्या पूर्वजांचा आ शी र्वा द मिळवायचा असेल तर श्रीहरी विष्णूचा आ शी र्वा द मिळवणे खूप गरजेचे आहे.

तसेच आपण हा उपाय भाद्रपद अमावास्या म्हणजे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ही करू शकतो. कारण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सर्व पितरांसाठी श्राद्ध व तर्पण, पिंडदान केले जाते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी आपण जे काही श्राद्ध व तर्पण, पिंडदान करतो त्यामुळे सर्व पित्र आपल्यावर प्र स न्न होतात. आणि पितृदोषापासूनही आपल्याला मुक्तता मिळते. या उपायासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करून स्वच्छ स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. परंतु काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत.

त्यानंतर एका स्टीलच्या ताब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात एक चमचा कच्चे दुध टाकावे व चिमूटभर साखर टाकावी. त्यानंतर त्या पाण्यात एक चिमूटभर हळद टाकावी. श्रीहरी विष्णूंना हळद अतिप्रिय आहे आणि म्हणून या उपायात हळदीचा वापर अ व श्य करावा. त्यानंतर एक दिवा घ्यावा आणि त्यात शुद्ध तूप टाकावे. हा दिवा व पाण्याचा तांब्या घेऊन तुळशीकडे जावे. आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे खूप म ह त्त्व आहे. तुळशीला देवी मानले जाते. पद्मपुराणात दिलेले आहे की, ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते तेथे ब्रम्हा, विष्णू व महेश या तिन्ही देवी देवतांचे एकत्रित वास्तव्य असते.

तुळशीला हरिप्रिया म्हटले जाते. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृत शरीराच्या मुखामध्ये तुळशीचे पान ठेवले जाते. असे म्हटले जाते की, ज्या ठिकाणी तुळस असते त्या घरावर कधीही यमराजांची सावली पडत नाही. तुळस धारण करणाऱ्या व्यक्तींना यमराज कधीही कष्ट देत नाहीत. मृत्यूनंतर त्या व्यक्तीला कष्टांचा सामना करावा लागत नाही. म्हणून मृत्युसमयी तोंडात तुळशीचे पान ठेवले जाते. यामुळे मृत्यू यातनाही जाणवत नाहीत. पितरांना प्र स न्न करण्यासाठी तुळशीचे पूजन जरूर करावे.

तुळशीचा सुगंध देवी लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करतो. पितृपक्षादरम्यान जे व्यक्ती तुळशीचे पूजन करतात त्यांचे पित्र त्यांच्यावर प्र स न्न होतात व त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तुळशीचे पूजन करण्यासाठी दिवा व पाण्याचा तांब्या घेऊन तुळशीकडे जावे व पूर्व दिशेला मुख करून उभे राहावे. त्यानंतर श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीला नमस्कार करून तुळशीला नमस्कार करावा. आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांनाही नमस्कार करावा.

त्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करता करता तांब्यातील पाणी तुळशीला अ र्प ण करावे. पाणी अ र्प ण केल्यानंतर तुळशीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करता करता तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर तुळशीला नमस्कार करून तेथेच बसून श्रीहरी विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

हा उपाय केल्याने आपले पित्र आपल्यावर प्र स न्न होऊन आपल्यावर कृपेचा वर्षाव करतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट होऊन पितृदोषापासूनही आपली मुक्तता होते. देवी लक्ष्मी, श्रीहरी विष्णू व तुळस मातेच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनात सुख व समृद्धी येते. हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. चुकूनही हा उपाय संध्याकाळी करू नये. मित्रांनो हा छोटासा उपाय करून आपण देवी लक्ष्मी, श्रीहरी विष्णू व पितृदेव या सर्वांचा एकत्रित आ शी र्वा द मिळवून आपले जीवन सुखी, संपन्न व समृद्ध करू शकतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *