नमस्कार मित्रांनो,
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पि तृ प क्ष म्हटले जाते. हे पंधरा दिवस फक्त आपल्या पूर्वजांचासाठी असतात. पि तृ प क्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स र्वो त्त म काळ आहे. यावर्षी पि तृ प क्ष 20 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 6 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे. या दरम्यान आपल्या पूर्वजांच्या श्राद्ध तिथीप्रमाणेच श्राद्ध करावे.
दान करावे, पूर्वजांच्या नावाने तर्पण करावे. त र्प ण कुटुंबातील त्या सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी केले जाते जे आपल्यात हयात नाहीत जे परलोकात गेलेले आहेत. याशिवाय श्राद्ध पक्षात सर्व अतृप्त आत्मे नै वे द्य ग्रहण करण्यासाठी फिरत असतात. हे 15 दिवस त्यांना कोणतेही निर्बंध नसतात म्हणून आपणही श्राद्ध व तर्पण करताना आपल्या पूर्वजांना तर नैवेद्य द्यावाच.
परंतु त्यात उच्चार करावा की, ज्यांना घास देणारे कोणी नसेल, तर्पण दान करणारे कोणी नसेल त्यांनी हा नैवेद्य ग्रहण करावा. म्हणजे अशा अतृप्त आत्म्याकडूनही आपल्याला आ शी र्वा द प्राप्त होतात. पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान करावे. श्राद्धाच्या दिवशी तूप, तेल, सोने, चांदी गूळ, मीठ व फळे यांचे दान करणे खूप शुभ असते. या दिवशी ब्राह्मणांना व गरीब गरजू व्यक्तींना भोजन द्यावे.
आपल्या पूर्वजांचे श्राद्ध तिथी ज्या दिवशी असेल त्या दिवशी दानधर्म करावा. यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपल्या हातून न नकळतपणे चूका झालेल्या असतील तर आपण पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांची क्षमा याचना करू शकतो. आपल्या पूर्वजांच्या फोटोला टिळा लावून तिळाच्या तेलाने दिवा लावावा. गरीब व गरजू लोकांना अन्नदान करावे आणि आपल्या चुकांची क्षमा मागावी.
यामुळे आपले पूर्वज प्र स न्न होऊन आपल्याला त्याचे आ शी र्वा द मिळतील. श्राद्धाच्या दिवशी पितरांना नैवेद्यामध्ये खीर जरूर बनवावी. आपल्या पितरांना नै वे द्य अर्पण करून कोळशाच्या निखाऱ्यावर घास टाकावा व छतावर कावळ्यांसाठी नै वे द्य ठेवावा. कारण आपले पित्र हे कावळ्याचा रूपात येऊन आपण दिलेल्या अन्नाचे भ क्ष ण करतात. त्यानंतर गाईला व कुत्र्याला नै वे द्य द्यावा. ब्राह्मण भोजन करावे व गरीब गरजूंना पोटभर जेवण द्यावे.
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही याचकाला काहीही न देता विन्मुख परत जाऊ देऊ नये. तसेच त्यांचा अपमानही करू नये कारण आपले पित्र पितृपक्षात कोणाचाही रुपात आपल्या घरी येऊन त्यांचा भाग ग्रहण करू शकतात. प्र त्ये क जीवाला पितृपक्षादरम्यान काही ना काही खायला द्यावे. विशेषतः कावळ्याला अन्न द्यावे, गाईला हिरवा चारा खायला द्यावा कुत्र्याला चपाती द्यावी व मुंग्यांना साखर टाकावे.
कारण पितृपक्षात आपले पित्र यामुळे आपल्यावर प्र स न्न होतात. पितृपक्षात शिळे अन्न खाऊ नये. त्याशिवाय हरभरे, मसूर, साग, जीरे, काळीमिरी, काकडी आणि दुधीभोपळा खाणे टाळावे. मांसाहार व मद्यपान करू नये. श्राद्ध स्वतःच्या घरीच करावे किंवा गया प्रयाग बद्रीनाथ आणि इतर ठिकाणी आपण श्राद्ध करू शकतो. परंतु इतर कोणाच्याही घरी आपल्या पितरांचे श्राद्ध करू नये.
पितृपक्षादरम्यान झाडे तोडू नये यामुळे आपले पित्र आपल्यावर नाराज होऊ शकतात. पितृपक्षादरम्यान कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तूंची, नवीन कपड्यांची खरेदी करू नये. सोन्याची ही खरेदी करू नये. नवीन घर व जमीन व वाहनाची खरेदी करू नये. मात्र या बाबतीत आपण बोलणी करून व्यवहार पक्का करू शकतो. इतर पूर्वतयारी करू शकतो. घर दुरुस्तीचेही काम पितृपक्षात करू नये. या दरम्यान आपल्या घरातील कोणताही भाग अंधारात राहणार नाही याची काळजी घ्यावी.
सगळीकडे संपूर्ण घरात प्रकाश असावा. पितरांसाठी तर्पण करताना त्यात काळे तीळ, कुश व फुलांचा वापर जरूर करावा. पितृपक्षादरम्यान इतर कोणतेही शुभ कार्य करू नयेत. परंतु देवपूजा नित्यनैमित्तिक पूजन हे चालूच ठेवावे. आपला रोजचा मंदिरात जाऊन पूजनाचा नियम असेल तर तो नियमही पाळावा. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की, पित्रूपक्षादरम्यान काय करावे व काय करू नये ते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.