नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले स्वयंपाकघर. किचनमध्ये आपल्या शरीराला पोषक व ऊर्जा प्रदान करणारे अन्न तयार होते. किचनमध्ये तयार होणाऱ्या स्वयंपाकातून आपण भगवंतांना नैवेद्य अर्पण करीत असतो. आपल्या घरी आल्या गेल्या पाहुण्यांचा पाहुणचारही किचनमार्फतच होत असतो.
आपले किचन जितके स का रा त्म क ऊर्जेने भरलेले असेल तितकी जास्त स का रा त्म क ऊर्जा आपल्याला मिळत असते. आपल्या घरातील किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नसून किचनमध्ये अन्नधान्याच्या रूपात देवी अन्नपूर्णा आणि इतर वस्तूंमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते.
म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा एकत्रित वास करतात. म्हणून स्वयंपाक घर हे नुसतेच स्वयंपाक घर नसून ते प्रकारचे मंदिर आहे. म्हणून स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असले पाहिजे. स्वयंपाक घर हे नेहमी घराच्या आग्नेय दिशेला असावे.
तसेच स्वयंपाक घरातील गॅसची शेगडी ही आग्नेय दिशेला असावी. स्वयंपाक घरात जर स का रा त्म क ऊर्जा असेल तर संपूर्ण घरावर व घरातील सदस्यांवर त्या ऊर्जेचा स का रा त्म क परिणाम होतो. कारण ती ऊर्जा स्वयंपाक घरात जो स्वयंपाक बनवला जातो त्या स्वयंपाकात उतरते.
पर्यायाने तिच ऊर्जा घरातील सदस्यांमध्ये उतरते. स्वयंपाक घरात दररोज आणि सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे पीठ. प्रत्येक घरात सकाळ-संध्याकाळी चपाती, भाकरी किंवा पोळ्या केल्या जातात. म्हणून आजच्या माहितीमध्ये आपण पीठावर करण्याचा एक उपाय पाहणार आहोत.
आपल्याला घरात सुख समृद्धी व संपन्नता येण्यासाठी एक खास असा उपाय करायचा आहे. त्यासाठी पिठाच्या डब्यात एक वस्तू ठेवायचे आहे म्हणजे पीठामध्ये स का रा त्म क ऊर्जा निर्माण होईल आणि तीच स का रा त्म क ऊर्जा आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळेल. तांबे हा धातू सर्व धातूंमध्ये शुद्ध व ऊर्जा वाहक आहे.
या धातूमध्ये सर्वात जास्त स का रा त्म क ऊर्जा असते. म्हणूनच आपण देवपूजेतही तांब्याच्या भांड्यांचा वापर करतो. तसेच सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर केला जातो. म्हणजे त्यामधील ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल.
ज्या डब्यात आपले रोजचे वापरायचे पीठ ठेवतो तो डबा तांब्याचा असावा आणि त्या डब्यामध्ये पीठ ठेवावे म्हणजे ती स का रा त्म क ऊर्जा पीठात उतरेल आणि चपाती, भाकरी आणि पोळ्याद्वारे आपल्याला मिळेल. जर आपल्याला इतका मोठा तांब्याचा डबा ठेवणे शक्य नसेल,
तर लहान तांब्याचा डबा घ्यावा व त्यात उद्यासाठी लागणारे पीठ एक दिवस अगोदरच तांब्याच्या लहान डब्यामध्ये ठेवावे व दुसऱ्या दिवशी त्यातीलच पीठ वापरावे आणि त्यानंतर पुन्हा त्यात पीठ भरून ठेवावे आणि जर हे शक्य नसेल तर एक तांब्याची वाटी किंवा डिश घेऊन आपल्या पीठाच्या डब्यात ठेवावी.
यामुळे पीठामध्ये स का रा त्म क ऊर्जा निर्माण होईल आणि आपल्यावर तसेच घरातील सर्व सदस्यांवर त्या स का रा त्म क ऊर्जेचा प्रभाव पडेल आणि आपल्या घरात सुख समृद्धी व संपन्नता येईल.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.