नमस्कार मित्रांनो,
अनेकांच्या अंगणात किंवा शेताच्या बांधावर पेरूचे झाड असत. लहान मुलांपासून ते वडीलधारी मंडळीपर्यंत पेरूचा आस्वाद आनंदाने घेतात. या फळाचे आरोग्यदायी फायदे खूप आहेतच पण या पेरूच्या पानांचे सुद्धा खूप अनमोल असे फायदे आहेत.
आपण अगदी साध्या पद्धतीने या पानांचा वापर करून अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. पेरूची कोवळी पाने ही खूप उपयोगी ठरतात. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, विटामिन सी असतात.
ही पेरूची पाने शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. कारण जेवणानंतर साखरेचे ऑब्झर्वेशन होत नसेल अशावेळी पेरूच्या पानांचा चहा पिल्याने रक्तातील साखर वापरायला भाग पाडतं.
ज्यामुळे शुगर जी आहे ती नॉर्मल राहते आणि एवढेच नाही तर या पेरूच्या पानाचा चहा पिल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढत नाही. ज्यामुळे हार्ट ब्लॉकेजचा धोका उद्भवत नाही. अनेकांना दात दुखीचा त्रास असतो. दात प्रचंड दुखत असते, दाताला कीड लागते तेव्हा दात दुखल्याने ज्या वेदना होतात त्या सहन होत नाही.
अशावेळी पेरूच्या पानांचा एक चतुर्थांश काढा तयार करायचा आणि त्या काढ्याने गुळण्या केल्याने याच्यामुळे आराम मिळतो. हिरड्यांना सूज आली असेल किंवा हिरड्यातून पू येत असेल अशा वेळीसुद्धा गुळण्या केल्याने आराम मिळतो. जर सतत तोंड येत असेल,
उष्णतेमुळे जिभेवर चट्टे पडले असतील तर पेरूच्या पानांचा ग्लासभर रस काढून त्याचा एक चतुर्थांश काढा तयार करायचा आणि त्या काढ्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ मिक्स करायचे आहे. दर चार तासांनी गुळण्या करायचे आहे. गुडघे दुखत असतील,
सूज असेल अशावेळी या पानांचा लेप तयार करायचा आणि त्या भागावर लावल्यामुळे गुडघे दुखी, वेदना, सूज कमी व्हायला मदत होते. इतके जबरदस्त फायदे असणारे हे पेरूचे झाड या झाडाची पाने आपल्याला आपल्या परिसरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. पेरूच्या या पानांचा औषधी गुणांची माहिती नसते.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.