पारिजातक आयुर्वेदातील चमत्कारी औषधी वनस्पती अनेक आजार करते बरे

नमस्कार मित्रांनो,

पारिजातकाच झाड अनेकजण आपल्या घरासमोर मोठ्या आवडीने लावतात. या झाडाला पांढऱ्या रंगांची फुले आणि केशरी रंगाचा दांडा असणारी फुले आपण पाहतो. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला या फुलांचा सडा या झाडाखाली पडलेला आपल्याला दिसतो.

या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म सुध्दा आहेत. सांधेदुखी सारख्या आजारावर पारिजातक रामबाण उपाय ठरतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु यापेक्षा अनेक समस्या आहेत ज्यावरती पारिजातकाचा रामबाण म्हणून उपाय केला जातो.

छोट्या मोठ्या शारीरिक वेदनांसाठी देखील पारिजातकाचा वापर फार उपयुक्त ठरतो. तर कोणकोणत्या असा समस्या आहेत ज्यावरती पारिजातकाचा वापर आपण करू शकतो त्याच्या बद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत.

आयुर्वेदानुसार पारिजातक ही वनस्पती कफनाशक आणि वातनाशक आहे. म्हणून शरीरातील सांधेदुखीच्या वेदनांवरती पारिजातकाची पाने फार उपयोगी ठरतात. गुडघे दुखी असेल, कंबरदुखी असेल, टाच दुखी असेल,

शरीरातील कोणत्याही प्रकारच्या सांधेदुखीवरती पारिजातकाच्या पानांचा काढा करून दिवसभरातून दोन वेळा पिल्याने शरीरातील वेदना पूर्णपणे नाहीसे होतात. एखाद्या वेळी एखादी नस दबलेली असेल त्यामुळे चालणे फिरणे अशक्य झाले असेल अशा वेळी आपण पारिजातकाच्या पानांचा काढा नक्की पिऊ शकता.

पारिजातक हे पित्त शोषक असल्यामुळे लिव्हरला आलेली सूज कमी करण्याचे काम ते करत असत. अगदी मंदावल्यामुळे भूक कमी लागत असेल अशा वेळी पारिजातकाच्या पानांचा काढा आपण नक्कीच घेतला पाहिजे. पारिजातकाच्या पानांचा काढा पिल्यामुळे आपल्या पोटामधील जंतू सुद्धा नष्ट होतात.

ज्या लोकांना जंतांचा त्रास असेल अशा व्यक्तींनी पारिजातकाचा काढा नक्कीच घ्यायला पाहिजे. तुम्ही जर पारिजातकाच्या पानांचा काढा औषध म्हणून अशा वेळी घेतला तर तुम्हाला या सर्व समस्यापासून नक्की सुटका मिळेल.

जर एखाद्या व्यक्तीला केस गळतीचा प्रॉब्लेम निर्माण झाला असेल, केस गळती होऊन टक्कल पडले असेल किंवा केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर या पारिजातकाच्या बिया उकळून टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास त्याठिकाणी पुन्हा नवीन केस यायला सुरुवात होईल.

ज्या व्यक्तींना लघवी करायला समस्या होते होते किंवा लघवी करताना जळजळ होत असेल, थांबत थांबत लघवी होत असेल तर अशा व्यक्तीनी पारिजातकाच्या सालीची पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून प्यायला हवी. ही पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होते.

जर तुम्हाला एखाद्या वेळेस थंडी ताप आला असेल तर पारिजातकाच्या पानांचा काढा हा खूपच उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला थंडी ताप जाणवत असेल तर अशावेळी या पानांचा काढा सकाळ-संध्याकाळ अर्धा कप या प्रमाणामध्ये तुम्हाला सेवन करायचे आहे.

रक्त शुद्धीकरणासाठी देखील या पानांचा काढा सकाळ आणि संध्याकाळ घेतल्यामुळे रक्त शुद्ध होतं. यासोबतच खाज असणे, खरूज, नायटा यासारख्या त्वचेचे आजार असतील यामध्ये सुद्धा आपल्याला याचा फार मोठा आधार मिळतो.

जर तुम्हाला देखील यातील एखादी समस्या असेल तर तुम्ही देखील नक्की आ यु र्वे दि क उपाय करून पाहू शकता. दवाखान्यामध्ये आपण लाखो रुपये खर्च करतो परंतु त्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही त्याऐवजी आपण हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *