नमस्कार मित्रांनो,
धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिची कृपा टिकवण्यासाठी लोक खूप कष्ट करतात. ते कठोर परिश्रम करतात जेणेकरून घरात सुख आणि समृद्धी राहावी आणि घर, धन आणि अन्नाने भरलेले असावे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा विधीनुसार केली जाते.
असे मानले जाते की ज्या घरात देवी लक्ष्मी वास करते, त्या घरात कधीही गरिबी येत नाही. मात्र देवी लक्ष्मीचा कोप झाल्यास घरात दारिद्र्य येते. अनेकवेळा कष्ट करूनही घरात पैशाचा ओघ वाढत नाही किंवा आपण कधी कधी रोजच्या जीवनात असे काही करतो, ज्यामुळे घरात पैसा टिकत नाही.
यामागे कोणतेही मोठे कारण नाही. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष्मीला नाराज करतात. पैशांचे व्यवहार करताना या गोष्टींची काळजी घेतली तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुम्ही खूप प्रगती कराल. वास्तुच्या या नियमांबद्दल जाणून घेऊया.
पैसे मोजताना या गोष्टी लक्षात ठेवा
1) वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये नोटा किंवा पैशांसोबत खाद्यपदार्थ ठेवणे टाळावे. हा पैशाचा अपमान आहे.
2) कोणत्याही गरीब किंवा गरजूला पैसे देताना, ते पैसे कधीही फेकून देऊ नका. असे केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो.
3) नोटा मोजताना लोक वारंवार नोटांना थुंकी लावतात. हे चुकीचे आहे. असे केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो. पैसे मोजताना, आपण पाणी किंवा पावडर वापरू शकतो.
4) पैसे कधीही उशाशी किंवा पलंगाच्या बाजूला ठेवू नयेत. असे केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. पैसे नेहमी कपाट किंवा तिजोरीसारख्या स्वच्छ ठिकाणी ठेवा.
5) तसेच पैसे नेहमी गोमती चक्र किंवा कवड्यांसोबत ठेवावेत. 6) धनात लक्ष्मी वास करते असे मानले जाते. त्यामुळे जमिनीवर पडलेले पैसे उचलल्यानंतर ते कपाळाला लावून पाय पडावे आणि मगच खिशात ठेवावेत.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.