नमस्कार मित्रांनो,
स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मुंबई येथील राहणारे मुकेश दादांचा स्वामी अनुभव सांगायला मी सुरुवात करते. मित्रांनो शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य मानले जातात. आज मी तुम्हाला शंकर महाराजांचा एक अद्भुत अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगणार आहे. मुकेश हा मुंबई येथे राहणारा. त्याला पुण्याच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी मिळाली.
मुकेश पुण्याला आला आणि आपल्या आत्याकडे राहायला लागला. पुण्यात नवीन असल्याने त्याला फारसे मित्र नव्हते. म्हणून ऑफिस सुटली की, धनकवडीला येणे आणि समाधी मंदिरात जाणे. हा त्याचा दिनक्रम बनला होता. एके दिवशी ऑफिसचे काम फार वेळ चालले. रात्रीचे साडेदहा ऑफिसमध्येच वाजले, वरून पाऊस पडत होता. आता घरी जाणार कसे? मुकेशच्या मनात प्रश्न येतो.
सातारा रोडपर्यंत अंधारच होता. सगळी वाहने बंद झालेली दिसत होती. आता कसे तरी घरी पोहचायचे? कुणाला लिप्ट मागायची असे त्याच्या मनामध्ये होते. मुकेश साधारणपणे दोन एक किलोमीटर चालला असेल तेवढ्यात मागून एक कार आली. त्याने हात दाखवला आणि कार थांबली. निदान सातारा रोडपर्यंत घेऊन जावे अशी त्याने कार मालकाला विनंती केली. मालक म्हणाला मला फक्त दोन किलोमीटर जायचे आहे.
दोन किलोमीटर मी तुला घेतो त्यापुढे तुजे तू पहा. मुकेश गाडीत बसला. वाटेत दोघांच्या गप्पा रंगल्या गाडी तीन ते चार किलोमीटर अंतर कापून सातारा रोडवर आली. मुकेशला आनंद झाला की, फक्त दोन किलोमीटर जाणारा माणूस माझ्यासारख्या अनोळखी माणसांसाठी इतका पुढे आला. जगात चांगली माणसे आहेत म्हणायची. मुकेशने मनामध्ये विचार केला आणि पाठीमागे जाणाऱ्या गाडीकडे पाहिले तर त्या माणसांमध्ये त्याला विलक्षण तेज दिसले.
गाडीतला माणूस त्याला म्हणाला, मुकेश मला तुझी काळजी आहे. आता लवकर स्टॉपवर जा पुढच्या दहा मिनिटांमध्ये गाडी येईल आणि तू सुखरूप घरी जाशील. धन्यवाद देत मुकेश स्टॉपकडे निघाला. बसची वाट पाहत तो स्टॉपवर थांबला. बरोबर दहा मिनिटांनी बस अली आणि तो बसमध्ये बसला. शांत बसमध्ये तो आपल्या नशीबाला धन्यवाद देत होता. काही वेळ बसल्यावर त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो चमकलाच! अरे शेवटची बस तास पूर्वीच जायला हवी होती.
तिकीट काढायला आलेल्या कंडक्टरला त्यांनी विचारले तेव्हा तो म्हणाला, ही शेवटची बस आहे का? इतका उशीर कसा झाला. तेव्हा तो म्हणाला की, रात्री अकराची शेवटची बस दीड तास उशिरा आली म्हणून तुम्हाला भेटली. या प्रसंगाने त्याला पूर्ण जाणीव झाली की, तो दाढीधारी ड्रायव्हर श्री शंकर महाराजच होते. या प्रसंगानंतर त्याची श्री महाराजांवर भक्ती दृढ झाली. मुकेशच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला अरे आपले नाव त्या कारवाल्याला कसे कळले. आपण तर नाव सांगितल्याचे त्याला आठवत नव्हते.
त्यांनी डोक्यामध्ये विचार केला पण आपण कधीही, आपण कुठे चाललो आणि आपले नाव सांगितल्याचे आठवत नव्हते. पण मग त्याला माझे नाव कसे कळले. अरे हो आणि त्याला मला कुठे जायचे आहे हे कसे माहिती? आपल्याला जिथे जायचे ती गाडी दहा मिनिटांनी येईल असे तो कसा म्हणाला.
मुकेशचे डोळे उघडले आपली काळजी घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून शंकर महाराजच होते. तर मित्रांनो हा अनुभव पाहता तुम्हाला काय वाटते. मुकेशला कोण भेटले होते, गाडी उशिरा का झाली होती. खरच स्वामी समर्थ शंकर महाराज आपल्या भक्तांसाठी आजही धावून येतात ना मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.