नमस्कार मित्रांनो,
स्वामी समर्थ म्हणाले की, आता आपल्याला या काट्यावरून पुढे जायचे आहे. आपले स्वामी महाराज निर्गुण-निराकार असीम अनंत स्वरूप गुरु तत्व आहे. याच गुरु तत्वाने मानवाला घडविण्यासाठी अक्कलकोटमध्ये सगुण स्वरूप धारण केले. असंख्य लीला करून प्रत्यक्ष कृतीद्वारे मानवाला घडविण्याचे कार्य सुरू केले होते. असो अक्कलकोट नगरीत स्वामींच्या लीलांची ख्याती वाढतच होती.
अक्कलकोट नगरीत भाविक भक्तांची संख्या वाढत होती. एके दिवशी असेच स्वामींच्या मनात आले आणि सेवेकरीसह बाहेरून आलेल्या भाविक मंडळींना घेऊन भक्ती करण्यासाठी जावे स्वामी कुठे चालले आहे ते कोणालाच माहित नव्हते. स्वामींच्या चालण्याचा वेग इतका होता की, सोबत असलेल्या मंडळींना अक्षरश: पळावे लागत. बरेच अंतर चालून आल्यानंतर ते एका निवडुंगाच्या राणाजवळ आले.
निवडुंगाच्या रानात सर्वत्र काटेच काटे पसरले होते. आता पुढे जायचे कसे हा प्रश्न सर्वांना पडला? त्याचवेळेला अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी बोलले आता आपल्याला ह्या काट्यावरून पुढे जायचे आहे. स्वामींनी असे बोलतात सर्वांच्या अंगावर शहारे आले. प्रत्येक जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होते.
स्वामींच्यासोबत काट्यावरून चालल्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती आणि आपण उगीच यांच्यासोबत आलो असा सर्वजण मनोमन विचार करू लागले. स्वामींनी हे बघितले आणि चोळप्पाकडे बघून बोलले चल रे चोळ्या स्वामींची आज्ञा होताच चोळप्पा तयार झाला आणि त्यानंतर स्वामी अनवाणी पायाने स्वामी नागफणीच्या काट्यावरून चालत गेले. त्यापाठोपाठ चोळप्पा सुद्धा चालत गेला.
स्वामी भक्तहो त्यानंतर च म त्का र झाला. स्वामी आणि चोळप्पा इतके सहज चालत गेले की, जणू काही तिथे काटे नव्हतेच. स्वामींच्या पायाला काट्यांनी स्पर्श केला तर नाहीच पण चोळप्पाला सुद्धा काही एक इजा झाली नाही. हा च म त्का र बघताच सर्वांना आश्चर्य वाटले. आजची स्वामी वाणी ही खरोखर आपल्याला अनन्य भक्तीची प्रेरणा देणारी आहे. आजच्या स्वामी वाणीतुन असंख्य बोध घेता स्वामी आज आपल्याला हा विश्वास देत आहेत की, बाळांनो तुम्ही माझे बोट पकडली आहे ना मग नि:शंक रहा निर्भय रहा.
जीवनात कितीही काटेरी संकट व दुःख असणारे प्रसंग येऊ देत भिऊ नका. मी तुमच्या सतत पाठीशी आहे. त्यातून मी तुम्हाला वाचवेल अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील. स्वामी भक्तहो आजच्या लीलेचे मनन चिंतन केले असता असे लक्षात येते की, स्वामी आपल्याला सतत घडवत असतात. आपल्यातील न का रा त्म क मनावर सतत काम करत असतात. त्याला अनन्य भक्तीची गोडी लावत असतात. आणि यातूनच प्रेम आनंद साहस शांती करूणा शमा समृद्धी अधिक गुण विकसित करत असतात.
हे करत असताना योग्य वेळी आपली परीक्षा घेऊन जर त्यात काही उणीव राहिली असेल तर त्याचे दर्शन करून देत असतात. आणि त्यावर काम करण्याची प्रेरणा देत असतात. आजचा स्वामी लिलेतील पात्र म्हणजे आपल्या मनातील विचारांचे प्रतीक आहे. जसे स्वामी जेव्हा काट्यांवरून चालण्यासाठी म्हणाले तेव्हा काही भक्तांनी स्वामींच्यासोबत चालण्याची हिम्मत दाखवली नाही ते फक्त आपल्याच मनातील भीती शंका-कुशंका असलेल्या न का रा त्म क विचारांचे प्रतीक आहेत.
आणि चोळप्पा हे अतूट अभेद्य श्रद्धेच्या विचाराचे प्रतीक आहेत. म्हणून आज आपल्या जीवनात कितीही संकट असू दे वा दुःख असू दे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. माझे जीवन खूप छान आणि सुंदर आहे. हा अतूट अभेद्य विश्वास ठेवायचा आहे. चला तर मग स्वामींना प्रार्थना करूया हे समर्थ.
आता मी तुमचे बोट पकडले आहे माझे सर्व जीवन तुम्हाला समर्पित केले आहे. तुम्ही माझे सारथी आहात माझ्या जीवनाची गाडी तुम्ही चालवत आहात. ही जीवन गाडी तुम्हाला ज्या दिशेला न्यायची त्या दिशेला खुशाल घेऊन जा. आता रस्त्यात कितीही संकट रूपी काटे येऊ दे मला त्याची पर्वा नाही. कारण हे स्वामी समर्था इतिहासात तुमची ख्याती आहे.
ज्याचा तुम्ही सारखी झाला त्याचा विजय निश्चित आहे. मग मी का चिंता करावी? हे गुरुराया! माझी मागणे इतकेच आहे की, तुमच्या चरणांपासून दूर नका. लोटू या मनाला तुमच्या भक्तीचे अजून वेड लावा. माझे प्रत्येक कर्म म्हणजे तुमचीच सेवा आहे. ही समज द्या तुमच्या नामाचा ध्यास द्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.