नेमके काय घडले? वासुदेव बळवंत फडके भेट

नमस्कार मित्रांनो,

भारताला स्वातंत्र्य हे सहजासहज मिळालेले नाही, हे सर्वश्रुत आहे. आपली भारतमाता ब्रिटिशांच्या जोडखंडातून मुक्त व्हावी, यासाठी अनेकांनी रक्त सांडले. आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रांतीकार्याची एक एक माळ घडत गेली.

एका क्रांतीवीराकडून प्रेरणा घेत पुढे अनेक क्रांतीकारक घडले; प्रसंगी कामी आले. भारतमातेला स्वतंत्र करण्याची पहिली ठिणगी सन १८५७ मध्ये पडली आणि स्वातंत्र्याचा होम खऱ्या अर्थाने पेटला. यानंतर असंख्य क्रांतीकारकांनी यात सक्रिय सहभागी होऊन अखेर भारतमातेला स्वतंत्र केले. यामध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून
वासुदेव बळवंत फडके यांचे नाव आवर्जुन घेतले जाते.

वासुदेव बळवंत फडके यांना सशस्त्र क्रांतीचे जनक असेही म्हटले जाते. वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.

दत्तोपासक असलेले वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. स्वामी समर्थ आणि वासुदेव बळवंत फडके यांची भेट अक्कलकोटला झाली. या भेटीत नेमके काय घडले? पाहूया…

दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवासाठी दिल्या; मग हे भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्या साठी का देऊ नये? असा सवाल वासुदेव बळवंत फडके नेहमी करत असत. स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असल्यामुळे दोन ते तीन वेळा ते स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला गेले होते असे म्हटले जाते.

रामोशी, भिल्ल, आगरी आणि कोळी आदी समाज बांधवांना एकत्रित करून ब्रिटीश सरकारविरोधात लढा उभारण्याचा निर्णय फडके यांनी घेतला. मात्र, त्यापूर्वी गुरु आज्ञा घेण्यासाठी वासुदेव बळवंत फडके अक्कलकोटला आले.

वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांना शरण गेले आणि आपली तलवार काढून स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवली. आपली कार्ययोजना आणि मनोदय सांगितला. स्वामी महाराजांच्या हातून तलवार मिळावी आणि क्रांतीकार्यास आशीर्वाद मिळावा, अशी त्यांची इच्छा होती.

स्वामी समर्थ त्रिकालद्रष्टे होते. वासुदेव बळवंत फडके यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले की, हम जानते है | नेक काम है |, असे सांगत एका सेवेकऱ्याला समोर ठेवलेली तलवार नेऊन झाडावर टांगून ठेवण्यास सांगितले. स्वामी समर्थांना उद्देशून म्हणाले की. अभी वक्त नही हैं |

तुम्ही आरंभीलेले कार्य चांगले असले, तरी क्रांतीकार्याला यश येणार नाही, असे स्वामी म्हणाले. मात्र, प्रांरभिलेल्या कार्यात फडके माघार घेऊ शकत नव्हते. अखेर वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली. स्वामींना साष्टांड दंडवत घातले आणि पुढील प्रवासी निघून गेले. कालांतराने शर्थीची झुंज अपयशी ठरली.

अखेर वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली आणि माघ शुद्ध एकादशी शके १८०४ रोजी वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथील कारागृहात निधन झाले.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *