नवरात्र रोज दिव्यात नक्की टाका ही 1 वस्तू, पूर्ण वर्षभर पैसा येत राहील.

नमस्कार मित्रांनो,

नवरात्र उत्सवाचे सुरुवात झालेली आहे. नवरात्र काळात घरोघरी देवीचे आनंदाने व उत्साहाने पूजन केले जाते. देवीला प्र स न्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. देवीला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवीचे दररोज वेगवेगळ्या रूपात आपल्या घरी आगमन होत राहते. म्हणून आपण देवीचे दररोज वेगवेगळ्या फुलांनी, पानांनी, वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करून पूजन करीत असतो. नवरात्रीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. नवरात्रात 9 दिवस अखंड दिवा प्रज्वलित केला जातो.

या दिव्यांमध्ये अशी 1 वस्तू टाका. ज्यामुळे देवी आईचे आपल्यावर कृपा होईल आणि देवीच्या कृपेमुळे आपले जीवन सुख समृद्धी व ऐश्वर्याने भरून जाईल. ते आपण आजच्या माहितीमध्ये जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे शैलपुत्री रूपात पूजन केले जाते. या दिवशी देवीच्या साडीचा रंग पिवळा असतो. शैलपुत्री देवीला पहिल्या दिवशी गायीच्या साजूक तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो. पहिल्या दिवशी देवी आईला साजूक तूप अर्पण केल्यास आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते आणि आपले शरीर निरोगी बनते.

दुसऱ्या दिवशी देवी आईचे ब्रह्मचारिणी स्वरूपात पूजन केले जाते. या दिवशी देवी आईच्या साडीचा रंग हिरवा असतो आणि देवी आईला नैवेद्य म्हणून पंचामृत किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवी आईला पंचामृत किंवा साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा स्वरूपात असते. देवी आईच्या साडीचा रंग तपकिरी असतो. चंद्रघंटा देवीला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या खिरचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवी आईला दूध किंवा खीर अर्पण केल्याने आपली दुःखापासून मुक्त होते आणि आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते.

नवरात्रात चौथ्या दिवशी देवी आईची कुष्मांडा स्वरूपाचे पूजन केले जाते या दिवशी देवी आईच्या साडीचा रंग हा नारंगी म्हणजे ऑरेंज असतो यादिवशी देवी आईला नैवेद्य म्हणून उपवासाचे मालपुवे केले जातात देवी आईला मालपुवेचा नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि आपल्या निर्णय क्षमतेत वाढ होते. पाचव्या दिवशी देवी आईचे स्कंदमाता स्वरूपात पूजन केले जाते या दिवशी देवी आईच्या साडीचा रंग हा पांढरा असतो देवीला नैवेद्य म्हणून केळी अर्पण केली जातात देवी आईला केळीचा नैवेद्य अर्पण केल्यास आपले शरीर निरोगी राहते.

नवरात्रीत सहाव्या दिवशी देवी आईची कात्यायनी स्वरूपाचे पूजन केले जाते. या दिवशी देवी आईच्या साडीचा रंग लाल असतो. देवी आईला मध अतिप्रिय आहे म्हणून या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवी आईला मधाचा नैवेद्य अर्पण केल्यास आपली आकर्षण शक्ती वाढते. सातव्या दिवशी देवी आईच्या कालरात्री स्वरूपाची पूजन केले जाते. या दिवशी देवी आईच्या साडीचा रंग डार्क निळा असतो. सातव्या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवी आईला गुळाचा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या जीवनातील शोक व दुःख दूर होते आणि येणाऱ्या संकटांपासून आपले संरक्षण होते.

नवरात्रात आठव्या दिवशी देवी आईच्या महागौरी स्वरूपाचे पूजन केले जाते. या दिवशी देवी आईच्या साडीचा रंग गुलाबी असतो. देवीला नैवेद्य म्हणून श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण केले जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी आईला नारळ अर्पण केल्यास आपल्या मुलांविषयी काही प्रॉब्लेम असतील, काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होतात. देवीला अर्पण केलेला हा नारळ दसऱ्याच्या दिवशी फोडून त्याचा प्रसाद सर्वांनी खाऊन घ्यावा. नवरात्रात नवव्या दिवशी देवी आईची सिद्धीदात्री स्वरूपात पूजन केले जाते. या दिवशी देवी आईच्या साडीचा रंग जांभळा असतो.

या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून पांढरे तीळ अर्पण करावेत. देवी आईला पांढरे तीळ अर्पण केल्याने आपली मृत्युची भीती कमी होते आणि अनुचित, आकस्मित घटनांपासून आपले संरक्षण होते. चला तर आता जाणून घेऊयात दिव्याविषयी. नवरात्र काळात जर आपली एखादी इच्छा व मनोकामना असेल तिची पूर्तता करायची असेल तर देवी आईसमोर 9 मातीचे दिवे लावावे. हे 9 दिवे 9 दिवस अखंड तेवत राहतील याची काळजी घ्यावी. दिवे लावण्यापूर्वी हातात पाणी घेऊन आपली इच्छा देवीला सांगावी व अखंड दिवे लावण्याचा संकल्प करावा. या उपायामुळे आपले कठीणातील कठीण व मनोकामना नक्कीच पूर्ण होते.

परंतु या 9 दिव्यांमध्ये एकही दिवा मध्येच विझनार नाही याची काळजी घ्यावी. हा उपाय आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करणार आहोत यासाठी 9 दिवे लावावे लागतील. तसे आपण नवरात्रीमध्ये देवी आईपुढे अखंड 1 दिवा लावतो तोच लावावा. देवीपुढे अखंड दिवा लावल्याने आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते. घरातील भांडणे, वादविवाद मिटतात. घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. परस्परांमधील संबंध मधुर होतात. आपल्या जीवनातील दुःख व बाधा दूर होतात. आकस्मित येणाऱ्या संकटांपासून आपले संरक्षण होते. देवी आईच्या कृपेमुळे आपले घर धन धान्याने भरून जाते. दिवा लावताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, दिवा सरळ जमिनीवर ठेऊ नये.

दिव्याखाली लाल रंगाचे कापड किंवा तांदूळ जरूर टाकावेत. त्याशिवाय आपण दिव्याखाली तांदळाचे अष्टदल कमळही काढू शकतो. देवीसमोर दिवा लावताना शक्यतो शुद्ध तूपाचाच वापर करावा. जर हे शक्य नसेल तर तिळाच्या किंवा राईच्या तेलाचा दिवा आपण लावू शकतो. नवरात्रीमध्ये दिवा लावताना दिव्याची वात शक्यतो लाल रंगाच्या दोऱ्याची असावी. कारण देवीआईला प्र स न्न करायचे असेल तर लाल रंगाच्या दोऱ्याने दिवा लावावा. जर साजूक तुपाचा दिवा असेल तर तो दिवा देवी आईच्या डाव्या बाजूला ठेवावा. आणि तेलाचा दिवा असेल तर देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा. आता आपण जाणून घेऊयात या दिव्यांमध्ये कोणती वस्तू टाकावीत ते.

जर आपल्याला धन संपत्तीची प्राप्ती करायची असेल, आर्थिक स्थिती बळकट करायची असेल तर दिव्यामध्ये एक कवडी किंवा गोमती चक्र टाकावी. किंवा या दोन्ही वस्तू टाकल्या तरीही चालेल. यामुळे सर्व आर्थिक समस्यांपासून आपली सुटका होईल. शत्रूंपासून सुटका मिळवायची असेल, आपल्याला शत्रू खूप त्रास देत असतील तर दिव्यामध्ये लवंगा टाकाव्यात. लवंग आपण 5, 7 किंवा 9 टाकू शकतो. यामुळे आपल्या हे सर्व शत्रूंचा नाश होईल. हे झाले अखंड दिव्याविषयी. ज्याला आपल्याला 9 दिवस एकाच ठिकाणी ठेवायचे आहे. परंतु आपण ज्या दिव्याने दररोज सकाळ संध्याकाळ आरती करतो त्या दिव्यांमध्ये काय टाकावे.

देवीची आरती करताना त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकाव्यात जर आपल्या कुंडलीत शनिदोष असेल, साडेसाथीने आपण त्रस्त झाला असाल तर देवीची आरती करताना त्या दिव्यात तिळाचे तेल टाकावे. यामुळे शनिदेवाची कृपा आपल्यावर होते व शनि दोषापासून आपली सुटका होते. आपण हा दिवा घरातही देवघरासमोर लावून ठेवू शकतो. यामुळे आपल्या घरात काही वास्तू दोष असेल तर तो निघून जातो. देवीची आरती करताना सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळी कापूर लावावा व कापुरामध्ये दोन लवंगा टाकाव्यात आणि याचा सुगंध संपूर्ण घरात फिरवावा. यामुळे आपल्या घरातील सर्व न का रा त्म क ऊर्जा नष्ट होऊन घरात स का रा त्म क वातावरणाची निर्मिती होते आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी व संकटांपासून आपली सुटका होईल.

जर शक्य असेल, तर कापूर चांदीचा दिवा किंवा चांदीच्या वाटीत लावावा. जर आपल्याकडे चांदीची वाटी किंवा दिवा नसेल तर आपण इतर कोणत्याही दिव्यात कापूर लावू शकतो. आपल्याला जर देवी आईसमोर तेलाचा व तुपाचा हे दोन्ही दिवे लावायचे असतील तर आपण हे दोन्ही दिवे लावू शकतो. यामुळे आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *