नमस्कार मित्रांनो,
नवरात्र काळाची सुरुवात झालेली आहे. या वर्षी 9 दिवसांचा नवरात्र उत्सव साजरा होत आहे. नवव्या दिवशी दसरा साजरा केला जाईल. नवरात्र काळात 9 दिवस नवदुर्गाचे पूजन केले जाते. नवरात्र काळात देवी आईचे मनोभावे पूजन केल्यास देवी आई आपल्यावर प्र स न्न होते व आपल्या दुःखाना व कष्टांना हरवून आपल्या जीवनात सुख समृद्धी व वैभव प्रदान करते. नवरात्र काळात 9 दिवसांचे व्रत ठेवले जाते आणि देवी आईचे विविध रूपात पूजन केले जाते.
नवरात्र काळात कन्या पूजन करण्याचे ही फार म ह त्व आहे. लहान लहान मुलींचे यावेळी पूजन केले जाते. देवी स्वरूप मानून त्यांना गोड धोड बनवून खायला दिले जाते आणि भेटवस्तू व दक्षिणा दिली जाते. नवरात्रीमध्ये 9 दिवस कन्या पूजनाचे महत्त्व आहे म्हणून जर शक्य असेल, तर नवरात्रीचे 9 दिवस दररोज एखाद्या मुलीचे पूजन करून तिला भेटवस्तू जरूर द्यावी. परंतु जर हे शक्य नसेल तर सप्तमी, अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तरी 9 कन्यांना भोजन देऊन त्यांचे पूजन करावे.
परंतु या कन्यांना भेट म्हणून अशी कोणती वस्तू द्यावी ज्यामुळे त्या कन्या तर खुश होतीलच परंतु देवी आईचीही कृपा आपल्यावर होऊन आपले जीवन सुखी सं प न्न व समृद्ध होईल. चला तर जाणून घेऊया हा उपाय. हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. 1 भरपूर जठा असलेली नारळ स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर देवी आईसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
देवी आईला हळद-कुंकू अर्पण करावे. त्यानंतर देवी आईसमोर बसून त्या नारळावर कुंकवाने स्वस्तिक काढावे व देवी आईला ते नारळ अर्पण करावे. त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील ते देवी आई समोर मांडाव्यात व त्या पूर्ण होण्यासाठी देवी आईकडे प्रार्थना करावी. तसेच आपल्या जीवनातील दुःख, पीडा, अडचणी व संकटेही देवी आईला सांगावी. आणि त्या अडचणींचे निवारण करण्यासाठी देवी आईकडे विनंती करावी.
त्यानंतर देवी आईच्या मंत्राचा जप करावा. नवरात्र काळात देवी आईच्या मंत्राचा जप केल्यास देवी आईची कृपा आपल्यावर खूप लवकर होते. त्यानंतर नारळ हातात घेऊन नारळाला नमस्कार करावा आणि देवीला सांगावे की, हे देवी आई आम्ही कन्यांना देवी स्वरूप मानून हे नारळ एका कन्येला अर्पण करीत आहोत. असे म्हणून ते नारळ एखाद्या दहा वर्षाच्या आतील मुलीला देऊन टाकावे.
नारळाला श्रीफळही म्हंटले जाते. देवी आईला श्रीफळ अतिप्रिय आहे आणि नवरात्रीच्या काळात जर आपण देवी आईला कन्येच्या स्वरूपात मानून नारळ अर्पण केले तर देवी आई आपल्यावर खूप प्र स न्न होते. छोट्या कन्येने ते नारळ मनापासून स्वीकारले तर देवी आईने साक्षात ते स्वीकारले आहे असा त्याचा अर्थ होतो. तो नारळ देताना त्याबरोबर 11, 21 किंवा 51 रुपये दक्षिणा ही द्यावी. यामुळे देवी आईच्या आपल्यावर कृपा होते व आपले धन धान्याने भांडार भरून जाते.
नवरात्र काळात आपण हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतो. नारळ व दक्षिणा दिल्यानंतर त्या कन्येला हळद कुंकू लावून तिला नमस्कार करावा व देवी आईला ही नमस्कार करावा. एका कन्येला नारळ देऊन आपण 9 कन्यांचाही उपाय करू शकतो. यासाठी गोडधोडाचा स्वयंपाक करून 9 छोट्या छोट्या कुमारिकांना बोलावून देवी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावे. त्यांना पोटभर जेवण द्यावे आणि एक रुमाल, टिकलीचे पाकीट, बांगड्या, दक्षिणा अशी भेटवस्तू द्यावी. यामुळे देवी आईचे कृपा आपल्यावर नक्कीच होते व आपल्या घरात अन्नधान्याची तसेच धनसंपत्तीची भरभराट होते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.