नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर घरी बनवा असे स्वस्तिक पूर्ण वर्षभर लक्ष्मी, पैसा राहील घरी

नमस्कार मित्रांनो,

2021 वर्ष संपले आहे. आता आपण नवीन वर्षात म्हणजेच 2022 मध्ये प्रवेश केलो आहोत. नवीन वर्ष सर्वाँना आनंदाचे, प्रगतीचे, आरोग्याचे, भरभराटीचे आणि उत्साहाच्या जावो हीच भगवंत चरणी प्रार्थना. मागील 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीतून जात आहोत.

हा काळ सर्वांसाठी खरोखर खूपच खडतर काळ होता. परंतु त्यातूनही सहीसलामत बाहेर पडून आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत हे ही काही कमी नाही. आता येणारे नवीन वर्ष आपल्याला सुख समाधान व आनंद देणारे असावे हीच माफक अपेक्षा.

येणारे नवीन वर्ष सुख-समाधानाचे जाण्यासाठी आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध उपाय करतो. नवीन वर्ष येताना सोबत सुख व आनंदाचे गाठोडे घेऊन येणारे असावे. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी आपली प्रगती व्हावी यासाठी सर्व जण धडपडत असतात.

आपण नवीन वर्षाचा नवीन दिवशी मंदिरात जाऊन भगवंतांचे दर्शन घेतो. कारण जर वर्षाची सुरुवात जर शुभ झाली तर आपल्या जीवनात सर्वकाही शुभच होईल. येणाऱ्या नवीन वर्षाच्या बद्दल सर्वांच्या मनात खूप अपेक्षा असतात. येणारे नवीन वर्ष सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावे यासाठी आजच्या या माहितीमध्ये एक खास असा उपाय बघणार आहोत.

हा उपाय खूपच साधा व सोपा आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या भाग्याचे आपल्याला साथ मिळेल. देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊन आपण वर्षभर धनसंपत्तीने परिपूर्ण राहू. आपल्या हातात पैसा खेळू लागेल. चला तर जाणून घेऊया तो उपाय.

यासाठी नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर सकाळी लवकर उठून स्नान करावे. मग संपूर्ण घराची स्वच्छता करून आरतीचे ताट तयार करावे. भगवंतांचे पूजन करावे त्यानंतर मुख्य दाराजवळ जाऊन उंबरठ्यावर पाणी शिंपडावे व त्याचे पूजन करावे आणि विनंती करावी की, या नवीन वर्षात जे काही चांगले व सकारात्मक असेल तेच आपल्या घरात यावे.

वाईट व नकारात्मक गोष्टीनी घरात प्रवेश करू नये. त्यापूर्वी थोडेसे तांदूळ भिजत घालून त्याची पेस्ट करावी. त्या पेस्टमध्ये हळद किंवा असेल तर केशराच्या दोन तीन काड्या टाकून त्या पेस्टने मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढावे. त्यांना मधोमध अक्षता चिटकाव्यात.

त्यानंतर देवी लक्ष्मीची पावले घरात प्रवेश करीत आहे अशाप्रकारे उंबरठ्यावर लावावे. परंतु त्यावर आपला पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर या मिश्रणाने आपल्या देवघरात ही दोन स्वस्तिक काढावे आणि देवी लक्ष्मीची पावले देवघरातून घरात येत आहेत अशा प्रकारे लावावे. स्वस्तिक म्हणजे ऐश्वर्य, स्वस्तिक म्हणजे लक्ष्मी.

किचनच्या दारावरही 2 स्वस्तिक काढावेत आणि आपली गॅसची शेगडी जेथे ठेवलेली आहे त्याच्या वरच्या बाजूलाही स्वस्तिक काढावे आणि त्यावरही अक्षता लावाव्यात. यामुळे देवी अन्नपूर्णेचा आपल्यावर आशीर्वाद राहील आणि संपूर्ण वर्षभर आपल्याला अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही.

वर्षाची सुरुवात झाल्यावर कोणत्याही दिवशी एखादा गोड पदार्थ आणून भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा आणि घरातील सर्व सदस्यांनी तो गोड प्रसाद ग्रहण करावा. यामुळे आपले संपूर्ण वर्ष गोड व मधुर राहील.

आपल्या गावाचे ग्रामदैवत असतील त्यांच्या दर्शनालाही जरूर जावे म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्यावर वर्षभर राहील आणि आपले संपूर्ण वर्ष आनंदाचे सुखासमाधानाचे उत्साहाचे व आरोग्यपूर्ण राहील.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *