नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो नूतन वर्ष 2022 सुरू झाले आहे. या नवीन वर्षाचे कॅलेंडर दिनदर्शिका आपण खरेदी केलेली असेल किंवा करणार असाल. हे कॅलेंडर आपल्या घरात लावताना ते नक्की कोणत्या दिशेला लावावे व कोणत्या भिंतीवर लावावे याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील घड्याळ आणि कॅलेंडर या 2 वस्तू आपला दिवस किंवा वेळ कशी जाणार हे ठरवत असतात आणि म्हणूनच आपल्या जीवनात सर्वकाही शुभ घडावं यासाठी या दोन वस्तूंकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवं. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही कॅलेंडर लावण्यासाठी अत्यंत अशुभ मनीषा मान्यता दिली आहे.
आपण आपल्या घरातील दक्षिणेकडच्या भिंतीवर कॅलेंडर कधीच लावू नका. ही दिशा मृत्यूची दिशा मानण्यात आलेली आहे. दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमदेव यांची दिशा आहे. या दिशेला मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. या दिशेला कॅलेंडर लावल्यास घरात अनेक प्रकारच्या अशुभ घटना घडू लागतात.
लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही. पैशांच्या धनाच्या अडचणी उत्पन्न होतात आणि म्हणून आपण कटाक्षाने दक्षिण दिशा ही नक्की टाळा. अनेक लोक आपल्या दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर लावणं पसंत करतात. मित्रांनो आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सर्व प्रकारच्या व्यक्ती आपण स्वतः ये-जा करत असतो.
बाहेरून घरात येताना आपल्या सोबत अनेक प्रकारच्या उर्जा येतात. काही ऊर्जा चांगले असतात तर काही वाईट असतात. अशा वेळी या ऊर्जांचा अशुभ प्रभाव या कॅलेंडरवर पडू शकतो आणि म्हणूनच दरवाजाच्या पाठीमागे आपण कॅलेंडर लावू नये. प्रश्न असा आहे की, कॅलेंडर लावावे तरी कुठे? कॅलेंडर लावण्याची शुभ दिशा कोणती?
मित्रांनो काही जणांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात पैसा आहे मात्र हा पैसा टिकत नाही अगदी विनाकारण नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टींवर पैसा खर्च होतो. आजारपण असेल किंवा पैशांची उधळपट्टी खूप मोठ्या प्रमाणात होते पैसा टिकून राहत नाही अशा वेळी आपण पश्चिम दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर नक्की लावा.
आपल्या घरातील पश्चिम दिशेच्या भिंतीवर हे कॅलेंडर लावल्यास पैसा टिकून राहतो लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो. आता काही लोकांना उद्योगधंद्यांमध्ये व्यवसायामध्ये यश मिळत नाही. काहीही करा पैसाच येत नाही, पैशांची तंगी सतत असते. अशा लोकांनी लक्ष्मीचे आगमन व्हावं,
उद्योग धंदा व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी आपल्या घराच्या उत्तर दिशेला जी भिंत आहे उत्तर दिशेच्या भिंतीवर आपलं कॅलेंडर लावून तर पहा लक्ष्मी आपल्या घरात स्थिर रूपाने वास करू लागेल धंदा व्यवसाय व्यापार व्यवस्थित चालू लागेल. मित्रांनो जे लोक नोकरी करतात आणि नोकरीमध्ये प्रोमोशन होत नाही.
जॉब करतात त्यामध्ये प्रोमोशन होत नसेल, नवीन संधी मिळत नसतील तर त्यासाठी सुध्दा उत्तर दिशा अत्यंत शुभ आहे. या दिशेला आपण कॅलेंडर बिनदिक्कतपणे लावू शकता. जे लोक समाजकारणात आणि राजकारणात आहेत ज्यांचा समाजाशी खूप जवळचा संबंध येतो त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी पूर्व दिशेला म्हणजे पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावल्यास त्यांना खूप चांगले रिझल्टस हे पाहायला मिळतील.
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा आपण कॅलेंडरमध्ये काहीतरी पाहू तारीख पाहू किंवा एखादी तिथी पाहत असतो तेव्हा आपलं मुख आपलं तोंड, चेहरा हा दक्षिणेला येता कामा नये. हे कॅलेंडर अस लावावं की, तारीख वेळ मुहूर्त तिथी पाहताना आपलं मुख आपला चेहरा हा दक्षिणेकडे नसावा. त्याप्रकारे सुद्धा आपण हे कॅलेंडर लावणं महत्त्वाच आहे.
मित्रांनो कॅलेंडरची खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा ज्या कॅलेंडरवरती हिंस्त्र पशूंची चित्र आहेत, जंगली प्राण्यांची चित्र आहेत तर असे हे कॅलेंडर आपण खरेदी करु नका. त्यामुळे आपल्या घरातील लोकांच स्वभाव रागीट बनतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊ लागतात. याचं कारण हे चित्र आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात.
आपल्या घरातील वातावरण हे नकारात्मक बनत आणि अशा घरात लक्ष्मी शक्यतो राहत नाही. दुसरी गोष्ट ज्या कॅलेंडरमध्ये रडणारी मुले किंवा अगदी उदास अशा प्रकारचे चेहरे आहेत रडणाऱ्या व्यक्ती आहेत असं कॅलेंडर सुद्धा वास्तुदोष उत्पन्न करतात. असं कॅलेंडर सुद्धा आपल्या घरात नसावं.
शकतो कॅलेंडरवर देवी देवतांचे चित्र असतील किंवा काही शुभमंगल चिन्ह असतील, स्वस्तिक असेल, ओम असेल असे चिन्ह असणारे कॅलेंडर आपण खरेदी करावं. जर तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडतात, सतत काही ना काही आजारपण चालू आहे, दुखणं चालू आहे अशा वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावण्यात हे खूप शुभ मानण्यात आलेला आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.