नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यात घराच स्वप्न नक्की पाहते. आपल्या स्वतःच्या मालकीचा आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि मग आपण एखादी चांगली जागा पाहून प्लॉट पाहून त्या ठिकाणी बांधकाम करतो. नवीन घरामध्ये, नवीन फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये घरामध्ये राहायला जातो. मात्र तिथे गेल्यानंतर त्या घरात सुख काही लाभत नाही.
सतत कोणी ना कोणी आजारी पडतं. घरामध्ये वादविवाद होतात, क्लेश होतात. कामांमध्ये अपयशी येऊ लागतं. जो उद्योग धंदा जो व्यवसायाची दुकान अगदी व्यवस्थित चालू होतं. नवीन जागेत राहायला गेल्यानंतर ते दुकान अचानक बंद पडत. त्या ठिकाणी तोटा येऊ लागतो. अशावेळी नक्की काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो आणि काय करावं हे समजत नाही.
कारण घर बांधण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केलेला असतो. फ्लॅट विकत घेण्यासाठी प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी प्रचंड पैसा खर्ची पडलेला असतो. आता इकडे आड तिकडे विहीर अशी आपली अवस्था होते. ना धड ती वास्तू सोडता येते आणि या समस्या तर आहेतच. अशावेळी वास्तुशास्त्र आपल्या मदतीला येऊ शकत.
कदाचित जर तुमच्या त्या वास्तूमध्ये काही वास्तूदोष असतील, कारण ही जी वास्तू आहे ज्या वास्तूमध्ये तुम्हाला सुख लाभत नाहीये अशी वास्तु वास्तुदोषास पात्र असते आणि हे वास्तुदोष जाण्यासाठी घरातील जी कर्ती व्यक्ती असेल मग करता पुरुष असेल किंवा कर्ती स्त्री असेल तिने एका मंत्राचा जप अगदी सातत्याने करावा.
दररोज अंघोळ केल्यानंतर कमीत कमी 11 वेळा, 21, 51, 108 वेळा या मंत्राचा जप जर दररोज नित्यनियमाने कमीत कमी 6 महिने आपण केला तर विश्वास ठेवा वास्तुदोषापासून तुम्ही तुमच्या कुटुंबियांची सुटका नक्की होते. घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री कर्ता म्हणजे जी व्यक्ती पैसे कमावते घर चालवण्यासाठी ज्या व्यक्तीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे अशी व्यक्ती त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे.
स्त्री पुरुष असा भेदभाव नाही. मात्र लक्षात ठेवा जर आज 11 वेळा या मंत्राचा जप करताय सलग सहा महिने अकरा वेळा जप करा. त्यामध्ये बदल करू नका आणि जास्तीत जास्त 108 वेळा म्हणजे एक माळ या मंत्राचा जप करण्यासाठी कोणत्याही माळेचा आपण जप माळेचा वापर करू शकता. ती स्फटिकांची असेल किंवा आपल्याकडे रुद्राक्षांची माळ अवेलेबल असते.
अगदी कोणत्याही जप माळेचा वापर किंवा तुळशीची असेल तिचा वापर करू शकता. मंत्र काही असा आहे. अगदी व्यवस्थित पहा आणि शब्दांचे उच्चारण शक्यतो चुकणार नाही याची काळजी घ्या. कमीत कमी सहा महिने या मंत्राचा जप करायचा आहे. सहा महिन्यात तुम्हाला दिसून येईल की, वास्तूमध्ये तुम्हाला सुख लाभत आहे.
वास्तू सौख, ग्रह सौख्याची प्राप्ती तुम्हाला नक्की होईल. हे सर्व करत असताना एक नियम लक्षात ठेवा. घरांमध्ये नेहमी चांगलंच बोला. वाईट बोलू नका, कुणालाही दोषाने देऊ नका, घरामध्ये आपल्या मनात वाईट विचार येणार नाहीत याची काळजी घ्या. आपली जी कुलदेवता असेल, कुलदैवत असेल त्यांच जर तुम्ही स्मरण करत नसाल,
तुमची देवघरात जर कुलदेवता नसेल तर ही फार मोठी चूक आहे. त्या कुलदेवतेला आपल्या घरामध्ये स्थान द्या. वास्तूदेवता नक्की प्रसन्न होते. मंत्र आहे अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता ये भूता विघ्नकर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया याठिकाणी भूता याचा अर्थ तुम्ही जो समजता तसा नाहीये. काहींचा थोडासा वेगळा अर्थ समजू शकता तसा तो नाहीये.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.