नमस्कार मित्रांनो,
लग्नासाठी मुला मुलींची कुंडली पाहत असताना बऱ्याचदा एक नाड किंवा नाडी दोष असल्याचे ज्योतिषी तज्ञांकडून सांगितले जाते. नाडी दोष किंवा एक नाड आल्यास लग्न टाळण्याचा सल्ला देखील देण्यात येतो. आजच्या या विज्ञान युगात नाडी दोष मानणं कितपत योग्य आहे आणि याला शास्त्रीय दृष्ट्या काही ठोस आधार आहे का?
असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. त्या सर्वांसाठी आजची ही माहिती उपयोगी ठरणार आहे. नाडी दोष समजून घेण्यापूर्वी नाडी हा काय प्रकार आहे हे समजणं जास्त आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रात नाडी चे तीन प्रकार सांगितलेले आहेत. ते याप्रमाणे आधी, मध्य आणि अंत्य. जन्मनक्षत्राच्या आधारे नाडी कोणती हे कळते.
जगातला प्रत्येक व्यक्ती नाडीच्या याच 3 प्रकारांमध्ये मोडतो. नाडी आणि आयुर्वेदाचा सुद्धा काहीतरी संबंध आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जसे नाडीचे आधी, मध्य आणि अंत्य असे 3 प्रकार सांगितले जातात. अगदी तसेच आयुर्वेदानुसार सुद्धा मानवाच्या शरीरप्रकृतीचे वात, पित्त आणि कफ असे 3 प्रकार सांगितले जातात.
आजही आपण आयुर्वेदाचाऱ्यांकडे गेलो तर ते आधी आपली नाडी तपासतात. म्हणजेच मनगटावर बोट ठेवून ठोक्यांवरून ते आपली नाडी बघतात. त्यावरून ते आपण पित्त, वात किंवा कफ या 3 प्रकारांपैकी कुठल्या प्रकृतीचे आहोत ते सांगतात. हीच नाडी आपल्या पत्रिकेत देखील दाखवलेली असते. ज्योतिष शास्त्र अभ्यासकांकडून पत्रिकेतील आपली नाडी बघितली आणि आयुर्वेदाचार्याकडूनही तपासली तर आपण अचंबित झाल्याशिवाय राहात नाही.
कारण ती अगदी तंतोतंत सारखीच असते. यावरून नाडी आणि आयुर्वेद यांच्यात एकवाक्यता आणि संबंध असल्याचं स्पष्ट होतं. दोघांच्याही पत्रिकेत एक समान नाडी असेल तर त्यांची शरीरप्रकृती एकच असते. एकाच प्रकारच्या शरीरप्रकृतीमुळे संतती काही दोष निर्माण होऊ शकतात. जन्माला येणारं बाळ हे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवतही असू शकतात.
विज्ञानाने देखील आता हे मान्य केलं आहे. तोच हा नाडी दोष. संततीत निर्माण होणाऱ्या दोषांमुळे एक नाडी विवाह करू नये असा सल्ला दिला जातो. दुसरा दुष्परिणाम म्हणजे पती-पत्नीला एकाच वेळी आरोग्याविषयी तक्रारी सुरू होण्याचा संभव असतो.
आपण बहुतेकदा आश्चर्य व्यक्त करतो की, एखाद्याला अचानक एवढा दुर्धर आजार कसा काय झाला? वैद्यक शास्त्र सुद्धा काही वेळेला त्याचे उत्तर देऊ शकत नाही. अशावेळी तो नाडी दोषाचा परिणाम असू शकतो असे सांगितले जाते. तिसरा परिणाम म्हणजे वैवाहिक आयुष्यातील आकर्षणही कमी होते. नाडी दोषाच्या या नियमांमध्ये एक अपवाद आहे.
एक नाडी असेल मात्र जन्मनक्षत्र बिन नसल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी होते. त्यावेळी इतर गोष्टी पत्रिकेतील जुळत असल्यास विवाह करण्यास हरकत नसते. आपली पुढील पिढी आरोग्यदायी आणि बुद्धिहीन संपन्न आणि सुदृढ असावी यासाठी नाडीदोष आल्यास विवाह टाळण्याचा सल्ला दिला जातो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.