नमस्कार मित्रांनो,
स्वामी प्रिय भक्तहो मुंबईत राहणाऱ्यांना किंवा मुंबईची ओळख असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहिती नाही असे होणारच नाही. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी कामांसाठी येणारे लोक प्रभादेवीच्या सिद्धिविनायक दर्शन वेळात वेळ काढुन घेतात. या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अ ध्या त्मि क पार्श्वभूमी आहे.
ब्रह्मांडनायक असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. मुंबईपासून इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा नेमका कोणता योग जुळून आला. नेमकी घटना आणि स्वामी समर्थांची लीला कोणती आहे ते आपण जाणून घेऊया. अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते.
एखादे लेकरू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते तिच्यावर प्रेम करते, तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवते. अगदी तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांबेकर महाराजांचे होते. असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्ण तुला काय हवे अशी विचारणा स्वामींनी केली. प्र त्य क्ष ब्रम्हांड आपल्या हातात गोटी समान धारण करणारे परब्रम्ह देण्यासाठी समोर असताना जांबेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही.
ते स्वामींना म्हणाले की, स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचं असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या. रामकृष्ण बुवांची इच्छा ऐकून स्वामींना फार आनंद झाला. आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील.
एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या हे कल्पना स्वामींना अतिशय आवडली. स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे भाग्य आहे. मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. तसे तसा तुझा सिद्धिविनायक वाढेल. ज्या दिवशी तो मंदार बहरेल त्यादिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल.
स्वामींनी अतिशय प्र स न्न मनाने शुभाशीर्वाद दिले. चौथ्या दिवशी रामकृष्ण बुवा प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले. स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना त्यांनी केली. हात जोडून म्हणाले हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो. या वैभवाच्या झगमगाटाने तुज्याकडे भक्त आ क र्षि त होवो.
त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो असे मागणे रामकृष्ण बुवांनी सिद्धिविनायकाकडे केले. स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले. त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसजसा बहरत गेला तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाले आणि त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची इच्छा पूर्ण केली. तर स्वामी भक्तहो मुंबईचा सिद्धिविनायक मंदार वृक्ष आणि स्वामी समर्थांची लीला या संदर्भातील ही कथा सांगितलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.