मुलीचे लग्न कोठे करावे? मुलगा कसा असावा?

नमस्कार मित्रांनो,

मुलीचे लग्न करणे हे आई वडिलांचे स्वप्न असते. मुलगी वयात आली की आई वडिलांचे छाती धडधडायला लागते. तिच्यासाठी स्थळांची पाहणी सुरू होते. तिला वेगवेगळ्या स्थळांचे मागणे यायला लागते. त्यातून मग तिच्यासाठी योग्य वर निवडण्याची जबाबदारी आई-वडिलांवर पडते. मग आपण त्यासाठी मुलाचा समाज बघतो. त्याचा धर्म बघतो, त्याचा व्यवसाय होतो, त्याचे आई वडील, नातेवाईक, फॅमिली बॅकग्राऊंड बघतो.

मुलगा किती कमावतो त्याचे वार्षिक पॅकेज काय आहे त्याचे घर कसे आहे इत्यादी सर्व गोष्टींची पाहणी करतो व त्यातून जे योग्य वाटेल व आपल्या मनाला पटेल अशा मुलासोबत आपण आपल्या मुलीचे लग्न लावून देतो. परंतु येथेच आपली चूक होते. आपल्या मुलीचे लग्न लावून देताना त्याचे आई वडील, नातेवाईक, घरदार पैसा अडका हे काहीही पाहू नका. फक्त एक गोष्ट पहा की, त्या मुलाचे मित्र कोणकोण आहेत.

त्याची संगत कशी आहे व कोणा बरोबर आहे. जसे वडील असतील तसाच मुलगा असू शकत नाही. आईप्रमाणेही मुलगा असणे शक्य नाही. त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड कितीही चांगला असेल परंतु तो मुलगा चांगलाच आहे याची काही गॅरंटी नाही. परंतु त्या मुलाचे मित्र कसे असतील, त्याची संगत ज्यांच्याबरोबर असेल तो मुलगा त्याप्रमाणेच असेल. म्हणून मुलीला देण्यापूर्वी त्या मुलाच्या मित्रांची व त्याच्या बॅकग्राऊंडची चौकशी करा.

तो मुलगा कोणाबरोबर येतो जातो, कोणाबरोबर जास्तीत जास्त काळ व्यतीत करतो, कुठे जातो, काय करतो हे आधी तपासा. कारण आजकाल मुले जे आई वडिलांना सांगत नाहीत ते मित्रांना सांगतात. आई वडिलांच्या चोरीने मुले खूप कामे करतात जे आई वडिलांना कायच माहित नसते. ते त्यांच्या मित्रांना माहीत असते. म्हणून कधीही मुलीचे लग्न करताना त्या मुलाच्या मित्रांची माहिती घ्यावी.

जर मुलगा चांगला असेल तर त्याचे मित्र सखे चांगलेच असतील. ते चांगल्या मुलांमध्ये उठत बसत असेल आणि जर मुलगा वाईट वळणाचा असेल तर त्याची संघातही त्याप्रमाणेच वाईट मुलांशी असेल. मुले आई वडिलांप्रमाणे कधीही असत नाही तर ते आपल्या मित्रांप्रमाणेच असतात. हे नेहमी लक्षात ठेवावे. मुलाना वळण वाईट संगतीमुळेच लागतात. कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही की, आपली मुले वाईट वळणाची असावीत. दारुड्या बापालाही वाटते की, आपल्या मुलाने दारू पिऊ नये.

जुगारी बापालाही वाटते की माझ्या मुलाने जुगार खेळू नये. आणि वैश्यालाही वाटते की, माझ्या मुलांनी या दलदलीतून बाहेर निघून मानसन्मानाने आपले जीवन व्यतीत करावे. कोणतेही आई वडील आपल्या मुलाला खोटे बोलायला शिकवत नाही. कोणतेही आईवडील आपल्या मुलांना चोरी करायला सांगत नाहीत. सर्वात आधी दारू पिणे, सिगारेट पिणे हे त्या मुलाचे मित्र करायला शिकतात. मित्रांमुळेच मनुष्य व्यसनी बनतो. कोणतीही व्यसनाची वस्तू सर्वात आधी मित्रांमुळे मुलांच्या हातात येते.

आज काल तर दारू पिणे, सिगरेट पिणे हे स्टेटस झाले आहे. जे यापासून अलिप्त राहतात त्यांना जुन्या काळातले जुन्या चालीरीतींचे मानले जाते. त्यांना पिछाडलेले मानले जाते. जी ही सर्व वाईट कामे करतात हे आधुनिक मॉडेल्स समजले जातात. म्हणून अशा वाईट मित्रांमध्ये राहण्यापेक्षा मित्र नसतील तरीही चालेल. तसेही आपले जीवन खूप चांगले जाईल.

परंतु अशा मित्रांची संगत करु नका जे आपले जीवन उध्वस्त करून टाकतात. आपल्याला दिनासाकडे नेतात. जीवनात संगतीचा खूप प्रभाव पडतो. एक पाण्याचा थेंब जो आकाशातून खाली येतो तो जर थेंब कडूलिंबाच्या झाडामध्ये गेला तर त्याची चव कडू होते. आणि जर उसामध्ये गेला तर त्याची चव गोड होते. तोच पाण्याचा थेंब केळीच्या झाडामध्ये गेला तर कपूर बनते.

व तोच पाण्याचा थेंब सापाच्या तोंडात गेला तर विष बनते. तोच पाण्याचा थेंब जर गटारीत गेला तर गटारीचे घाण पाणी होते. आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर मोती तयार होतो. पाणी तेच पण संगत वेगळी. बघा संगतीचा किती परिणाम होतो.

म्हणून जर आपल्या मुलीचे लग्न करायचे असेल तर त्या मुलाचे आई-वडील, नातेवाईक, पैसा पाणी, नोकरी-व्यवसाय हे काहीही पाहू नका. जर संगत चांगली असेल तर सर्व मिळवता येते फक्त त्या मुलांची संगत पहा व ज्या मुलाचे योग्य मित्र असतील त्याच मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून द्या आणि निश्चिंत व्हा कारण तेथे तुम्हाला इतर काहीही पाहण्याची आवश्यकता भासणार नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *