मृत व्यक्ती स्वप्नात येणे काय आहेत संकेत? जाणून घ्या 7 संकेत…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जवळची एखादी मृत व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसली तर आपण घाबरतो आणि या स्वप्नाचा काही अर्थ असेल ही व्यक्ती आपल्या स्वप्नात का आली असेल याचा विचार करत राहतो. स्वप्न शास्त्रामध्ये अशा विविध स्वप्नांचा आणि त्यामागील कारणांचा उल्लेख दिलेला आहे.

आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला तर ही गोष्ट आपल मन लवकर मान्य करत नाही. त्याच्या जाण्याने आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण कधीकधी अशा व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात आणि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात.

ते स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढील घटनांबद्दल ते काहीतरी सांगत असतात. पुढे येणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी शुभ आहेत की अशुभ हे देखील आपल्याला स्वप्नाद्वारे ते सांगत असतात. ते कोणते संकेत आहेत ते आज आपण जाणून घेऊयात.

मृत व्यक्ती आपल्याला स्वप्नात नग्न अवस्थेत दिसली किंवा तिच्या पायात चपल नसतील किंवा ते भुकेल्या आहेत अस आपल्याला स्वप्नात दिसलं तर आपण समजून घ्यायला हवं की, ती आपल्याकडे कोणत्यातरी वस्तूंची मागणी करत आहेत.

म्हणूनच असे स्वप्न तुम्हाला कधी पडलं तर त्या स्वप्नानुसार ती वस्तू तुम्ही एखाद्या ब्राह्मण देवतांना दान करावी किंवा एखाद्या गरजवंताला ती वस्तू दान करावी. नाही तर मग एखाद्या मंदिरात जरी अशा वस्तू तुम्ही दान केल्या तरीही चालेल.

दान करताना मनोमन आपण अशी इच्छा व्यक्त करा की, मी हे दान करत आहे ते माझ्या मृत पूर्वजनपर्यंत नातेवाईकांपर्यंत जावं आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. गंभीर आजाराने आपला एखादा नातेवाईक हे मरण पावले असतील आणि ते जर आपल्याला स्वप्नात अगदी तंदुरुस्त हस्ते खेळते दिसले तर या स्वप्नाचा अर्थ समजून घ्यायचा की, जाणारा व्यक्ती हा सुखरूप आहे.

आणि त्याचा पुनर्जन्म खूप ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना आपल्याला सांगायचं असत की, माझ्याबद्दल जास्त विचार करून दुखी होऊ नका. स्वप्न शास्त्रात अशा स्वप्नांना आश्वासित स्वप्न असं नाव दिलेला आहे. याउलट एखाद्या स्वस्त व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि तो आपल्याला स्वप्नात खूपच आजारी आहे,

आजारी पडलेला दिसत असेल तर अशी स्वप्न आपल्याला संकेत देतात की मृत व्यक्तीची काहीतरी इच्छा अपुर्ण राहिलेली आहे. जे तो आपल्याला सांगत आहे. त्यावेळी अशा स्वप्नांचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा. मरणाच्या अगोदर अशा व्यक्तींच्या काही प्रबळ इच्छा स्वप्न अपूर्ण राहिलेले आहेत का हे आपण शोधून काढायला हवं.

तुम्हाला जर अशा त्यांच्या अपूर्ण इच्छाबद्दल माहिती असेल तर तुम्ही त्या त्वरित पूर्ण करायला हव्यात. याने त्या मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते. याने आपल्या घरालाही सुख शांती मिळते. एखाद्या जिवंत व्यक्तीचा स्वप्नात जर आपला मृत्यू दिसला तर अशा व्यक्तीचा आयुष्य हे खूप जास्त असतं.

असं स्वप्न दीर्घायुष्यच सुचक मानलं गेलं पाहिजे. स्वप्नात कधीकधी आपले पूर्वज येतात. पण ते जर आपल्याशी बोलत नसतील, उदास असतील तर त्या स्वप्नाचा अर्थ होतो आपल्या हातून असं काही कार्य घडणार आहे जे त्यांना पसंत नाही. अशावेळी ते कार्य आपण करू नये असे त्यांना वाटते.

पण जर स्वप्नात येऊन त्यांनी आपल्याला हसत मुखाने आ शी र्वा द दिला तर, आपण जे कार्य हाती घेतलेला आहे त्यापासून ते आनंदित आहेत आणि त्या कार्यात आपल्याला 100℅ यश मिळणार असं समजावं.

एखादा स्वर्गवासी व्यक्ती आपल्याला स्वप्नात खूप उंच आणि आपल्यापासून फार दूर गेलेला दिसत असेल तर अशा स्वप्नाचा अर्थ होतो की, त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती झालेली आहे. तोच स्वर्गवासी व्यक्ती आपल्याला घरात दिसत असेल, घराच्या आसपास वावरताना दिसत असेल तर समजून घ्या की, तो व्यक्ती अजूनही घराच्या मोहापासून सुटलेला नाही.

अजूनही आपल्या परिवाराला तो आपल्या छत्रछायेखाली ठेवू इच्छित आहे. अशा प्रकारचा स्वप्न जर तुम्हाला पडलं तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पित्र शांती करायला हवी. पितरांच्या तृप्ती निमित्त गाईंना ब्राह्मणांना गरजूंना वस्तूंचे किंवा अन्नाचं दान करायला हवं. याने आपल्या पितरांची शांती होते.

अशाप्रकारे विविध स्वप्नांचा अर्थ समजावून घेऊन त्याप्रमाणे आपण कार्य करायला हवं. अशा स्वप्नांना घाबरून न जाता या संकेतांचा योग्य अर्थ आपण समजून घ्यायला हवा. स्वप्नात आपले पूर्वज वारंवार येत असतील तर त्यांची मुक्ती झालेली नाही हे समजून घ्या.

त्यांच्या मुक्तीसाठी भगवत गीतेतील अठरा अध्यायातील कोणत्याही एका अध्यायचे रोज वाचन करायला हवं किंवा श्रीमद्भागवत कथेचा पाठ करायला हवा. ज्याने त्यांना मोक्ष मिळेल आणि तुमच्या परिवारालाही सुख आणि शांती लाभेल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *