मला रोज मध्यरात्री घराच्या बाहेरून पैंजनाचा आवाज येत होता.

नमस्कार मित्रांनो,

स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींच्या अनुभवांना खूप खूप जास्त प्रेम देत आहात आणि असंच इथून पुढे देत राहाल असा माझा विश्वास आहे. आज आपल्या अनुभवांना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात पाहिले जात आहे. भारताबाहेर देखील युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथे राहणारे आपले मराठी लोक आपले अनुभव पाहता आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला वर्षा ताईंचा अनुभव सांगणार आहे.

वर्षा ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दात आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना मानाचा मुजरा आणि प्रदिप दादा यांना कोटी कोटी प्रणाम. मी वर्षा नाशिक येथून आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याचे प्रचिती मला चार-पाच दिवसात आली. मला माझा अनुभव तुम्हा सर्व स्वामी भक्तांना सांगायचा आहे. माझ्या मोठ्या मुलीला तीन-चार महिने झाले घराच्या बाहेर पैंजणांचा आवाज येत होता. मला जेव्हा माझ्या मोठ्या मुलीने सांगितले तेव्हा काही खरे वाटले नाही.

पण एक दिवस मला स्वतःला साडेअकराच्या दरम्यान तो पैंजणांचा आवाज रोज ऐकू येऊ लागला. मला स्वतःला जेव्हा हा अनुभव आला तेव्हा मला यावर विश्वास बसला. त्यानंतर हे रोजचंच झालं माझ्या मोठ्या मुलीला आणि मला रोजच्या रोज पैंजणांचा आवाज ऐकू येत होता. आम्ही खूप घाबरलो होतो पण मनात स्वामींचे नामस्मरण चालूच असायचं. शेवटी साडे अकरा तीनच्या दरम्यान मी प्रदीप दादांना फोन लावत होते. पण दादांचा फोन बंद येत होता.

मला एका स्वामी सेवेकरी ताईंचा नंबर मिळाला. मी त्यांना फोन केला. माझे सगळे प्रॉब्लेम मी त्यांना सांगितले. त्यांनी मठातल्या एका काकांना फोन लावला. काकांनी दोन सेवा सांगितल्या होत्या. एक सेवा माझी पूर्ण झाली. दुसरी सेवा करायच्या अगोदरच माझ्या दुसऱ्या मुलीच्या पोटात अचानक दुखायला लागले. काकांनी दिलेली सेवा पूर्णपणे माझ्याकडून झालीच नाही. माझ्या मुलीच्या पोटात इतक्या दुखायला लागले की, तिला तिच्या वेदना असह्य झाल्या होत्या.

जेव्हा पोटात खूप दुखायला लागले तेव्हा प्रदीप दादांना मी फोन केला आणि दादांचा फोन लागला. दादा आणि माझं फोनवर बोलणं झालं. दादांनी मला सेवा दिली मी अगदी मनापासून ती सेवा चालू केली. पाच ते सात मिनिटात माझी मुलगी झोपून गेली. परत साडेपाचच्या दरम्यान ती उठली आणि घाबरून रडायला लागली. मी पुन्हा एकदा प्रदीप दादांनी दिलेली सेवा चालू केली ती सेवा चालू केल्यावर माझ्या मुलीच्या पोटात दुखायचे थांबले आणि ती झोपून गेली.

मी तरी देखील दुसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तिच्या रिपोर्टमध्ये असे सांगितले की, तिला 1 किडनी नाही आहे आणि तिच्या पोटात गाठ आहे. आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. त्या क्षणाला काय करावं हेच मला समजत नव्हतं आणि मुलींना घेऊन घरी आले. तेव्हा साडेपाचच्या दरम्यान पुन्हा तिच्या पोटात दुखू लागलं. तेव्हा एका ताईंनी दादांना आणि मला कॉन्फरन्स कॉल वर घेतले.

तेव्हा दादा म्हणाले माझ्या भाचीला काही होणार नाही. प्रदिप दादा माझ्या दोन नंबरच्या मुलीशी बोलले. दादा तिच्याशी बोलत होते तेव्हाच 90% तिच्या पोटात दुखायचं राहिलं होतं. दादांनी शब्द दिला होता माझ्या भाच्याला काही होणार नाही आणि तसंच झालं. माझ्या मुलीला एक रुपयाची देखील गोळी लागली नाही आणि स्वतः प्रदिप दादा येऊन माझ्या मुलीला भेटून गेले. स्वामींच्या आणि प्रदीप दादांच्या आशीर्वादाने सर्वकाही व्यवस्थित झालं.

काकांनी दिलेली सेवा मी पूर्णपणे मनापासून केली आणि माझ्या घराच्या बाहेर यायचा आवाज अगदी शंभर टक्के बंद झाला आहे. आता आम्हाला कोणताही त्रास होत नाही आहे. माझी मुलगी पूर्णपणे बरी झाली आहे. दादा तुमचा असाच आशीर्वाद आपल्या बहिणीवर व भाचिंवर असू द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रदीप दादांना आणि त्या काकांना माझा कोटी कोटी धन्यवाद. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे दादामुळे आणि स्वामींमुळे मला समजले.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *