मेमरी इतकी शार्प होईल की, एकदा वाचताच सर्व लक्षात राहील.

नमस्कार मित्रांनो,

आज कालच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सर्वांनाच वाटते की, आपण अत्यंत हुशार असावे. सर्वच बाबतीत आपण निपुण असावेत. कुठल्याही क्षेत्रात आपण कमी पडू नये. परंतु कितीही प्रयत्न केले तरी देखील लक्षात न राहणे, टेन्शन येणे आणि यामुळे चिडचिड वाढत जाणे यासारख्या समस्या होत असतात.

बऱ्याच विद्यार्थ्यांचे तर असे होते की, कितीही अभ्यास केला तरी देखील लवकर लक्षात येत नाही आणि जर लक्षात जरी आले तरी देखील वेळ प्रसंगी आपण हे विसरून जातो. तर असे होऊ नये आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची मेमरी शार्प व्हावी, एका वेळेस वाचले तरी देखील लक्षात राहावे यासाठी अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज आपण पाहणार आहोत.

हा उपाय लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आपण करू शकतो. यामुळे लहान मुलांचे देखील मेमरी शार्प होते. तर मोठ्या व्यक्तींना देखील वाढत्या वयानुसार या समस्या होत असतात. तर मोठ्या व्यक्तींचे देखील मेमरी यापासून शार्प होण्यास मदत होते.

यासाठी सर्वप्रथम एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि हे एका पात्रात टाका. मी येथे कलोंजीच्या बिया घेतलेल्या आहेत. कलोंजीच्या बियांमध्ये कॅल्शियम विटामिन ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात आणि कलोंजीच्या बिया आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात अगदी सहजतेने मिळून जातात.

या कलोंजीच्या बिया या पाण्यामध्ये टाका. पाव चमचा भरुन या कलोंजीच्या बिया पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे आहे आणि हे उकळून घेत असताना मंद आचेवरच उकळून घ्यायचे आहे. अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे उकळून घ्यायचे आहे आणि उकळून घेतल्यानंतर गाळणीच्या मदतीने किंवा वस्त्राच्या साहाय्याने गाळून घ्या.

हे उकळून घेतलेल जे पाणी आहे ते कोमट होईपर्यंत ठेवायचे आहे. कोमट झाल्यानंतर या अर्धा ग्लास झालेल्या पाण्यामध्ये एक चमचा मध टाकायचे आहे आणि मध टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. पाणी गरम असताना मध मिक्स करू नये.

हे तयार झालेले पेय ज्या व्यक्तींना मेमरी शार्प करायची आहे किंवा स्मरणशक्ती वाढवायची आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून कधीही एक वेळेस याप्रमाणे हे पेय तयार करून संपूर्ण एका वेळेस पिऊन घ्यायचे आहे. तुम्ही सकाळी जर अनुशापोटी हे पेय घेतला तर जास्त चांगले परिणाम दिसून येईल.

परंतु जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर दिवसभरातून एक वेळेस तरी हा उपाय करा. हा उपाय कमीत कमी 3 महिने तरी करा. तुम्हाला 15 दिवसात फरक जाणवायला लागेल की, आपला जो विसराळूपणा आहे तो कमी झालेला आहे. आपली मेमरी शार्प होण्यास मदत होत आहे.

3 महिने जर कंटिन्यू तुम्ही हा उपाय करत गेलात तर यामुळे मेमरी अगदी सहजतेने शार्प होण्यास मदत होते आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे.

आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पेय अर्धा कप भरून द्यायचे आहे. म्हणजे वर सांगितलेल्याप्रमाणे हे पेय एका व्यक्तींसाठी तयार करून घ्यायचे आहे आणि हे जास्त प्रमाणात सुद्धा करून ठेवायचे नाही. ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्या वेळेस तयार करून मगच याचा वापर करा.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *