माझ्या वडिलांनी स्वामींच्या समोरचा नैवेद्य खाल्ला आणि…एक भावस्पर्शी अनुभव

नमस्कार मित्रांनो,

त्या ताई सांगतात न म स्का र मित्रांनो मी अपर्णा. स्वामी नेहमी माझ्या पाठीशी उभे आहेत. याचा एक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी खूप वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहे. स्वामींनी मला कधी काही कमी पडू दिले नाही. स्वामींच्या चरणापाशी मला नेहमी शांतता आणि सुख मिळते.

घरात कितीही ताण असू द्या स्वामींच्या नामाचा जप केला की, मला अतिशय प्र स न्न वाटायला लागते. स्वामींच्या आशीर्वादाने मला काहीही कधी कमी पडलेले नाही. पण म्हणतात ना आयुष्य हे अनेक गोष्टी घेऊन येते. आपण ज्या गोष्टीची कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा गोष्टी आपल्या आयुष्यात होतात.

संकटांशी सामना करणे हेच तर आयुष्य नाही का? आणि कधी संकटे इतकी आपल्या कल्पनेच्या बाहेर असतात की, आपण निराशीत जातो. अशा वेळी आपण काही करू शकत नाही. यावेळी स्वामी आपल्याला साथ देतात. आपल्या मागे उभे राहतात. त्यांचा आवाज सतत कानात येतो ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’.

आणि मग सगळे छान होयला सुरुवात होते. माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्यात जर कोणी हिरो असेल तर माझे वडील. पण एके दिवशी अकस्मात माझ्या वडिलांना हृदयाचा त्रास सुरू झाला. सकाळी आमच्या घरी स्वामींसाठी नैवेद्य केलेला होता. मी आणि आईने स्वामींपुढे मांडलेले म्हणजे स्वामींचे उष्ठे ताठ वडिलांना दिले.

वडील वीस पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या आपल्या कामाच्या ठिकाणी गेले. वडील नेहमी गाडीवर कामाला जातात. वडील आपल्या कामावरून घरी यायला निघाले. काही अंतरावर आले असते तर त्यांच्या छातीमध्ये खूप जास्त दुखायला लागले. तरी देखील ते सतरा अठरा किलोमीटर तश्या परिस्थितीमध्ये गाडी चालवत घरी आले.

घरी आल्यावर ज्यांनी जे होतय ते आम्हाला सांगितले. ते अक्षरशः कळवळत होते. आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही शेजाराच्या साहाय्याने वडिलांना ताबडतोब दवाखान्यात हलवलं. डॉक्टरांनी सांगितले की, वडिलांना अटॅक आलेला होता. दवाखान्यात नेल्यानंतर त्यांची तबेत सुधारायला लागली. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले.

दुसऱ्या दिवशी वडील आमच्यासोबत बोलत होते. वडील म्हणाले स्वामींचा प्रसाद खाल्यामुळेच मी आज जिंवत आहे. नाही तर कल्पनाच करवत नाही आहे. अनेक बातम्या, अनेक लोकांकडून ऐकले आहे की, इव्हन डॉक्टर देखील म्हणाले यावेळी वेळेवर उपचार होयला हवेत. अशा वेळी आपण शांत बसायला हवे.

गाडी तर चालवणे अगदी जीव घेणे असते. पण वडील इतके लांब गाडी चालवत आले. घरी येऊन काय होतंय ते सांगितले आणि मग दवाखान्यात आम्ही गेलो. या वेळी दुसऱ्या एखाद्याचे वाचणे खरचं अशक्य होते. पण अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरचं माझ्या स्वामींच्या प्रसादानेच माझ्या वडिलांचे प्राण वाचवले.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *