मातीच्या माठातून पाणी पिण्याचे 7 फायदे

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला माहित आहे का ? माठातील पाणी प्यायल्याने उष्माघातापासून संरक्षण होते. माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्या पूर्वजांना त्याचे महत्त्व ठाऊक होते.

तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती देखील त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ बनवायला सुरवात केली. त्यामुळे मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचे हे सगळ्यांच्या अंगवळणी पडले आणि ती आपली परंपरा बनली.

परंतु, आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे का ? त्याचे काही फायदे आहेत का ? जाणून घेऊया मातीच्या माठातून पाणी पिण्याचे त्यांनी सांगितलेले फायदे.

1) नैसर्गिक थंडावा – लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो.

अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.

2) मातीचे गुणधर्म – माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात, परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

3) माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन – शरीरातील अँसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील.

माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते, असे डॉ. भगवती सांगतात.

4) कोणतेही हानिकारक केमिकल्स नाहीत – अधिकतर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात.

म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.

5) मेटॅबॉलिझम सुधारते – मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

6) उष्माघाताला आळा बसतो – उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.

7) घशासाठी चांगले असते – सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते.

योग्य मातीचे मडके (माठ) कसे निवडावे ? घरासाठी मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *