नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ आज आपण स्त्रियांची मासिक पाळी या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मासिक पाळी आल्यावर स्त्रियांनी सेवा किंवा पूजा करावी की करु नये असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतो. पूर्वीपासूनची असलेली प्रथा आहे की, स्त्रियांनी मासिक पाळीत सेवा करू नयेत ते अपशकुनी असते.
त्याने देवाचा कोप होईल. देवाच्या जवळ जायच नाही ते चांगल नसत. अशा जुन्या लोकांच्या धारणा आहेत. बऱ्याच स्त्रिया या सगळ्या गोष्टी पाळत नाहीत. काही स्त्रिया या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. तसे पाहिले गेले तर परमेश्वराने आपल्या सगळ्यांना बनवलं आहे.
म्हणजे स्त्रियांना सुद्धा परमेश्वरानेच बनवलं आहे. मासिक पाळी म्हणजे काय? तर स्त्रियांच्या लैंगिक भागातून होणारा रक्तस्त्राव त्यामागचे लॉजिक असे आहे की, ते एक प्रकारचे अशुद्ध पाणी आहे ते सतत स्त्रियांच्या शरीरातून पाच दिवस सतत निघत असते.
तर या काळात स्त्रियांनी पूजा करावी की नाही? प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर नाही. बरेचसे स्वामी भक्त स्त्रीया या मासिक पाळीच्या दरम्यान मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जात नाहीत आणि ते योग्य आहे. मी का नाही म्हणालो याच कारण तुम्हाला सांगतो. ते पाच दिवस स्त्रियांच्या शरीरात अशुद्ध रक्तस्त्राव सतत सुरू असतो.
स्त्रियांच्या शरीराला रक्तस्त्राव सतत लागू नसतो. त्यामुळे देवाजवळ किंवा देवाऱ्याजवळ जायचं नाही. आपण रोज सकाळी आंघोळ करूनच देवाजवळ पूजा करायला जातो. की न आंघोळ करता तसेच सेवेला बसतो नाही ना. तसेच काही हे पण आहे. आपल्या घरात मासिक पाळी आल्यावर त्या स्त्रीच्या सानिध्यात बरेच लोक येतात जसे की त्याचे कुटूंबीय.
त्या पाच दिवसात त्या स्त्रीचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्पर्श होत असतो. त्यामुळे शक्यतो अशा कालावधीत कुटूंबियांनी सेवा व पूजा सकाळीच करावी सायंकाळी करू नये. मासिक पाळी आलेल्या स्त्रीने जप माळ, गुरुचरित्र यासारख्या पवित्र गोष्टीना हात लावू नये.
हे पाच दिवस नित्य सेवा करणे स्त्रियांनी टाळावे. पण नामस्मरण नक्की करू शकता कारण नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही. त्यामुळे हे पाच दिवस फक्त नामस्मरण करायचे. घरात जर स्वामींना रोज नैवेद्य दाखवत असाल तर शक्यतो त्या स्त्रीने बनवलेला तो नैवेद्य नसावा. बऱ्याच स्त्रिया तिसऱ्या दिवशी आंघोळ करून देवघरात जातात तर असे करू नये.
स्त्रियांनी पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून मग स्वतः देवाला आंघोळ घालावी व नित्य सेवा करावी. अन्तः मला एवढेच सांगायचे आहे या काळात स्त्रियांनी देवाजवळ जाऊ नये. याबद्दल बरेच लोकांचे गैरसमज आहेत. लोकांना असे वाटते की, ही अंधश्रद्धा आहे. जसे की मी सांगितले देव हा पवित्र आत्मा आहे.
देवघर स्वच्छ असावे आणि अशा काळात त्या रक्तस्त्रावाचा कुठेही स्पर्श होऊ नये म्हणून हे नियम पाळले जातात. बऱ्याच महिला स्वामी भक्तांकडून न कळत या काळात चुका होतात. आणि मग स्वामी त्यांना शिक्षेच्या स्वरूपात अनुभव देतात. जे स्वामींची मनापासून सेवा करतात आणि ते सेवेकरी आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींच्या फोटोशी बोलतात.
आपल्याकडून चूक घडली आणि स्वामींच्या फोटोतील हवभावातून लगेच कळते की, स्वामी आपल्यावर रागावले आहेत की खुश आहेत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.