नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार सुरू होत आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारच फार मोठ महात्म्य हिंदू धर्मशास्त्रात विष्णू पुराणात वर्णिलेले आहे. यावर्षीच्या मार्गशीर्षमध्ये 4 गुरुवार आपल्याला लाभत आहेत. त्यापैकी 3 किंवा 4 गुरुवार हा उपाय आपण आवर्जून करा. या उपायाने मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोरथ मनोकामना असतील त्या मनोकामनाची पूर्तता नक्की होते.
भगवान श्रीहरी श्रीविष्णू की, जे या जगाचे पालनहार आहेत. जे संपूर्ण सृष्टीचे संचालन करतात, संपूर्ण सृष्टी त्यांच्यावर अवलंबून आहे त्यांच्या पुढे आपण आपल्या इच्छेचा आपल्या मागणीचा गाऱ्हाणं हे नक्की मांडा. मित्रांनो हा उपाय नक्की कसा करावा आपण जाणून घेऊया. हा उपाय करण्यापूर्वी आपण पित म्हणजेच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावीत शक्य असेल तर,
या दिवशी आपण भगवान श्रीविष्णूंची पूजा करायचे आहे. होय भगवान श्रीहरी श्रीविष्णू किंवा त्याचं कोणतेही रूप भगवान श्रीकृष्ण असतील, प्रभू रामचंद्र असतील त्यांची पूजा आपण करायची आहे. ज्याप्रकारे आपण दररोज देवपूजा करतो अगदी त्याचप्रकारे ही पूजा आपण करायची आहे. सकाळी करू शकता रात्रीही करू शकता.
ही पूजा करत असताना आपल्याला 21, 51 किंवा 108 हळकुंड घ्यायचे आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे कुवतीप्रमाणे 21, 51 घ्या किंवा 108 घ्या आणि हे हळकुंड घेतल्यानंतर आपण एका वाटीमध्ये हळदीचा घोळ बनवायचा आहे. म्हणजेच पाण्यामध्ये हळद टाकून व्यवस्थित ते मिक्स करायचे आहेत आणि याच हळदीने प्रत्येक हळकुंडावर एक मंत्र लिहायचा आहे.
मंत्र कोणता आहे? मंत्र आहे ओम भ्रम बृहस्पतेय नमः ओम भ्रम बृहस्पतेय नमः एकदा लिहायचं आहे आणि हा मंत्र लिहिण्यापूर्वी स्वतःची इच्छा अगदी थोडक्यात लिहायची आहे. अगदी थोडक्यात एक तीन ते चार शब्दात आपली इच्छा जर मूलबाळ नसेल तर मूलबाळ होऊ देत बस इतकीच इच्छा. पैसा नसेल तर पैसा येऊ देत.
ठीक आहे तर ही तुमची इच्छा केवळ थोडक्यात लिहायची आहे.
आणि ओम भ्रम बृहस्पतेय नमः हा मंत्र लिहायचं आहे मंत्राच्या दोन्ही बाजूला अर्थातच दोन दोन उभ्या रेषा आपण मारायच्या आहेत. मित्रांनो आपण आत्तापर्यंत इच्छापूर्तीचे जितके उपाय पाहिले त्या उपायांपेक्षा हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे टोटका आहे. अशा प्रकारे हे लिहल्यानंतर आपण एक पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच दोरा घ्यायचा आहे.
शक्यतो कच्च्या सूतापासून बनलेला जो धागा असतो हा धागा आपण घ्यावा. नसेल तर कोणताही दोरा चालतो. जर पिवळा धागा नसेल तर सफेद धागा पिवळ्या रंगामध्ये मग हळदीच थोडसं पाणी करा त्यामध्ये तो बुडवा आणि तो सुकला की, हा आपला पिवळा धागा तयार होईल. तर या हा पिवळा धागा आपण घेऊन त्या धाग्याच्या मदतीने या हळकुंडाची माळा आपण बनवायची आहे.
एक माळ बनवायची आणि ही माळ आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करायची आहे. तर प्रतिमा फोटो असेल, मूर्ती आहे तर त्या मूर्तीला आपण ही माळ घालायची आहे. मित्रांनो हे सर्व करत असताना ओम भ्रम बृहस्पतेय नमः ओम भ्रम बृहस्पतेय नमः अगदी सातत्याने या मंत्राचा आपण जप करा. हे सर्व करत असताना आणि ही हळदीची माळ आपण भगवान श्रीहरी श्रीविष्णूंना किंवा भगवान श्रीकृष्णांना, प्रभू रामचंद्रांना अर्पण करायचे आहे घालायचे आहे.
आणि जे पूजन करतो तुम्हाला माहितीये की, भगवान श्रीहरी श्रीविष्णूंना आपण तुळशीची 2 पान आपण नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी अर्पण करत असतो. जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी यादिवशी भगवान श्रीहरी श्रीविष्णूंना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी अवश्य करा.
तुपाचा अगर तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायचे आहे आणि आपल्याकडे जप माळ असेल तर ओम भ्रम बृहस्पतेय नमः या मंत्राचा सातत्याने जप करत राहा. मित्रांनो आपली इच्छा भगवंतांपुढे नक्की बोला आणि अनेकजण फक्त पूजा करतात मात्र इच्छा बोलून दाखवत नाहीत. भगवंतांना सर्व काही समजत तरीसुद्धा त्यांच्यापुढे आपली इच्छा व्यक्त करायला हरकत नाही.
ही इच्छा बोलून दाखवा. मित्रांनो 3 गुरुवार किंवा 4 गुरुवार मात्र सलग करा. मध्ये गॅप नको 3 किंवा 4 गुरुवार जर आपण हा उपाय केला तर कुंडलीतील गुरु मजबूर बनतो, योग्य निर्णय घेतले जातात, जर तुम्हाला मार्ग सापडत नाही अडचणीमध्ये संकटांमध्ये तो मार्ग आपल्याला मिळून जाईल सर्व प्रकारचे इच्छापूर्तीचा हा उपाय आहे नक्की करून पहा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.