नमस्कार मित्रांनो,
मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. एक दोन गुरुवार सुध्दा झालेले आहेत. विवाहित महिलांचे उपवास गुरुवारच्या दिवशी असतील, पूजापाठ करत असतील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतील त्यासोबतच जर मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिलांनी हे 1 काम केले तर,
त्यांना सौभाग्याची प्राप्त होईल त्यांचा संसार सुखी होईल आणि महालक्ष्मी त्यांच्या इच्छा पूर्ण करेल. घरात सुख समृद्धी आणेल. मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की, मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.
परंतु त्यासोबतच कोणता तरी एक गुरुवार निवडून ज्या गुरुवारी आपल्याला वेळ असेल मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपण हे काम करावे. हे काम म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम. आता बऱ्याच महिलांना याबद्दल माहिती असेल की, हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो.
विवाहित महिलांना घरी बोलावले जाते. त्यांना हळदी-कुंकू केला जातो. गोड-धोड त्यांना खाऊ घातले जाते. काहीतरी सप्रेम भेट दिली जाते हे सगळ्यांना माहीत असेल. पण बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की, जर आम्हाला महिलांना बोलवणे शक्य नसेल किंवा आम्ही जास्त महिलांना बोलू शकत नसू काहीतरी कारण असेल.
तर अशा वेळेस मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी शेवटच्या असेल दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या गुरुवारी शेवटचा असेल तर काही हरकत नाही. त्या गुरुवारी तुम्ही एका स्त्रीला बोलवा किंवा तुमच्या घरातच एखादी विवाहित स्त्री असेल तर तुम्ही त्या स्त्रीचे सुद्धा हळदी कुंकू करू शकता.
तर त्या स्त्रीचे हळदी कुंकू केल्यानंतर तुम्ही त्यांना काहीतरी गोड धोड खाऊ घाला. खीर केलेले असेल मिठाई असेल, काही तरी त्यांचा आ शी र्वा द घ्या त्यांना नमस्कार करा. काही तरी सप्रेम भेट द्या कोणतीही वस्तू दिली तरी काय हरकत नाही. तुम्ही लक्ष्मी मातेची पोती देऊ शकता.
काही तरी फळ देऊ शकता, काही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सप्रेम भेट म्हणून देऊ शकता. फक्त मुख्य गोष्ट असते ती म्हणजे घरी बोलावून हळदी कुंकू करणं. हे घरातल्या महिलांचे केले तरी चालते किंवा बाहेरून एखादी महिला बोलावून केला तरी चालते.
तर मित्रांनो विवाहित महिलांना जास्त महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू करणं शक्य नसेल किंवा ते करू शकत नसेल तर किमान 1 महिलेला घरी बोलवून त्यांचे हळदी कुंकूचा कार्यक्रम कोणत्याही गुरुवारी किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी नक्की करावे.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.