नमस्कार मित्रांनो,
आपण खूप वेळा मो टि वे श न ल म्हणजे प्रेरक होण्यासाठी व्हिडिओ पाहतो, वाचतो ते मो टि वे श न हे फक्त त्या वेळेपुरतच असत. उजव्या कानातून डाव्या कानाबाहेर केव्हा निघून जात ते आपल्याला कळत पण नाही. पण आयुष्यात खूप वेळा आपण अशा काही ओळी ऐकतो ज्या आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात आणि आज मी तुमच्यासाठी अशाच काही ओळी, सुविचार घेऊन आलोय.
कदाचित तुम्ही खूप वेळा ऐकले असतील या ओळी. पण जर यातील एकही ओळ तुमच्या मनाला स्पर्श करून गेली तर तुमचा आयुष्य नक्कीच बदलून जाईल. म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर मग सुरू करूया. पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात, कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात. घरातून बाहेर जाताना मित्रा हुशार बनून जा कारण एक बाजार आहे.
परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे. कुणाच्या नशिबाला हसू नये कारण नशीब कुणी विकत घेत नाही. वेळेचे भान ठेवावे वाईट वेळ सांगून येत नाही. बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशीबाशिवाय जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिमान होता तरी तो राजा होऊ शकला नाही. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
जेवणात जर कोणी विष कालवले तर त्याच्यावर उपचार आहे. परंतु मनामध्ये जर कोणी भरवले ना तर त्यावर कोणते उपचार नाही. कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका की, लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करून घेतली. आयुष्यात स्वतःला कधीच उध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत.
समाधान ही अंत:करणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली ना तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल. 1) हसण्यामागील दुःख 2) रागवण्यामागील प्रेम 3) शांत रहाण्यामागील कारण. कपडेच नाही मित्रा माणसाचे विचार सुद्धा ब्रँडेड असले पाहिजे. चुकीच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा एकट उभं राहणं केव्हाही चांगलं.
संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्यावेळासाठी असतं उपकार आयुष्यभर राहतात. ज्या घावातून रक्त निघत नाही ना समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे. छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत राहा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्नात स्वतः संपून जाल त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या.
मित्रा जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं. आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यपोटी. क्षेत्र कोणतेही असु द्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले ना की, यशालाही पर्याय नाही. केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे, लोकांचं काय लोक चुका तर देवात पण काढतात.
सुखासाठी कोणाकडेही हात नका, वेळ वाया जाईल. ही दुनिया मतलबी झाली आहे, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्की येईल. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात ना तेव्हा समजून घ्यावं तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात. मित्रांनो विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कार्य करू लागला की, विरोधक आपोआप तयार होतात.
कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते. एक मात्र नक्की खरं आहे की, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसच जास्त आडवी येतात. एक सत्य ऐकवितो नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की, हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. आणि आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल, आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल ना मग तर स्वतःवर विश्वास ठेवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.