नमस्कार मित्रांनो,
सर्वांनाच वाटते की, आपल्याकडे भरपूर पैसा असावा. भरपूर धन असावे पण काहींच्या बाबतीत ते खरे होते, तर काही व्यक्ती कितीही मेहनत घेतली, कितीही कष्ट केले तरीही त्यांची परिस्थिती बदलत नाही. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो व आपली आर्थिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. त्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे मनी प्लांट किंवा लक्ष्मी वेल.
या झाडाचे नावच मनी प्लांट म्हणजे पैशाचे रोप कसे आहे व आपण याला लक्ष्मी वेल म्हणजे लक्ष्मी प्रदान करणारे रोप म्हणतो. मनी प्लांट घरी आणून आपण आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो. त्याप्रमाणे आपण मनी प्लांट घरी आणतोही. परंतु ते कशाप्रकारे ठेवावे कोठे ठेवावे हे आपल्याला माहीत नसल्याने त्याचे पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही.
मग आपण म्हणतो की, आपलं लकच खराब आहे. योग्य प्रकारे व योग्य ठिकाणी मनी प्लांट लावून आपल्या घरात सुख व समृद्धी बरोबरच धनाचाही वर्षाव करता येईल. मनी प्लांटचे रूप दिसायलाही आकर्षक व सुंदर असल्याने त्याने त्याचा घरात सजावटीसाठीही वापर केला जातो. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीही हे रोप घरातच लावले जाते. चला तर पाहूयात मनी प्लांटशी संबंधित या 5 गोष्टी.
घरासाठी मनी प्लांट आणताना ते कधीही खरेदी करून आणू नये. त्याबरोबरच कोणाला सांगून अथवा विचारूनही आणू नये. मनी प्लांटचे रोप जेथे असेल तेथुन गुपचूपपणे एक फांदी तोडून कोणालाही न सांगता घरी आणावी. परंतु ही फांदी तोडताना आपण ज्यांच्या घरातून ही फांदी आणत आहोत ते धनवान, श्रीमंत व समृद्ध असावेत. त्यांच्या घरामध्ये नित्यनियमित देवांची पूजाअर्चा होत असावे.
अशा घरातूनच ही फांदी तोडावी म्हणजे त्या फांदीपासून आपल्यालाही तीच ऊर्जा मिळेल. या गुपचूपपणे चोरून आणलेल्या मनी प्लांटमुळे तुमच्या घरात धन व सुख समृद्धी येईल. मनी प्लांट घरात लावल्यानंतर जर त्याचे एखादे पान सुटले, पिवळे पडले, खराब झाले तर ते लगेचच काढून टाकावे. ते तसेच राहू देऊ नये.
मनी प्लांट घरात आणताना गोल व छोट्या छोट्या पानांचे बघून आणावे. खूप मोठ्या पानांच्या मनी प्लांटमुळे कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही. कुंडीमध्ये मनी प्लांट असेल किंवा बाटलीमध्ये असेल तरीही मनी प्लांटच्या मुळ्या कोणाला दिसणार नाही अशाप्रकारे मुळ्या झाकून द्याव्यात. बाटली असेल तरीही तिला रॅपर लावावे म्हणजे त्याच्या मुळ्या कोणाच्या दृष्टीस पडणार नाही.
मनी प्लांट पिवळसर, पोपटी नसावे. ते हिरवेगार असावे म्हणजे आपली प्रगतीही वेगाने होते. मनी प्लांट जितक्या वेगाने वाढते तितक्या वेगाने आपली प्रगती होत राहते. मनी प्लांट लावताना मुख्य दरवाजाच्या बाजूला घरात आतील बाजूस लावावे आणि त्याचा वेल दरवाजाच्या वरती जाईल म्हणजे आपण घरात प्रवेश करताना,
किंवा कामासाठी बाहेर पडताना आपल्या डोक्यावर मनी प्लांट असावा. मनी प्लांटच्या कुंडीला किंवा बाटलीला लाल रंगाची रिबन बांधावी. यामुळे त्याच्या आपल्याला दुप्पट फायदे मिळतात व दिसायलाही आकर्षक व सुंदर दिसते.
मनी प्लांटला पाणी टाकताना एका ग्लासात पाणी घेऊन त्यात दोन चमचे दूध टाकावे व मग ते पाणी मनी प्लांटला टाकावे. त्यामुळे मनी प्लांट वेगाने वाढतो व प्रगतीही वेगाने होते. तसेच मानले तर खूप आहे नाही मानले तर काहीच नाही. या गोष्टी करून बघा खरोखरच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुमच्या परिस्थितीत बदल झालेला तुम्हाला जाणवेल.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.