नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ
स्वामींचा आजचा उपदेश पाहूया.
केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ होता. तू खूप धार्मिक स्वभावाचा होता. त्याची पत्नी त्यांच्यासारखी धार्मिक स्वभावाची होती. केशव कडे दत्त जयंतीच्या उत्सव फार उत्साहाने साजरा व्हायचा.
त्याची आर्थिक परिस्थती बर्या पैकी असल्याने दरवर्षी दत्तजयंती संपूर्ण गावाला प्रसाद म्हणून जेवण देत असायचा. जवळ जवळ १५ वर्ष झाली तो दत्त जयंती जेवण देत होता.
पण एका वर्षी त्याची आर्थिक परिस्थती खालावली होती. दत्तजयंती चा दिवस जवळ येत होता आणि त्याला गवजेवन घालणं शक्य नव्हतं. म्हणून या वर्षी गाव जेवण घालण्याचा निर्णय तो रद्द करतो.
त्याऐवजी ११ ब्राह्मण आणि स्वामींना जेवण द्यायचं अस तो ठरवतो. त्यासाठी तो स्वामींना आमंत्रण देण्यासाठी जात असतो. त्याला वाटेत एक कुष्ट रोगी भेटतो. तोही रोगमुक्त साठी स्वामींकडे जात असतो.
दोघेही स्वामींकडे येतात. केशव स्वामींना आपले मनोगत सांगतो. तो कुश रोगीही स्वामींना आपली कथा सांगण्यात उत्सुक असतो. स्वामी केशवला म्हणतात मी तुझ्याकडे जेवायला येईल.
पण त्याआधी तू मला एक चंदनाच खोड आणून दे. ती चंदनाचे खोड आणून देतो. स्वामी तो खोड त्या कुष्ठ रोग्याला देतात. आणि म्हणतात हे घे उगाळून लावं. तुझा रुग बरा होईल. मग स्वामी केशव ल म्हणतात. आम्ही तुझ्या घरी दत्त जयंती ला येऊ.
तू फक्त १० ब्राह्मणाला बोलावं. ११ वा ब्राह्मण आम्ही घेऊन येऊ. केशव स्वामींच्या आदेशाच पालन करतो. काही दिवसांनी दत्त जयंती च्या दिवशी तो कुष्ठ रोगी कृतज्ञ तेची भावना घेऊन येतो. कारण स्वामींनी दिलेली चंदनाची खोड उगाळून लावल्याने तो पूर्णपणे बरा होतो.
पण तो दुरूनच स्वामींना नमस्कार करतो. कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो. त्यावर स्वामी म्हणतात. अरे तू जवळ येत नाही तर आम्ही जवळ येऊ.
अरे सर्व जीव परमेश्वराने निर्माण केली आहे त्यात कशासाठी भेट करायचा. असे म्हणत स्वामी त्याला केशवच्या घरी घेऊन जातात. आणि केशव ला संबोधित करून म्हणतात. केशव हा तुझा ११ वा ब्राह्मण.स्वामी पटवून देतात.
मनुष्य त्याच्या कर्मानी ब्राह्मण असतो जन्माने नाही. मग केशव सहमती दर्शवतो. आणि स्वामींचे पूजन करतो. आणि जेवणासाठी ताट वाढायला सुरुवात करतो. तेवढ्यात पाहतो की सर्व गाव जेवायला आला आहे. सर्व दारा बाहेर उभे आहेत.
काही कारणाने निमंत्रण दिले नसेल म्हणून सर्व जण येतात. तो स्वामी ना सांगतो की जेवण फक्त आमंत्रित लोकांसाठी आहे. स्वामी एक नारळ देतात. आणि सांगतात याच पाणी अन्नावर शिंपड. म्हणजे अन्न सर्व पुरेल केशव तसच करतो.
केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात. ते सर्व अन्न वाढून येतात आणि ते सर्व भांडी रिकामी झाल्यावर पाहतात तर काय सर्व भांडी पुन्हा भरलेले आहेत. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहत.
केशव स्वामींचे आभार मानतो. स्वामी तुमच्यामुळे माझी गावासामोर लाज वाचली. अरे सर्व जेवण ईश्वर देतो. तू फक्त निमित्त मात्र आहे. जे काही मिळत तर ईश्वरा मुळेच मिळत. म्हणून दानधर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये, अहंकार नसावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.