नमस्कार मित्रांनो,
2022 हे नवीन वर्ष सुरू झालं आणि आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या सणाची आणि म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की, मकर संक्रांतीचे म ह त्त्व काय आहे? मकर संक्रांतीच यंदा वाहन कोणता आहे? संक्रांत कोणत्या दिशेला जाणार आहे?
तिने कोणते वस्त्र परिधान केलेली आहेत? तसंच पूजेचा मु हू र्त काय? या शिवाय संक्रांतीला कशाचे दान करावे या विषयी सं पू र्ण माहिती आज आपण या माहितीच्या आधारे पाहणार आहोत. मित्रांनो हिंदू धर्मात मकर संक्रांत हे एक वि शे ष पर्व मानले जाते. मकर संक्रांत हा सण सामान्यतः 14 जानेवारीला येतोय यंदाही मकर संक्रांत 14 जानेवारीला शुक्रवारी आलेली आहे.
या दिवशी उत्तरायण सुरू होते म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एका मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आपले पुत्र शनिदेव यांच्या घरी जातात. तसेच असंही मानलं जातं की या दिवसापासून स्वर्गाची दारे उघडतात.
म्हणूनच महाभारतातील कौ र व पांडवांचे पितामह भीष्म यांनी देह त्याग करण्यासाठी सुद्धा हा दिवस निवडला होता. या दिवशी सूर्य नारायणाबरोबर, श्री गणेश, श्री शिवशंकर, श्रीविष्णु आणि शिव महालक्ष्मी यांचेही पूजन केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नाना आणि दानातून वि शे ष फलाची प्राप्ती होते.
म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावं किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करावी आणि त्यातून आपल्याला वि शे ष पुण्य फळाची प्राप्ती होते. आता मकर संक्रांतीच्या विशेष पूजा मु हू र्त बद्दल जाणून घेऊया.
14 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि पूजा मु हू र्त 2 वाजून 12 मिनिटांनी ते 5 वाजून 45 मिनिटांनी पर्यंत असेल, म्हणजेच 3 तास 32 मिनिटांचा हा कालावधी आहे. त्याबरोबर महापुण्य काल असणार आहे 2 वाजून 12 मिनिटांनी ते दोन वाजून 36 मिनिटांनी पर्यंत.
अर्थात 24 मिनिटांचा हा महापुण्यकाल असणार आहे आणि सं क्र म ण काळ आहे 2 वाजून 12 मिनिटांनी तर यावेळी मकर संक्रांत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाईल. तिचे मुख नैऋत्यकडे असेल. तिच्या हातामध्ये सुवासासाठी जायचं फुल आहे. तिचं वाहन यंदा वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे.
तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये आ यु ध म्हणजे शस्त्र म्हणून गदा धारण केलेली आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. तसंच ती पायासाच भक्षण करत आहे. ती उभ्या अवस्थेमध्ये आहे बैठ्या स्थितीमध्ये नाही. तिथे भोजन पात्र चांदीचे असून आ भू ष ण म्हणून तिने कं क ण धारण केले आहे.
मकर संक्रांतीला दानाचे विशेष म ह त्व आहे आणि मकर संक्रांतीच्या शुभ फल प्राप्तीसाठी आपण दा न ध र्म या दिवशी नक्की करायचा आहे. यामध्ये आपण उबदार कपड्यांचे दान करू शकता.
तसेच मोक्षप्राप्तीसाठी तुपाच्या दानाचे सुद्धा विशेष म ह त्त्व आहे. तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळाच्या दानाचे सुद्धा विशेष म ह त्व आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक पटीने लाभ मिळत असतो.
या दिवशी भांड्यांचेही दान केले जाते. तसेच खिचडीचे दानही केले जाते. यातून विशेष पुण्य फळाची प्राप्ती होते अस म्हटलं जातं. मग मित्रांनो येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला हा र्दि क हा र्दि क शुभेच्छा
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.