माघ पौर्णिमेला कोणते 3 उपाय करावेत?

नमस्कार मित्रांनो,

आज माघ पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी तीन उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ शकते. कोणते आहेत ते 3 उपाय चला जाणून घेऊया.

पोर्णिमेच्या दिवशी स्नान दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही लोक उपवास करतात. चंद्राला अर्ग्या अर्पण करतात. या वर्षी माघ पौर्णिमा 16 फेब्रुवारीला आहे. या दिवशी भाविक विशेषतः प्रार्थना करतात.

या वर्षीच्या पौर्णिमेला विशेष योग आलेला आहे. यावेळी माग पौर्णिमेच्या दिवशी अश्लेषा नक्षत्र आणि कर्क राशीचा संयोग होत आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करून दान केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.

16 तारखेला पौर्णिमा सकाळी 9:42 मिनिटांनी सुरू होईल ते 10:55 मिनिटांनी पर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला कर्क राशीतील चंद्र आणि आश्लेषा नक्षत्राच्या संयोगामुळे शोभण योग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

या दिवशी दुपारी 12:35मिनिटांनी ते 1:59 मिनिटांनी पर्यंत राहु काल आहे. या काळात कोणताही शुभ कार्य करू नये. माघ पौर्णिमेला काही गोष्टी आवर्जून केल्या जातात. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करणे खूप पुण्याचं मानलं जातं. या दिवशी गंगेत स्नान करून भाविक भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.

त्यामुळे धन वैभव आणि सुख समृद्धीमध्ये वाढ होते. माघ पौर्णिमेला लक्ष्मीची आराधना केल्याने धनाची प्राप्ती होते. या दिवशी देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा भक्ती भावाने नक्की करा.

त्यांना खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवा. माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला पिवळ्या आणि लाल रंगाचे साहित्य अर्पण करावे. त्याबरोबरच विशेषतः महालक्ष्मीला खीर अर्पण करावी. त्यामुळे ती आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते.

माघ महिन्यातील पौर्णिमेला दानाचे विशेष महत्व आहे हे आपण सुरुवातीला पाहिले आहे. या दिवशी तीळ, तूप, गूळ, मीठ, घोंगडी कपडे 5 प्रकारची धान्ये आणि गाय दान केल्यास अक्षयपुण्याची प्राप्ती होते.

मनशांती हवी असेल तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ घालून ऊँ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः किंवा ॐ ऐं क्लीं सोमाय नमः असे मंत्र म्हणा. या मंत्राचा उच्चार करत अर्ग्या अर्पण करा.

अस मानलं जात की, जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर त्यातून सुटका हवी असेल तर या दिवशी माता लक्ष्मीला 11 शंख अर्पण करा. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा आणि पूजा केल्यानंतर तिच्या मंत्राचा उच्चार नक्की करा आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *