नमस्कार मित्रांनो,
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या 4 चुका अजिबात करू नका. नाहीतर तुम्ही कितीही मोठी पूजा केली तरी त्या पूजेचा काही उपयोग होणार नाही. मित्रांनो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याकडून या चुका झाल्या तर लक्ष्मी कधीच आपल्या घरात येत नाही. मग आपण लक्ष्मीपूजनाची पूजा केली तरी तिचा लाभ आपल्याला होत नाही.
मग आपल्या घरात गरीबी दरिद्री ही सतत चालूच असते. कधीच त्यामध्ये कमी येणार नाही आणि आपण कधीच प्रगती करणार नाही. म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चार चुका तुम्ही अजिबात करू नका.
यातली पहिली चूक म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीचा दिवस असतो आणि खासकरून लक्ष्मीपूजनाचा दिवस या दिवशी तुम्ही घरात वाद विवाद आणि कटकटी करू नका. ज्या घरात वादविवाद, कटकटी असतात तेथे लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही.
दुसरी गोष्ट ती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि दिवाळीमध्ये तुम्ही मांसाहार करू नका, नॉनव्हेज खाऊ नका. आता बरेसे लोक बोलतात की, आम्ही घरी नॉनव्हेज करणार नाही, मांसाहार करणार नाही. पण आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाऊ. नाही मित्रांनो तुम्हाला या दिवसांमध्ये खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाहेर सुद्धा काहीच खायचं नाही आहे.
काही लोक बाहेरून खाऊन येतात. पण नाही हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला घरी काय तुम्हाला बाहेर सुद्धा मांसाहार करायचं नाहीये. त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यसन. व्यसनी माणसं व्यसन कधीच सोडत नसतात आणि ही सगळ्यात मोठी चूक असते की, तुम्ही सणावाराच्या दिवशी खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धाव्यसन करत असाल तर मग तुमच्या घरात लक्ष्मी कधीच येणार नाही.
म्हणून व्यसन सुद्धा व्यसनी माणसानं करायचं नाही आहे. यामध्ये कोणतेही व्यसन असू द्या तुम्ही व्यसन अजिबात करू नका. मित्रांनो शेवटची गोष्ट ती म्हणजे घरातील किंवा इतर कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. मग तो अपमान पुरुष करत असेल किंवा स्त्री स्त्रीचा अपमान करत असेल तर ती सुद्धा सगळ्यात मोठी चूक असते.
मग ती स्त्री घरातील असतील किंवा बाहेरची असेल कोणत्याही स्त्रीचा अपमान या दिवशी करू नका. कारण लक्ष्मी माता घरात येणे आधी या सर्व गोष्टींकडे लक्ष देत असते. आणि ज्या घरांमध्ये या चुका होत असतात तिथे लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.