नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो लक्ष्मीचे उपवास, लक्ष्मीचे व्रत आपल्या घरातील महिलांनी करावे हे व्रत. या व्रताने घराची परिस्थिती सुधारते. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. मित्रांनो विवाहित महिलांनी हे लक्ष्मी मातेचे व्रत अवश्य करावे. अगदी सोपे सरळ व्रत आहे सगळ्या विवाहित महिलांना करता येणारा व्रत आहे.
महिलांनी विशेष करून विवाहित महिलांनी हे व्रत केले तर त्यांच्या घराची परिस्थिती सुधारेल, घरात सुख समृद्धी नांदेल. घरात लक्ष्मी मातेचा वास राहील, पैसा टिकू लागेल, कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही, नवऱ्याची
प्रगती होईल.
बिझनेस, नोकरी असू द्या या दोन्ही ठिकाणी प्रगती होईल. तुमच्या मुलांचे शिक्षणात लक्ष लागेल आणि त्यांची सुद्धा प्रगती होईल. जाणून घेऊया हे व्रत कसे व कधीपासून करावे?
मित्रांनो हे व्रत कोणत्याही महिन्यापासून सुरू करू शकता. खास करून दर महिन्याच्या शुक्रवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. खास करून श्रावण महिना सुरू होणार आहे. तर श्रावणाच्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकतात.
शुक्रवारी तुम्हाला फक्त उपवास करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून लक्ष्मी मातेचा आपल्या देवघरातील दर्शन घ्यावे. त्यांना प्रार्थना करत बोलावे तुमचे आजपासून तुमचे व्रत सुरू करत आहे तर तुम्ही आमच्या घरात वास करा, आमच्यावर कृपा करा असे प्रार्थना करून या व्रताला सुरुवात करावी.
आणि त्याच शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक वेळ फक्त श्री सूक्त वाचायचे आहे. हे लक्ष्मी मातेचे स्तवन मानले जाते. तुम्हाला दुसरे कोणतेही पोती वाचायची गरज पडणार नाही.
ना महालक्ष्मीची, ना वैभवलक्ष्मीची तुम्हाला फक्त दर शुक्रवारी त्या दिवशी उपवास केलेले आहे म्हणजे खास करून शुक्रवारी तर तुम्हाला श्री सूक्त एक वेळेस वाचन करायचे आहे. यासाठी कोणतेही पूजा चौरंग किंवा पाटावर मांडण्याची गरज नाही.
तुमच्या घरात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो देवघरात असायला पाहिजे एवढाच एक नियम आहे. दर शुक्रवारी उपवास केल्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून ‘श्री सूक्त’ वाचन करायचं आहे. देवघरामध्ये तुम्ही धूप किंवा अगरबत्ती लावून साखर किंवा खडीसाखर ठेवले तरी चालू शकत.
आणि संध्याकाळी लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवावा आणि त्याच नैवेद्याने तुम्ही उपवास सोडावा. दिवसभरात तुम्ही कोणत्याही प्रकारचे फराळ करू नये. फक्त फळे खाल्ले तर चालेल पण गोड पदार्थ खाऊ नये म्हणजे स्वीट खाऊ नये.
म्हणजे आपण शाबुदाने किंवा खिचडी खातो ते न खाता फक्त फळे खाल्ले तरी चालेल अशा रीतीने तुम्ही उपवास करायचं आहे. मनात श्रध्दा ठेवून मनोभावाने तुम्ही हे शुक्रवारचे व्रत करावे. आता आपण हे किती शुक्रवार व्रत करू शकतो?
तर मित्रांनो अकरा शुक्रवार तुम्ही हे व्रत करावे. मध्ये काही अडचण आली, प्रॉब्लेम आले काहीही असू द्या त्यावेळेस फक्त उपवास करावा आणि ‘श्री सूक्त’ वाचन करायचे नाही, नैवेद्य सुद्धा न दाखवता फक्त उपवास करावा. पण तो शुक्रवार मोजायचा नाही.
त्याचा पुढचा शुक्रवार म्हणजे तुम्हाला असे शुक्रवार मोजायचे आहे ज्या दिवशी तुम्ही ‘श्री सूक्त’ लक्ष्मी मातेसमोर वाचन केले आहे तोच शुक्रवार तुम्हाला मोजायचे आहे. असे तुम्हाला अकरा शुक्रवार उपवास करायचे आहे.
अकराव्या शुक्रवारी विधी वितनुसार काही तरी गोड धोड पदार्थ करून लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून दाखवावा. आणि साध्या पद्धतीने उद्यापन करायचे आहे. तुम्हाला जमले तर पाच मुलींना घरी बोलवून त्यांना जेवणाला बोलावले तरी चालेल.
कोरोनामुळे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन दानधर्म केले तरी चालेल. आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही दानधर्म करू शकता. आणि यासाठी कोणत्याही पोतीची गरज असते. मित्रांनो अगदी सोपा आणि सरळ सगळ्या विवाहित महिलांना करता येणार हा उपवास, व्रत आहे.
नक्की करून पहा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. श्रावण महिन्यापासून किंवा कोणत्याही महिन्यापासून सुरू करू शकता. श्रावण महिन्यात सुरू केले तर अतिउत्तम कारण श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र मानला जाणार महिना आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.