नमस्कार मित्रांनो,
आपल्या देशात लग्न हे 2 व्यक्तीमधील ज न्मो ज न्मी च नातं मानलं जातं. लग्न हे असं नातं असतं ज्यात मुलगा आणि मुलगी त्यांचं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. त्याचबरोबर केवळ मुलगा आणि मुलगीच नाही तर दोन कुटुंब ही त्यांच्या लग्नामुळे एकत्र येतात.
अशा प रि स्थि ती त जर लग्न ठरलं असेल म्हणजेच नातेसंबंध तयार होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरबद्दल माहिती नसेल तर लग्न करण्यापूर्वी नक्की त्यांच्या बद्दल जाणून घ्यायला हवं. पती-पत्नीला एकमेकांना हळूहळू जाणून घेण्यास किंवा जीवनाशी जुळवून घेण्यास बराच वेळ मिळतो.
परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लग्नापूर्वी जाणून घेतल्या पाहिजेत. जर तुम्हाला तुमचा होणाऱ्या जोडीदाराबद्दल या गोष्टी आधीच माहिती असेल तर तुम्हाला लग्नानंतर समस्या उ द्भ व णा र नाहीत. चला तर मग जाणून घेऊया की, त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या प्र त्ये क मुलगा किंवा मुलगी यांनी लग्नाआधी जोडीदाराबद्दल जाणून घेतल्याच पाहिजेत.
त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनाप्रमाणे लग्न होत आहे का? मुलगा असो किंवा मुलगी दोघांनीही लग्नाआधी आपल्या भावी जोडीदाराला हा प्रश्न नक्की विचारला पाहिजे की, लग्न त्यांच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार होत आहे का? कोणत्याही दबावाखाली त्यांनी लग्नाला होकार तर दिलेला तर नाही ते बघा.
बऱ्याचदा आपण बघतो की, घरच्यांचा दबावाखाली मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार होतात. त्यांना तुम्ही आवडत नसेल किंवा कदाचित त्यांना आधीच कोणीतरी आवडत असेल असंही असू शकतं. अशा प रि स्थि ती त या प्रश्नाने तुम्हा दोघांचेही भवितव्य सुरक्षित राहू शकतो.
त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे आवडीनिवडी. लग्नाआधी आयुष्याच्या जोडीदाराच्या आवडी निवडीबद्दल थोडी माहिती घ्यायलाच हवी. त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाकाहारी आहे की मांसाहारी, मद्यपान धूम्रपान यापैकी काही करता का?
या शिवाय त्यांच्या आवडींबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घ्याव्यात. यावरून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाचीही कल्पना येते आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही त्यांना अनोळखी समजणार नाही आणि यापैकी काही गोष्टीत तुम्हाला अजिबात पटत नसतील तर तुम्ही तिथे थांबू शकतात.
त्यानंतरची गोष्ट आहे करिअर प्लॅन. लग्न हे भविष्याशी निगडित नात आहे. त्यामुळे एकमेकांचे करियर नोकरी आधीच चर्चा करून ते मोकळे करायला हवे. ते काय करतात हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. त्यांचा पगार किती आहे भविष्यातील करिअरबाबत त्यांचा काय योजना आहेत हे जाणून घेणे अ व श्य आहे.
याशिवाय खास करून मुलींनी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, लग्नानंतर तुमच्या नोकरी बाबत मुलगा किंवा त्याच्या कुटुंबियांना काही अडचण तर नाही ना. लग्नानंतर दुसरीकडे स्थायिक होण्याचा त्यांचा काही विचार आहे का? मित्रांनो हे प्रश्न लग्न जमवताना खूप महत्त्वाचे असतात. जे नेहमी दु र्ल क्ष केले जातात.
म्हणूनच प्र त्ये क मुलगा किंवा मुलींनी एकमेकांच्या करिअर बद्दल एकमेकांना विचारायला हवे. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या बद्दल ते काय विचार करतात. लग्नासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांबद्दल स का रा त्म क विचार करणं. त्याला तुमच्या बद्दल काय वाटतं ते तुम्ही त्याला विचारलं पाहिजे.
त्यामुळे तो आपल्या मर्जीने तुमच्याशी लग्न करतोय की नाही हे सुद्धा तुम्हाला कळेल. त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा विचारा. त्यामुळे समोरच्याला कोणत्या प्रकारचा जीवनसाथी हवा आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. मित्रांनो यानंतरचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कुटुंब नियोजन.
अतिशय आ व श्य क असा हा प्रश्न आहे. तुमच्या भावी आयुष्याच्या जोडीदाराला कुटुंब नियोजनाबद्दल विचारा. लग्नानंतर कुटुंब वाढवण्याचा विचार कधी करणार आहात. तुम्हाला किती मुलांची अपेक्षा आहे, मुलांबद्दल त्यांचं काय मत आहे हे प्रश्न तुमच्यासाठी उपयोगाचे ठरू शकतात.
मित्रांनो खरतर या मुद्द्यांचा विचार फक्त अरेंज मॅरेजमध्येच नाही तर लव मॅरेजमध्ये सुद्धा करायला हवा. कारण प्रेम आंधळ असतं अस आपल्याकडे म्हणतात. त्यामुळे प्रेमात पडताना या गोष्टींचा विचार नक्की केला जात नाही आणि म्हणून लग्न करण्याआधी एकमेकांना हे प्रश्न विचारायला हवे.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.