नमस्कार मित्रांनो,
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, हो त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझे शंकरचिलेदत्त.
दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात, चिलेगुरूंचे पाऊल उठले साऱ्या अंगणात ||1|| हो त्याचा लागे ना अंत.
भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या काखेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात, कुण्या वाटेने गेले माझे सदगुरू चिले दत्त ||2|| हो त्याचा लागे ना अंत.
श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत, बघा बघा ते चिलेगुरू आले मोरवे गावात ll३ll हो त्याचा लागे ना अंत.
भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात, ओम दत्त चिले मंत्र ठेवा ध्यानात ll४ll हो त्याचा लागे ना अंत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.