नमस्कार मित्रांनो,
स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात. माणूस हा आशावादी असतो बहुतांशजण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर, कृतीवर, वि श्वा स ठेवतात. कारण ती व्यक्ती आपले नुकसान करणार नाही अशी आशा त्याच्या मनात असते. मात्र अनेकदा अतिविश्वासामुळे फसवणूक झाल्याच्या घटनाही आपण पाहतो.
काही प्रसंगात सारासार विचार न करता ठेवलेल्या विश्वासामुळेही समस्या उद्भवल्याची उदाहरणे देता येतात. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराज कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको अशी शिकवण देतात. नेमके काय घडले ते आपण जाणून घेऊया. स्वामी आसनस्थ झालेली असतात. स्वामी चोळप्पाना म्हणतात की, जसा राजा तशी प्रजा.
राजालासुद्धा कळत नाही कोणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करतात. दाजीबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागत. राजा खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजिबाला सोडवून आणतात. एवढेच नव्हे तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात. न्याय निवडा दाजीबाच्या हातात दिला जातो.
दाजीबा अविवेकाने शुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजीबाची सर्व हकिगत येते. स्वामी म्हणतात की, दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणार्या राज्यालाही भोगावे लागणार आहे. चोळाप्पा राजाकडे जाऊन त्यांची भेट घेतात आणि राजाला सांगतात की, प्रजा सुखी नाही. न्याय पदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झालेली आहे.
यावर राजा म्हणतो की, आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केलेली आहे असे सांगून राजा चोळप्पाचे बोलणे फेटाळून लावतात. एके दिवशी संस्थान जप्त करण्याबाबत इंग्रजांचा खलिता येतो. त्याला धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण येतो. स्वामी त्याची चांगली हजेरी घेतात आणि म्हणतात की, चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याएवजी त्याला सोडून बढती का देण्यात आली.
दाजीबा आधीच मर्कट त्यावर भरतीचे मद्य प्यायला घातले. त्याचाच हा परिणाम आहे प्रजेला खूपच सोसावे लागत आहे यावर दाजीबा क्षमा मागतो. स्वामी सांगतात की, तुला क्षमा नाही तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायला अवकाश असतो की, इंग्रज शिपाई दाजिबाला अटक करतात.
राजा स्वामींची करुणा भाकतात स्वामी राजाला सांगतात की, राजा आपण गुरुपदेश मानला नाही शेवटी आपल्या मनाचा केलं कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. राजा स्वामीसमोर न त म स्त क होतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.